वाघ, सिंह, बिबट्या, चित्ता अशा प्राण्यांना पाहिल्यावर भल्याभल्यांची भीतीने गाळण उडते. पण एका हरणाचा व्हिडिओ इंटरनेटवर व्हायरल होत आहे, या हरणाकडे पाहून लोक आश्चर्यचकित होत आहेत. ही मनोरंजक क्लिप IFS सुशांत नंदा यांनी 12 मार्च रोजी ट्विटरवर शेअर केली होती. त्यांनी कॅप्शनमध्ये लिहिले की विंडो शॉपिंग बाय चित्ता.
या क्लिपमध्ये आपण पाहू शकतो की, हरणाला पाहताच चित्ता त्याच्यावर हल्ला करतो. पण अचानक त्याच्या लक्षात येते की हरणाची शिकार करणे त्याच्यासाठी अवघड नसून अशक्य आहे. कारण हरिण आणि बिबट्या यांच्यामध्ये लोखंडी कुंपण आहे. चित्त्याला सुरुवातीला याची माहिती नसते. हरीण मात्र चांगलेच जाणत असते की चित्ता त्याला काही करू शकणार नाही. त्यामुळे ते अगदी निवांत दिसते. ते चित्त्याच्या डोळ्यात बघत शांतपणे गवत खात राहते. त्याच्या चेहऱ्यावर भीतीचा लवलेशही दिसत नाही.
Window shopping by Cheetah… pic.twitter.com/x3p7PvdNS6
— Susanta Nanda IFS (@susantananda3) March 12, 2022
हा व्हिडिओ पाहिल्यानंतर ट्विटर युजर्सही अनेक प्रतिक्रिया देत आहेत. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर लोकांनी खूप मजेदार कमेंट्स केल्या आहेत. उदाहरणार्थ, एका युझरने लिहिले की जीवनात मला या हरणाइतका आत्मविश्वास हवा आहे. तर एकाने लिहिले की हरीण चित्त्यापेक्षा जास्त हुशार आहे.





