मुंबई : राज्यात 5 दिवस जोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. आज दक्षिण कोकण, दक्षिण मध्य महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. पूर्व विदर्भात येलो अलर्ट देण्यात आला असून उर्वरित राज्यात विजांच्या कडकडाटासह वादळी पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे.
राज्यात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. आज (१२ सप्टेंबर) दक्षिण कोकणातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, दक्षिण महाराष्ट्राच्या पुणे, सातारा, कोल्हापूर जिल्ह्यांच्या घाटमाथ्यावर मुसळधार पावसाचा इशारा आहे. पूर्व विदर्भातील वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली जिल्ह्यांत जोरदार पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे. उर्वरित महाराष्ट्रात विजांसह पावसाचा इशारा आहे.
विदर्भ आणि मराठवाड्याच्या लगतच्या भागात पुढील 3-4 तास मेघगर्जना, विजांच्या कडकडाटासह पावसाच्या जोरदार सरी पडू शकतात हे आज सकाळी 9.30 वाजताच्या नवीनतम सॅटेलाइट निरीक्षणावरून दिसत आहे. गेल्या २४ तासांत कोकण आणि मध्य महाराष्ट्रात जोरदार पाऊस कोसळला आहे. आजही मुसळधार पावसाचा इशारा कायम आहे.
Vidarbha and adjoining parts of marathwada could get me to intense spells of rains with thunder, lightning for next 3,4 hrs as can be seeing from latest satellite obs at 9.30 am today.
Konkan ,M Mah recd happy to very heavy in past 24 hrs. Today also heavy rain warnings cont pl. pic.twitter.com/rqqr3zn6Y7— K S Hosalikar (@Hosalikar_KS) September 12, 2022




