lic board to meet tuesday for ipo dates issue likely opens may 4
अर्थकारण देश

LIC IPO; एलआयसीच्या आयपीओबाबत खूप मोठी बातमी; आता प्रतीक्षा संपली ‘या’ तारखेला आयपीओ ओपन होईल..

नवी दिल्ली: एलआयसीच्या आयपीओची सर्वांनाच उत्सुकता लागली असताना याबाबत मोठी बातमी हाती आली आहे. हा आयपीओ ४ मे रोजी ओपन होईल आणि ९ मे पर्यंत गुंतणूक करता येईल, असे सूत्रांकडून सांगण्यात येत आहे. एलआयसीची बोर्ड मीटिंग उद्या होण्याची शक्यता असून या बैठकीत यावर शिक्कामोर्तब केले जाईल, असेही सूत्रांनी पुढे नमूद केले.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

भारतीय आयुर्विमा महामंडळा’ची पाच टक्के हिस्साविक्री करण्याच्या उद्देशाने केंद्र सरकारने प्राथमिक भागविक्रीसाठी १३ फेब्रुवारी रोजी अर्ज केला होता. मात्र, आता प्रत्यक्षात ३.५ टक्के हिस्साविक्री करण्यात येणार आहे. त्यामुळे ‘आयपीओ’ मधून भांडवल उभारणीचे लक्ष्य घटून २१ हजार कोटी रुपयांचे झाले आहे. ही भांडवल उभारणी करण्यासाठी ‘एलआयसी’ सुमारे २२ हजार कोटी समभाग विक्रीला आणणार आहे. केंद्र सरकारने सुधारित ‘रेड हेरिंग प्रॉस्पेक्टस’ अर्थात ‘आयपीओ’चा अर्ज सेबीकडे नव्याने दाखल केला असता त्यास सेबीकडून मंजुरी मिळाल्याचे वृत्त सीएनबीसी टीव्ही १८ या वृत्तवाहिनीने दिले आहे. सुधारित ‘रेड हेरिंग प्रॉस्पेक्टस’मुळे ‘एलआयसी’चे मूल्य सहा लाख कोटी रुपये होऊ शकेल. याआधी सरकारने ‘एलआयसी’चे मूल्य १७ लाख कोटी रुपये असेल, असे म्हटले होते.

‘एलआयसी’च्या ‘आयपीओ’द्वारे भांडवल उभारणीचे, अर्थात हिस्साविक्रीचे लक्ष्य सरकारने घटवले असले तरीही हा आजवरचा सर्वांत मोठा ‘आयपीओ’ ठरणार आहे. हा बहुप्रतीक्षित ‘आयपीओ’ मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात ४ मे रोजी येण्याची शक्यता आता वाढली असल्याचे वृत्त आता हाती आले आहे. त्यामुळे या आयपीओची प्रतीक्षा लवकरच संपणार हे स्पष्ट झाले आहे.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

थोडक्यात घडामोडी टीम
कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत