पुणे : Red Magic 6 series अंतर्गत Red Magic 6 आणि Red Magic 6 Pro असे दोन स्मार्टफोन बाजारात लॉन्च केले आहेत. दोन्ही फोनला स्नॅपड्रॅगन ८८८ चिपसेट आणि हाय रिफ्रेश रेट डिस्प्ले सोबत लॉन्च केले आहे. या लेटेस्ट सीरीजमध्ये कंपनीने हीटला कमी करण्यासाठी अॅक्टिव कूलिंग टेक्नोलॉजीचा वापर केला आहे. फोनचे एक ट्रान्सपेरेंट एडिशन सु्द्धा आहे. जे १६ जीबी रॅम प्लस २५६ जीबी स्टोरेज सोबत येते.
Red Magic ६ चे फीचर्स :
- हा फोन अँड्रॉयड ११ वर आधारित RedMagic OS 4.0 वर काम करतो.
- ६.८ इंचाचा फुल एचडी प्लस (1,080×2,400 पिक्सल) डिस्प्ले
- रिफ्रेश रेट 165 हर्ट्ज़, सिंगल फिंगर टच सैम्पलिंग रेट 500 हर्ट्ज़, मल्टी-फिंगर टच सैम्पलिंग रेट 360 हर्टज आहे.
- स्नॅपड्रॅगन ८८८ प्रोसेसर सोबत ग्राफिक्ससाठी अॅड्रेनो ६६० जीपीयूचा वापर केला आहे.
- 12 जीबी LPDDR5 रॅम आणि 256 जीबी UFS3.1 स्टोरेज दिला आहे.
- बॅक पॅनेलवर ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप दिला आहे.
- प्रायमरी कॅमेरा ६४ मेगापिक्सलचा, ८ मेगापिक्सलचा अल्ट्रा वाइड लेन्स आणि २ मेगापिक्सलचा मायक्रो कॅमेरा सेन्सर दिला आहे.
- पॉवर देण्यासाठी यात 5050 एमएएचची बॅटरी दिली आहे.
- ६६ वॉट फास्ट चार्जिंग सपोर्ट करते.
- ८ जीबी रॅम प्लस १२८ जीबी स्टोरेज व्हेरियंट मध्ये लॉन्च करण्यात आले आहे.
- फोनची किंमत ४२ हजार ७०० रुपये आहे.
- १२ जीबी रॅम प्लस १२८ जीबी स्टोरेजच्या फोनची किंमत ४६ हजार रुपये आहे.
- कार्बन फायबर ब्लॅक मध्ये लाँच केले.
- टॉप व्हेरियंटमध्ये १२ जीबी रॅम प्लस १२८ जीबी स्टोरेजच्या फोनची किंमत ४९ हजार ५०० रुपये आहे.
Red Magic 6 Pro चे फीचर्स
- Red Magic ६ pro चे फीचर्स Red Magic 6 सारखेच आहेत
- 4500 एमएएच बॅटरी.
- १२० वॉट फास्ट चार्जिंग सपोर्ट.
- Red Magic 6 Pro १२ जीबी रॅम प्लस १२८ जीबी स्टोरेजची किंमत ४९ हजार ५०० रुपये.
- १२ जीबी रॅम प्लस २५६ जीबी स्टोरेजच्या फोनची किंमत ५४ हजार रुपये.
- १६ जीबी रॅम प्लस २५६ जीबी स्टोरेजच्या फोनची किंमत ५९ हजार ६०० रुपये.
- फोनला दोन कलर व्हेरियंटमध्ये ब्लॅक आयरन आणि आइस ब्लेड सिल्वर सोबत लॉन्च केले आहे.
- फोनचे एक ट्रान्सपेरेंट एडिशन सु्द्धा आहे.
- १६ जीबी रॅम प्लस २५६ जीबी स्टोरेज सोबत येते. याची किंमत ६३ हजार रुपये आहे.
- फोनच्या १८ जीबी रॅम प्लस ५१२ जीबी स्टोरेजच्या व्हेरियंटची किमत ७४ हजार २०० रुपये आहे.




