four year old boy drowns in swimming pool
महाराष्ट्र मुंबई

दुःखद! स्विमिंग पूलमध्ये बुडून चार वर्षाच्या चिमुकल्याचा मृत्यू

मुंबई : एका चार वर्षाच्या चिमुकल्याचा स्विमिंग पूलमध्ये बुडून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. माहीर चिराग शहा असे या चिमुकल्याचे नाव आहे. हा मुलगा पोहायला शिकण्यासाठी जात होता. ट्रेनिंगनंतर मुलाची आई ट्रेनरशी बोलत असताना ही घटना घडली. गोरेगावच्या दिंडोशी येथे ही दुःखद घटना घडली.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

मिळालेल्या माहितीनुसार, चार वर्षाच्या माहीरला घेऊन त्याची आई स्विमिंगच्या ट्रेनिंगसाठी घेऊन गेली होती. माहीरची ट्रेनींग झाल्यावर त्याची आई ट्रेनरशी बोलत होती, यावेळी पुलाच्या काठावरून चालत असताना माहीरचा पाय घसरला आणि तो स्विमिंग पूलमध्ये पडला. त्यानंतर बराच वेळ माहीर कुठे दिसला नाही म्हणून सर्वांनी शोधाशोध केली असता तो पाण्यात बुडाल्याचे समजले. त्याला तातडीने बाहेर काढून रुग्णालयात नेले. मात्र, डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. या घटनेनंतर माहीरच्या आई वडिलांना मोठा धक्का बसला आहे.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

थोडक्यात घडामोडी टीम
कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत