15-year-old sister in law kidnapped and raped
क्राईम महाराष्ट्र मुंबई

मुंबईत खळबळ! अंगात दैवी शक्ती असल्याचे सांगत तरुणीवर तीन वर्षे बलात्कार, स्वयंभू धर्मगुरूचे घृणास्पद कृत्य

मुंबई : एका 58 वर्षीय व्यक्तीने आपल्या अंगात दैवी शक्ती असल्याचे भासवून सलग तीन वर्षे तरुणीवर बलात्कार केल्याची संतापजनक घटना वर्सोवा परिसरातून समोर आली आहे. आरोपीने पीडितेवर 2019 पासून अनेकदा बलात्कार केल्याचा आरोप आहे. सुरुवातीला प्रसादामध्ये गुंगीचे औषध देऊन बलात्कार केल्यानंतर या व्यक्तीने नंतर तिला धमकावून, भीती दाखवून हा प्रकार सुरु ठेवला. अखेर सततच्या अत्याचारांना कंटाळून पीडित मुलीने पोलिसांत तक्रार दाखल केली. पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले आहे.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी सुरेशकुमार हा एका प्रसिद्ध आयटी कंपनीमध्ये नोकरीला आहे. तो अंधेरीच्या म्हाडा कॉलनी परिसरात वास्तव्यास आहे. काही लोकांनी ओळख करून दिल्यानंतर पीडितेचे कुटुंब सुरेश कुमार रवींद्र नारायण अवस्थी नावाच्या स्वयंभू धर्मगुरूच्या संपर्कात आले. त्याने आपल्या अंगात दैवी शक्ती असल्याचे भासवून या कुटुंबातील मुलीला ऑक्टोबर २०१९ मध्ये आपल्या घरी बोलावून प्रसाद खायला दिला. आरोपीने प्रसादामधून गुंगीचे औषध देऊन तिच्यावर बलात्कार केला आणि त्याचे मोबाइलने चित्रीकरण केले. त्यावेळी ही मुलगी अल्पवयीन होती. तिचे आक्षेपार्ह फोटो इंटरनेटवर अपलोड करण्याची धमकी दिली. मोबाइलमधील चित्रीकरणाच्या आधारे मुलीला ब्लॅकमेल करून अंधेरी आणि कुर्ला येथील निवासस्थानी नेऊन तो तिच्यावर लैंगिक अत्याचार करू लागला.

अखेर सततच्या अत्याचारांना कंटाळून मुलीने हा प्रकार घरी सांगितला. त्यानंतर त्यांनी सुरेशकुमार याच्या विरुद्ध वर्सोवा पोलिस ठाण्यात तक्रार केली. त्यांच्या तक्रारीवरून वर्सोवा पोलिसांनी सुरेशकुमार याच्या विरोधात बलात्कार, धमकी तसेच पॉक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला. रविवारी भारतीय दंड संहिता आणि लैंगिक गुन्ह्यांपासून मुलांचे संरक्षण (POCSO) कायद्याच्या तरतुदींनुसार आरोपीला अटक करण्यात आली. अधिक चौकशी सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

थोडक्यात घडामोडी टीम
कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत