मुंबई : अभिनेत्री गेहना वसिष्ठला गुन्हे शाखेच्या प्रॉपर्टी सेलने अटक केली आहे. अश्लील व्हिडिओ शूटिंग व वेबसाइटवर अपलोड केल्यामुळे ही कारवाई करण्यात आली आहे. तिला आज मुंबई न्यायालयात हजर केले जाणार आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, “तिने 87 अश्लील / पॉर्न व्हिडिओ शूट केले आहेत आणि ते आपल्या वेबसाइटवर अपलोड देखील केले आहेत. हे व्हिडीओ पाहण्यासाठी सदस्यता घ्यावी लागते. या वाहिनीची सदस्यता घेण्यासाठी 2000 रुपये द्यावे लागतात.” मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तीन जणांनी तक्रार केली होती कि, पॉर्न फिल्ममध्ये अभिनय करण्यास त्यांना भाग पाडले गेले.
गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये, गेहाना वसिष्ठला हृदयविकाराचा झटका आला होता आणि शूटदरम्यान तिला तातडीने रुग्णालयात दाखल करावे लागले होते. ALT बालाजीच्या अॅडल्ट वेब सीरिज गंदी बात या वेब सीरिजमध्ये गेहानाने तिच्या बोल्ड भूमिकेमुळे प्रसिद्धी मिळविली. तिने तिचे स्वतःचे मोबाईल ऍप्लिकेशन देखील लाँच केले आहे, जिथे ती वारंवार तिचे बोल्ड व्हिडिओ पोस्ट करते.




