मुंबई : आता पुन्हा एकदा मुंबईकरांवर निर्बंध येणार आहेत. मुंबईत आज मध्यरात्रीपासून जमावंबदी लागू करण्यात येणार आहे. ही जमावबंदी ३० सप्टेंबरपर्यंत लागू असणार आहे. याविषयी मुंबई पोलीस आयुक्तालयाकडून परिपत्रक जारी करण्यात आलं आहे. मात्र असं असलं तरीही कोणत्याही प्रकारचा लॉकडाऊन यावेळी करण्यात आलेला नाही. मात्र, यावेळी नागरिकांना कुठेही गर्दी करता येणार नाही.
अत्यावश्यक सेवेत असणाऱ्या कर्मचाऱ्यांना प्रवासाची मुभा असणार आहे. मात्र, यावेळी त्यांना सोशल डिस्टन्सिंग आणि इतर प्रोटोकॉलचे पालन करावं लागणार आहे. त्याशिवाय मास्क देखील अनिवार्य असणार आहे. अनलॉक दरम्यान, राज्यात सर्व व्यवहार रुळावर आणण्याचे प्रयत्न केले जात आहेत. मात्र, पुन्हा एकदा रुग्णांची संख्या वाढत असल्याने आता पुन्हा कलम १४४ लागू करण्यात आलं आहे. जेणेकरुन अनावश्यक गर्दी टाळता येईल.




