मुंबई : अभिनेता करण मेहराला जामीन मंजूर झाला आहे. करणची पत्नी आणि अभिनेत्री निशा रावल हिने करणविरोधात मारहाण व प्राणघातक हल्ल्याची तक्रार दाखल केली होती. आता जामीन मिळाल्यानंतर करण बाहेर आला असून त्याने धक्कादायक खुलासा केला आहे.
करण म्हणाला कि, “हे सर्व लग्नानंतर इतक्या वर्षानंतर घडले याच खूप वाईट वाटतं आहे. बर्याच काळापासून नात्यात काही विचित्र गोष्टी घडत होत्या. एकमेकांपासून वेगळे होण्याविषयी चर्चा सुरु होती. हे सर्वकाही शांतपणे सुरळीत करण्याचा प्रयत्न करत होतो.” करणने सांगितले की निशाचा भाऊही त्यांच्याशी चर्चा करत होता. काल निशाचा भाऊ त्याला भेटायला आला होता.
करणने आरोप केला की निशा आणि तिचा भाऊ यांनी घटस्फोटानंतर पोटगी म्हणून मागितलेली रक्कम खूप जास्त होती. ती रक्कम देणे मला शक्य नसल्याचं मी स्पष्टपणे सांगितलं. त्यानंतर रोहितने कायदेशीर मार्गाने जाण्याचे सुचविले. मग मीपण कायदेशीर मार्गानेच जाऊ, असे म्हणालो होतो. त्यानंतर मी माझ्या आईच्या खोलीत गेलो, मी माझ्या आईशी बोलत होतो, तेव्हा निशा बेडरूममध्ये आली आणि तिने माझ्या आईवडिल आणि भावाविषयी वाईट शब्दांचा वापर केला आणि त्यांना शिव्या दिल्या. त्यानंतर तिने आरडाओरडा केला आणि त्यानंतर निशा माझ्यावर थुंकली. मी निशाला बाहेर जाण्यास सांगितले तेव्हा ती मला ‘मी काय करते ते पहा’ असे म्हणाली आणि बाहेर निघून गेली. तिने भिंतीवर स्वतःचे डोके आपटले आणि सगळ्यांना सांगितले की मी ते केले आहे, असा आरोप करणने निशावर केला आहे.
अभिनेता करण मेहराचा जामीन मंजूर, पत्नीने केला होता प्राणघातक हल्ल्याचा आरोप
करणने निशाच्या भावाने त्याला मारहाण केल्याचा देखील आरोप केला आहे. निशाच्या भावाने माझ्या कानशिलात लगावली आणि छातीवरही ठोसा मारला. करणने दावा केला की सत्य काय आहे हे पोलिसांनाही ठाऊक आहे आणि म्हणूनच त्यांनी काहीही केले नाही. जर त्यांनी खोटी केस केली, तर सत्य बाहेर येईल. उद्या जर चौकशी झाली तर सत्य बाहेर येईल,” असे करण म्हणाला.
‘ये रिश्ता क्या कहलाता है’ फेम अभिनेता करण मेहराला अटक




