ऑस्ट्रेलिया : शार्क माशाने एका व्यक्तीवर हल्ला करून त्याला खाल्ल्याची धक्कादायक घटना कॅमेऱ्यात कैद झाली आहे. लोक दुरूनच ओरडत राहिले पण त्या व्यक्तीला वाचवता आले नाही. शार्क माशाने त्या व्यक्तीचे अर्धे शरीर खाल्ले आणि काही वेळाने त्या व्यक्तीचे अर्धे शरीर बाहेर काढण्यात आले. यादरम्यान समुद्रकिनारी बसलेले लोक आरडाओरडा करत मदतीसाठी याचना करत होते, मात्र माशाने त्या माणसाला त्याच्या मजबूत दातांनी पकडून पाण्याखाली ओढले आणि त्याच्या मजबूत दातांनी त्याचे दोन तुकडे केले. जगातील सर्वात धोकादायक माशांपैकी एक मानल्या जाणाऱ्या शार्क माशाचा हा व्हिडिओ सध्या जगभरात व्हायरल होत आहे.
ऑस्ट्रेलियन वेबसाइटवर प्रसिद्ध झालेल्या बातमीनुसार, ही घटना बुधवारी सिडनी बीचच्या लिटल बे एरियामध्ये घडली. तेथे उपस्थित असलेल्या एका मच्छिमाराने पाहिले की, एका शार्क माशाने पोहणाऱ्या माणसाला पाण्यात ओढले आहे आणि तो जीव वाचवण्यासाठी ओरडत आहे. दरम्यान, कोणीतरी या घटनेचा व्हिडिओ बनवण्यास सुरुवात केली. व्हिडिओमध्ये एक व्यक्ती असे म्हणताना ऐकू येत आहे की, शार्क माशाने कोणालातरी खाल्ले आहे. मच्छीमाराने आरडाओरड केल्यावर तेथे उपस्थित असलेल्या बचाव पथकानेही त्या व्यक्तीला वाचवण्याचा प्रयत्न केला मात्र त्याला वाचवता आले नाही आणि अर्ध्या तासानंतर बचाव पथक त्या व्यक्तीच्या अर्ध्या शरीरासह बाहेर आले. या घटनेनंतर समुद्रकिनारा बंद करण्यात आला.
Swimmer killed by shark in horrifying attack in front of beachgoers. #Sydney #Australia #BuchanPoint #Malabar #GreatWhiteShark #Shark #Attack pic.twitter.com/eNZ6oeMQQL
— SALTWATER FISH ??? (@saltwaterfish) February 17, 2022
या घटनेच्या प्रत्यक्षदर्शींनी सांगितले की, हा माणूस डोळ्यासमोर पोहत असताना शार्क माशाने त्याला पकडले आणि पाण्याखाली ओढले. या घटनेनंतर शहरातील अनेक समुद्रकिनारे बंद करण्यात आले असून, जीवरक्षक गस्ती पथक समुद्रात गस्त घालत इतर कोणत्याही समुद्रकिनाऱ्यावर शार्क मासा तर नाही ना, याची खात्री करत होते.




