युक्रेनवर रशियाचा हल्ला सुरूच आहे. खार्किवसह अनेक मोठ्या शहरांमध्ये वारंवार हल्ले होत आहेत. मागील 24 तासांत या हल्ल्यात 21 जणांचा मृत्यू झाला, तर 112 जण जखमी झाले. आज सकाळी रशियन पॅराट्रूपर्सनी खार्किव येथील हॉस्पिटलवर हल्ला केला. दरम्यान, युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की यांनी दावा केला आहे की, या युद्धात आतापर्यंत सुमारे 6000 रशियन सैनिक मारले गेले आहेत.
बुधवारी रात्री संयुक्त राष्ट्र महासभेत रशियाविरोधातील निंदा प्रस्तावावर मतदान झाले. यावेळी या प्रस्तावाच्या बाजूने 141 तर विरोधात 5 मते पडली. भारतासह 35 देशांनी मतदानात भाग घेतला नाही. रशिया, बेलारूस, उत्तर कोरिया, इरिट्रिया आणि सीरिया या देशांनी रशियाच्या बाजूने मतदान केले. यावेळी भारत, चीन, पाकिस्तान, इराक आणि इराण अनुपस्थित होते.
रशियाने प्रथमच कबूल केले आहे की युद्धात त्यांचे 498 सैनिक मारले गेले आहेत, तर सुमारे 1500 कैदी झाले आहेत.




