Mumbai High Court
महाराष्ट्र मुंबई

लसीकरण झालेल्यांसाठी लोकल प्रवासाची मुभा देण्याबाबत विचार करावा, उच्च्य न्यायालयाची सूचना

मुंबई : लसीकरण झालेल्यांना लोकलने प्रवास करण्याची मुभा का देत नाही. त्यांच्याही अडचणी आहेत. सरकारने लसीकरण झालेल्यांसाठी लोकल प्रवासाची मुभा देण्याबाबत विचार करावा अशी सूचना मुंबई उच्च्य न्यायालयाने राज्य सरकारला केली आहे. वकिलांना प्रवासाची परवानगी देण्याच्या याचिकेवर झालेल्या सुनावणीदरम्यान उच्च्य न्यायालयाने ही सूचना केली.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

वकिलांना लोकल प्रवासाची मुभा देण्याच्या याचिकेवर मुंबई उच्च्य न्यायालयात सुनावणी पार पडली. वकिलांच्या संघटनेकडून ही याचिका करण्यात आली आहे. कोर्टाचं प्रत्यक्ष काम सुरू झालं आहे आणि वकिलांना न्यायालयात वेळेत पोहोचणं शक्य होत नाही, त्यामुळे त्यांना लोकल प्रवासाची मुभा द्यावी अशी मागणी याचिकेत करण्यात आली. वकिलांच्या मागणीवर मुख्यमंत्र्यांकडून अंतिम निर्णय घेण्यात आल्याची माहिती यावेळी सरकारने दिली.

सरकारने कोणत्या वकिलांना मुभा देता येईल याचा आराखडा तयार असल्याचं सांगितलं. दरम्यान मुख्यमंत्र्यांनी त्यावर स्वाक्षरी केलेली नाही अशी माहिती दिली. दरम्यान मुंबई उच्च्य न्यायालयाने म्हटले की गेल्या वर्षीच्या तुलनेत सध्या वेगळी स्थिती आहे. त्यामुळे वकीलच नाही तर अन्य क्षेत्रांतील लसीकरण झालेल्या नागरिकांना लोकल प्रवासाची मुभा देण्याबाबत विचार करावा. लोकांना लोकलअभावी प्रवास करणे कठीण झाले आहे. त्यामुळे त्यांचाही विचार करा, असं उच्च्य न्यायालयाने सांगितलं. गुरुवारी याप्रकरणी पुढील सुनावणी होणार आहे.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

थोडक्यात घडामोडी टीम
कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत