भारतीय क्रिकेटपटू पार्थिव पटेलने आज सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. पार्थिवने १७ व्या वर्षी भारतीय संघाकडून कसोटीत पदार्पण केले होते, तेव्हा तो सर्वात कमी वयाचा विकेटकिपर होता. देशांतर्गत क्रिकेटमध्ये पार्थिव गुजरातकडून खेळत होता. भारतीय संघात खेळण्याचे पार्थिवने अनेकदा प्रयत्न केले, पण त्याला यश आले नाही. नंतर तो आयपीएल आणि देशांतर्गत क्रिकेट खेळू लागला.
२०१५च्या आयपीएलमध्ये त्याने ३३९ धावा केल्या होत्या. तेव्हा मुंबई संघाकडून त्याने सर्वाधिक धावा केल्या होत्या. त्याच वर्षी मुंबई संघाने आयपीएलचे विजेतेपद देखील मिळवले होते. पार्थिवने फेब्रुवारी २०१६ मध्ये अखेरची आंतरराष्ट्रीय मॅच खेळली होती. तेव्हा इंग्लंडविरुद्धच्या कसोटी सामन्यात वृद्धीमान सहाला दुखापत झाली म्हणून पार्थिवला संघात स्थान मिळाले होते. पटेलने त्या सामन्यात ५४ चेंडूत नाबाद ६४ धावा केल्या होत्या. यामुळे भारतीय संघाने विजय मिळवला होता.
Parthiv Patel announces his retirement from all cricket.
? 25 Tests, 38 ODIs, two T20Is
? 1706 runs
? 93 catches, 19 stumpingsHe remains the youngest wicket-keeper to play Test cricket, having made his debut at 17 years and 152 days ⭐ pic.twitter.com/O5i8FeRUiW
— ICC (@ICC) December 9, 2020