मुंबई : महाराष्ट्र जीएसटी विभागाने देवरा एक्झिम एलएलपी या फर्मचे भागीदार मेहुल जैन व ऑपरेटर कमलेश जैन यांना ३० कोटी ५२ लाख रुपयांच्या करचुकवेगिरी प्रकरणात अटक केली. आरोपींनी चुकीची इनपुट टॅक्स क्रेडिट (ITC) वजावट घेतल्यामुळे शासनाची महसूल हानी झाली. न्यायालयाने त्यांना ४ सप्टेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली. कारवाईदरम्यान व्यापाऱ्याने चुकीची इनपुट टॅक्स क्रेडिट वजावट केल्यामुळे शासनाची […]
टॅग: Mumbai Court
नाना पाटेकरांना ‘मी टू’ प्रकरणात दिलासा, न्यायालयाने फेटाळली तनुश्री दत्ताची तक्रार
मुंबई : जेष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांना ‘मी टू’ प्रकरणी अखेर दिलासा मिळाला आहे. अभिनेत्री तनुश्री दत्ताने नाना पाटेकर यांच्याविरोधात तक्रार दाखल केली होती, मात्र, लैंगिक शोषणाचे आरोप सिद्ध करणारे पुरावे उपलब्ध नसल्याचे स्पष्ट करत दंडाधिकारी न्यायालयाने तनुश्रीची याचिका फेटाळून लावली आहे. अभिनेत्री तनुश्री दत्ताने नाना पाटेकर, कोरिओग्राफर गणेश आचार्य, दिग्दर्शक अब्दुल सामी सिद्दीकी आणि […]
संजय राऊत यांच्या न्यायालयीन कोठडीत पुन्हा 14 दिवसांची वाढ
मुंबई : शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांच्या न्यायालयीन कोठडीत पुन्हा १४ दिवसांची वाढ झाली असल्यामुळे त्यांचा कोठडीतील मुक्काम वाढला आहे. याप्रकरणी पुढील सुनावणी तीन ऑक्टोबर रोजी होणार आहे. संजय राऊत यांना आज मुंबई सत्र न्यायालयात हजर करण्यात आले. राऊत यांच्याविरोधात पत्राचाळ गैरव्यवहार प्रकरणी शुक्रवारी पुरवणी आरोपपत्र दाखल केले होते. या प्रकरणी आज सुनावणी […]
प्रेमसंबंधातून अल्पवयीन मुलगी झाली गर्भवती, न्यायालयाकडून पॉक्सो कायद्यांतर्गत तरुणाला 10 वर्षांची शिक्षा
मुंबई : मुंबईतील एका विशेष न्यायालयाने अलीकडेच एका 26 वर्षीय व्यक्तीला पॉक्सो कायद्यांतर्गत 15 वर्षांच्या मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याबद्दल दोषी ठरवले आहे. या घटनेत अल्पवयीन मुलीला गर्भधारणा देखील झाली आहे. विशेष न्यायाधीश नाझेरा एस शेख यांनी आरोपी रोहित चंद्रकांत जाधवचा युक्तिवाद फेटाळून लावला की हे संबंध सहमतीने झाले होते आणि त्याला पीडितेच्या अल्पवयीन असण्याबद्दल माहिती […]
तक्रारदार महिलेने माघार घेऊनही भूषण कुमार यांच्यावरील बलात्कार प्रकरणाचा तपास होणार, न्यायालयाने फेटाळला क्लोजर रिपोर्ट…
मुंबई : तक्रारदार महिलेने केस बंद करण्यास आपला कोणताही आक्षेप नसल्याचे सांगूनही टी-सीरीजचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक भूषण कुमार यांच्याविरुद्ध बलात्काराच्या प्रकरणात पोलिसांनी दाखल केलेला क्लोजर रिपोर्ट मुंबईतील मॅजिस्ट्रेट कोर्टाने नुकताच फेटाळला. मेट्रोपॉलिटन मॅजिस्ट्रेट आरआर खान म्हणाले की, तपासाबाबत उल्लेखनीय बाब म्हणजे गुन्हा दाखल झाल्यानंतर, तपास अधिकाऱ्यांनी आरोपीला अटक करण्याचा प्रयत्न केला नाही किंवा आरोपींनी […]
बुली बाई केस : न्यायालयाकडून विशाल झा, श्वेता सिंग आणि मयंक रावत यांना जामीन मंजूर, कारण…
मुंबई : मुंबईतील एका न्यायालयाने १२ एप्रिल रोजी बुली बाई ऍप प्रकरणातील तीन आरोपी विशाल झा, श्वेता सिंग आणि मयंक रावत यांना जामीन मंजूर केला. न्यायदंडाधिकारी केसी राजपूत यांनी अन्य दोन आरोपी नीरजकुमार सिंग आणि ओंकारेश्वर ठाकूर यांना मात्र जामीन नाकारला. झा, सिंह आणि रावत यांना जामीन मंजूर करताना न्यायालयाने बहुतांश दोष इतर आरोपींवर ठेवले. […]
सलमान खानला मोठा दिलासा, पत्रकारासोबत गैरवर्तन प्रकरणी समन्सला 5 मे पर्यंत स्थगिती
मुंबई : अभिनेता सलमान खानला मुंबई उच्च न्यायालयाने मोठा दिलासा दिला आहे. 2019 मध्ये एका पत्रकारासोबत कथित गैरवर्तन प्रकरणी कनिष्ठ न्यायालयाने सलमानला जारी केलेल्या समन्सला मुंबई उच्च न्यायालयाने मंगळवारी 5 मे पर्यंत स्थगिती दिली, तर दंडाधिकारी न्यायालयाने त्याला 9 मे पर्यंत वैयक्तिक हजर राहण्यापासून सूट दिली. दिवाणी न्यायालयाने गेल्या महिन्यात सलमान आणि त्याचा अंगरक्षक नवाज […]
आर्यन खानचा जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला, आर्थर रोड कारागृहात पाठवण्यात आले
मुंबई : शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानचा जामीन अर्ज आज मुंबईतील किल्ला कोर्टच्या दंडाधिकाऱ्यांनी फेटाळला आहे. त्यामुळे आर्यन खानचा अडचणीत आणखी वाढ झाली आहे. आर्यन खान, अरबाज मर्चंट आणि मुनमुन धामेचा यांचे जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळले आहेत. याचा अर्थ आर्यन खानला सध्या तुरुंगात राहावे लागेल. कालची रात्र आर्यनसह इतर आरोपींनी तुरुंगाऐवजी एनसीबी कार्यालयात काढली. आज […]
जबरदस्ती लैंगिक संबंधांमुळे महिलेला अर्धांगवायू, न्यायालय म्हणते- पत्नीशी जबरदस्तीने शारीरिक संबंध बेकायदेशीर नाही
मुंबई : वैवाहिक बलात्काराच्या प्रकरणांमध्ये (पत्नीच्या संमतीशिवाय शारीरिक संबंध ठेवणे) 7 दिवसात देशातील दोन न्यायालयांचे वेगवेगळे निर्णय आले आहेत. केरळ उच्च न्यायालयाने 6 ऑगस्ट रोजी दिलेल्या निकालात म्हटले होते की वैवाहिक बलात्कार क्रूरता आहे आणि घटस्फोटासाठी आधार ठरू शकते. मात्र, मुंबई शहर अतिरिक्त सत्र न्यायालयाने म्हटले आहे की पत्नीच्या इच्छेविरुद्ध संभोग करणे बेकायदेशीर नाही. मुंबईतील […]








