The thugs threatened and force her for marriage
महाराष्ट्र

दुःखद! हळदी समारंभादरम्यान नवरीच्या भावाचा मृत्यू, कुटुंबावर शोककळा

यवतमाळ : हळदी समारंभात वधूच्या भावाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याची दुःखद घटना घडली आहे. पुसद तालुक्यातील श्रीरामपूर येथे चुलत बहिणीच्या लग्नाला आलेल्या भावाला लग्न समारंभात हृदयविकाराचा झटका आला. बुधवारी सायंकाळी ही घटना घडली. डॉ. सोनल अशोक जैस्वाल (वय 36) असे मृत चुलत भावाचे नाव आहे.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

पुसदजवळील श्रीरामपूर येथील पायल मुन्ना जैस्वाल आणि यवतमाळ येथील शुभम जैस्वाल यांचे गुरुवारी, ७ एप्रिल रोजी लग्न होणार होते. डॉ. सोनल हा पायलचा चुलत भाऊ आहे. ते कोल्हापुरातील एका विमा कंपनीत व्यवस्थापक होते. आपल्या चुलत भावाच्या लग्नात सहभागी होण्यासाठी ते कोल्हापुरातून आपल्या कुटुंबासह गावी आले होते. घरच्यांसोबत लग्नाच्या विधींचा आनंद घेताना सोनल खूप खुश होते. बुधवारी डॉ. सोनल यांनी त्यांची बहीण पायल हिला साडी दिली. काही क्षणांनंतर डॉ. सोनलच्या हृदयात वेदना होऊ लागल्या. त्यांना तातडीने पुसद येथील डॉ. मनीष पाठक रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले.

सोनल यांच्यावर त्यांच्या संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी होती. 2010 मध्ये त्यांच्या वडिलांचेही हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले होते. त्यांच्या पश्चात आई अन्नपूर्णा, पत्नी स्वीटी, पाच महिन्यांचा मुलगा, बहीण करिश्मा असा परिवार आहे.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

थोडक्यात घडामोडी टीम
कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत