बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणावतने केलेल्या एका ट्विट वरून चांगलाच वाद निर्माण झाला आहे. राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी ट्विटर अकाऊंट वरून कंगनावर चांगलीच टीका केली आहे.
रुपाली चाकणकर यांचे ट्विट:
मुंबई कोणाच्या बापाची आहे हे सांगण्यासाठी आम्ही आलो असतो पण संस्कारहीन, कृतघ्न लोकांसाठी आम्ही वेळ वाया घालवत नाही. कंगणा राणावत तू उतरलेल्या विमानतळापासून ते तुझ्या घरापर्यंत जी मुंबई तू पाहतेस ती फक्त मुंबई पोलिसांमुळे सुरक्षित आहे. शुटींगच्या सेटपासून ते चित्रपटगृहांपर्यंत जी सुरक्षितता आहे ती मुंबई पोलिसांमुळेच आहे. सध्या काही काम नसल्यामुळे फुटकळ प्रसिद्धीसाठी अशी बालिश बडबड करताना स्वतःच्या तोंडाला लगाम घाल. मुंबई पोलीस देशाचा अभिमान आहेत. असं ट्विट रुपाली चाकणकर यांनी केलं आहे.
मुंबई कोणाच्या बापाची आहे हे सांगण्यासाठी आम्ही आलो असतो पण संस्कारहीन ,कृतघ्न लोकांसाठी आम्ही वेळ वायाला घालवत नाही.
कंगणा राणावत तु उतरलेल्या विमानतळापासून ते तुझ्या घरापर्यंत जी मुंबई तु पाहतेस ती फक्त मुंबई पोलिसांमुळे सुरक्षित आहे.(1/2)#चल_फूट @MHVaghadi @NCPspeaks— Rupali Chakankar (@ChakankarSpeaks) September 4, 2020