Aadhaar information will be collected from existing voters in Mumbai suburban district from August 1
महाराष्ट्र मुंबई

आरे दुग्ध वसाहत प्रक्षेत्रातील लम्पी त्वचारोग संसर्ग ठिकाणापासून 10 किमीपर्यंत बाधित क्षेत्र म्हणून घोषित

मुंबई : मुंबई पशुवैद्यकीय महाविद्यालय यांचे आरे दुग्ध वसाहत येथील प्रक्षेत्रातील जनावरांमध्ये लम्पी त्वचारोग या साथ रोगाचा निष्कर्ष पॉझिटिव्ह आल्याने पशुवैद्यकीय महाविद्यालय प्रक्षेत्र या संसर्ग केंद्रापासून (Epicentre) १० किलोमीटरपर्यंत बाधित क्षेत्र (Infected zone) म्हणून घोषित करण्यात येत असल्याचे मुंबई उपनगर जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी सांगितले.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

श्रीमती चौधरी म्हणाल्या, मुंबई पशुवैद्यकीय महाविद्यालय यांचे आरे दुग्ध वसाहत येथील प्रक्षेत्रातील जनावरांमध्ये लम्पी त्वचा रोग आजाराची जनावरे आढळून आली आहेत. या रोगाचा प्रसार जिल्ह्यात इतर ठिकाणी होण्याची शक्यता नाकारता येत नसल्याने, मुंबई उपनगर जिल्हा प्राण्यामधील संक्रमण व सांसर्गिक रोगप्रतिबंधक व नियंत्रण अधिनियम २००९ नुसार प्राप्त अधिकारातून आरे दुग्ध वसाहत येथील मुंबई पशुवैद्यकीय महाविद्यालय प्रक्षेत्र या संसर्ग केंद्रापासून १० किलोमीटरपर्यंत बाधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.

लम्पी रोगाने बाधित क्षेत्रातील जनावरांचे शेड निर्जंतुकीकरण करुन १० किलोमीटर परिघातील परिसरात जनावरांची खरेदी व विक्री, वाहतूक, बाजार, जत्रा व प्रदर्शने आयोजित करण्यास प्रतिबंध घालण्यात येत आहे. वरील ५ किमी परिघातील जनावरांना गोट पॉक्स (Goat Pox) लसीकरण तात्काळ करण्यात यावे. याकरिता उपआयुक्त पशुसंवर्धन (गुणनियंत्रण), यांनी आरे दुग्ध वसाहत येथे, व बृहन्मुंबई महानगरपालिकेचा पशुवैद्यकीय विभाग यांनी आरे दुग्ध वसाहत वगळून मुंबई उपनगर जिल्हा येथे नियोजन करून १०० टक्के लसीकरण करावे, अशा सूचना त्यांनी दिल्या.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

थोडक्यात घडामोडी टीम
कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत