father killed seven year old son police arrested
क्राईम बीड महाराष्ट्र

बीडमध्ये खळबळ! मामाने केली 4 वर्षांच्या भाच्याची हत्या, झोपेतच केले धारदार हत्याराने वार

बीड : सख्ख्या मामानेच आपल्या चार वर्षीय भाच्याचा झोपेतच हत्याराने वार करून खून केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. ही घटना शनिवारी मध्यरात्री नागापूर (ता. परळी) येथे घडली. कार्तिक विकास करंजकर असे या चिमुकल्याचे नाव आहे. तो आपल्या आईसोबत मामाच्या गावी आलेला होता, यादरम्यान सख्ख्या मामानेच त्याचा निर्घृण खून केला. पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले आहे.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी शहाणिक लक्ष्मण चिमनकर हा परळी तालुक्यातील दौनापूर येथे आपल्या कुटुंबासह नागापूर कॅम्प परिसरातील गायरान जमिनीवर गेल्या काही वर्षांपासून राहतो. त्याची विवाहित बहीण सुरेखा विकास करंजकर (रा. लाडेगाव,ता.केज) तीन दिवसांपूर्वीच नागापूर येथे आली होती. सोबत ती आपला चार वर्षीय मुलगा कार्तिक विकास करंजकर यालाही घेऊन आली होती.

दरम्यान, आरोपी शहाणिक लक्ष्मण चिमनकर हा नेहमी आपल्या आईला त्रास देत असायचा, याच कारणावरून शनिवारी दोघा बहीण-भावात वाद झाला. त्यामुळे सुरेखा रविवारी परत आपल्या सासरी जाणार होती. परंतु शनिवारी मध्यरात्री सर्वजण झोपेत असताना मुलाचा मामा शहाणिक लक्ष्मण चिमणकर (२५) याने घरातील भाजी कापण्याची बतई घेऊन झोपेतच असलेल्या चिमुकल्याचे तोंड दाबून बतईने पोटात वार केले. मुलाचा रडण्याचा आवाज आल्यानंतर त्याची आई व आजी जाग्या झाल्या.

त्याची आई व आजी यांनी चिमुकल्या कार्तिकला तात्काळ परळी व नंतर अंबाजोगाई व लातूर येथे हलवले. परंतु कार्तिकचे प्राण वाचू शकले नाही. दरम्यान, परळी ग्रामीण पोलिस ठाण्यात घटनेची माहिती समजताच परळी ग्रामीण पोलिस नागापूर कॅम्प येथे घटनास्थळी पोहोचले. गुन्हा दाखल करून घटनेचा पुढील तपास ग्रामीण पोलिस करत आहेत. याप्रकरणी अपर पोलिस अधीक्षक नेरकर यांनी घटनास्थळाला भेट दिली आहे. पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतल्याची माहिती मिळाली आहे.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

थोडक्यात घडामोडी टीम
कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत