Kangana Ranaut's bodyguard Kumar Hegde arrested on rape charges

कंगना रनौतचा बॉडीगार्ड कुमार हेगडे याला बलात्काराच्या आरोपाखाली अटक

मनोरंजन

नवी दिल्ली : कंगना रनौतचा वैयक्तिक अंगरक्षक कुमार हेगडे याला मुंबई पोलिसांनी बलात्काराच्या आरोपाखाली अटक केली आहे. आरोपी हेगडे लग्न करण्यासाठी कर्नाटकातील त्याच्या गावी गेला होता, तेथे त्याच्या गावात सुरु असलेल्या लग्नाच्या तयारीदरम्यान पोलिसांनी त्याला अटक केली.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कुमार हेगडे दहा दिवसांपासून फरार होता. त्याला शनिवारी दुपारी कर्नाटकातील मांड्या जिल्ह्यातील त्याच्या हेग्गादाहल्ली या गावातून अटक करण्यात आली आणि ट्रान्झिट रिमांडवर येथे आणले. एका ब्युटिशियनने कुमार हेगडे याच्यावर आरोप केले आहेत की त्याने लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर वारंवार बलात्कार केला.

आरोपी कुमार हेगडे याने २७ एप्रिल रोजी त्याच्या आईचा मृत्यू झाल्याचे सांगून पीडित तरुणीकडून ५० हजार रुपये घेतले आणि गावी निघून गेला. परंतु, त्यानंतर 28 एप्रिलपासूनच त्याचा फोन बंद होता. त्यामुळे त्याची लिव्ह इन पार्टनर असलेल्या पीडित तरुणीला त्याच्याशी संपर्क करता येत नव्हता. दरम्यान, काही दिवसांनंतर आरोपी कुमार हेगडे हा लग्न करण्यासाठी त्याच्या गावी गेल्याचं या तरुणीला समजलं. त्यानंतर या तरुणीने तात्काळ पोलिसांकडे जाऊन हेगडेवर बलात्कार, अनैतिक लैंगिक संबंध आणि फसवणूकीचा आरोप करत गुन्हा दाखल केला.

अभिनेत्री कंगना रनौतच्या बॉडीगार्डवर बलात्कार आणि अनैसर्गिक लैंगिक संबंधाचा गुन्हा दाखल

पोलिसांत गुन्हा नोंदवल्यानंतर पोलिसांना देखील त्याच्याशी संपर्क साधता येत नव्हता. त्यानंतर, मुंबई पोलिसांनी कुमार हेगडे याला अटक करण्यासाठी कर्नाटकात जाताना पीडित तरुणी आणि तिची मैत्रीण दिव्या कोटियन यांना मुंबईहून कर्नाटकला नेले होते. पोलिसांनी शनिवारी हेगडे याला अटक केल्यानंतर त्याला मुंबईत आणण्याची सर्व प्रक्रिया पूर्ण केली. त्यानंतर पोलिसांनी कुमार हेगडे याला स्थानिक न्यायालयात हजर देखील केले होते.

बॉलीवूड इंडस्ट्रीला मोठा धक्का, चित्रपट निर्माता रायन स्टीफन यांचे कोरोनामुळे निधन

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत