cruise drugs case : Govt orders action against ex-NCB officer Sameer Wankhede
महाराष्ट्र मुंबई

मोठी बातमी! समीर वानखेडे मुस्लीम नाहीत, जात प्रमाणपत्र पडताळणी समितीने केले स्पष्ट

मुंबई : अमली पदार्थ नियंत्रण कक्षाचे माजी विभागीय संचालक समीर वानखेडे यांना जात प्रमाणपत्र पडताळणी समितीकडून मोठा दिलासा मिळाला आहे. समीर वानखेडे आणि त्यांच्या वडिलांनी मुस्लीम धर्म स्वीकारल्याचे कुठेही सिद्ध होत नाही. त्यामुळे त्यांचे हिंदू महार हे जात प्रमाणपत्र वैध असल्याचा निकाल जात प्रमाणपत्र पडताळणी समितीने दिला आहे. हा समीर वानखेडे यांच्यासाठी खूप मोठा दिलासा मानला जात आहे.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

आर्यन खान ड्रग्ज प्रकरणात चर्चेत आलेले समीर वानखेडे यांच्यावर राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी काही गंभीर आरोप केले होते. वानखेडे जन्माने मुस्लीम आहेत आणि त्यांनी बोगस जात प्रमाणपत्र सादर करून मागासवर्गीय कोट्यातून सरकारी नोकरी मिळवल्याचा दावा केला होता. या प्रकरणात आता वानखेडेंना दिलासा मिळाला आहे.

समीर वानखेडे यांच्या प्रकरणाचा तपास महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागाच्या अंतर्गत असलेल्या जात प्रमाणपत्र पडताळणी समिती करत होती. या समितीचा निकाल समीर वानखेडेंच्या बाजूने लागला आहे. समीर वानखेडे जन्माने मुस्लीम नाहीत. वानखेडेंच्या वडिलांनी हिंदू धर्माचा त्याग करून मुस्लीम धर्माचा स्विकार केल्याचे सिद्ध होत नाही, असे समितीने म्हटले आहे. समीर वानखेडे हिंदू महार ३७ अनुसूचित जातीचे सिद्ध होत असल्याचे समितीने म्हटले आहे. तसेच, समीर वानखेडेंविरोधात केलेली तक्रार सिद्ध होत नसल्याने जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीने ही तक्रार फेटाळली आहे.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

थोडक्यात घडामोडी टीम
कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत