Nana Patekar gets relief in 'Me Too' case
मनोरंजन

नाना पाटेकरांना ‘मी टू’ प्रकरणात दिलासा, न्यायालयाने फेटाळली तनुश्री दत्ताची तक्रार

मुंबई : जेष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांना ‘मी टू’ प्रकरणी अखेर दिलासा मिळाला आहे. अभिनेत्री तनुश्री दत्ताने नाना पाटेकर यांच्याविरोधात तक्रार दाखल केली होती, मात्र, लैंगिक शोषणाचे आरोप सिद्ध करणारे पुरावे उपलब्ध नसल्याचे स्पष्ट करत दंडाधिकारी न्यायालयाने तनुश्रीची याचिका फेटाळून लावली आहे.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

अभिनेत्री तनुश्री दत्ताने नाना पाटेकर, कोरिओग्राफर गणेश आचार्य, दिग्दर्शक अब्दुल सामी सिद्दीकी आणि निर्माता राकेश सारंग यांच्याविरोधात एका डान्स सिक्वेन्स दरम्यान लैंगिक छळाचा आरोप केला होता. याप्रकरणी ओशिवरा पोलीस ठाण्यात या चौघांविरोधात एफआयआर दाखल करण्यात आला होता. तनुश्री दत्ताने नाना पाटेकर आणि इतरांविरोधात अंधेरी दंडाधिकारी न्यायालयात विनयभंग तसेच धमकीची तक्रार दाखल केली होती. यावर दंडाधिकारी निलेश बन्सल यांच्यासमोर सुनावणी झाली. नाना पाटेकर यांच्यावतीने ऍड. अनिकेत निकम यांनी बाजू मांडली. मुंबई पोलिसांनी सादर केलेला क्लोजर रिपोर्ट तसेच पुरेशा पुराव्यांअभावी न्यायालयाने तनुश्रीने दाखल केलेली तक्रार अखेर रद्द केली.

तनुश्री दत्ताने ऑक्टोबर 2018 मध्ये ही तक्रार दाखल केली होती. यामध्ये म्हटले होतं की, 2008 मध्ये ‘हॉर्न ओके प्लीज’च्या एका गाण्याच्या चित्रीकरणादरम्यान पाटेकर यांनी माझा छळ केला होता. पाटेकर यांनी अश्लील किंवा अस्वस्थ करणारे स्टेप करणार नाहीत, असे स्पष्टपणे सांगितले होते तरीही त्यांनी तिला अनुचित प्रकारे स्पर्श केला. पाटेकरांसोबत तनुश्री दत्ताने तक्रारीत आचार्य, सिद्दीकी आणि सारंग यांचेही नाव घेतले होते. या प्रकरणाची चौकशी केल्यानंतर पोलिसांनी अहवाल दाखल केला होता, ज्यामध्ये कोणताही गुन्हा सिद्ध झाला नसल्याचे म्हटले होते. त्यानंतर तनुश्री दत्ताने डिसेंबर 2019 मध्ये निषेध याचिका दाखल केली, ज्यामध्ये आरोपींविरुद्ध पुढील तपास आणि कारवाईची विनंती केली गेली. मात्र, आता न्यायालयाने तनुश्रीची याचिका फेटाळून लावली आहे.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

थोडक्यात घडामोडी टीम
कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत