क्राईम देश

१३ वर्षांच्या मुलाला पॉर्न पाहण्याचे व्यसन, ५ वर्षांच्या मुलीवर बलात्काराचा प्रयत्न करत केली हत्या

छत्तीसगड : १३ वर्षांच्या मुलाने ५ वर्षांच्या मुलीवर बलात्काराचा प्रयत्न करत तिची हत्या केल्याची घटना समोर आली आहे. पोलिसांनी आरोपी मुलाला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने गुन्हा कबूल केला आहे. धक्कादायक बाब म्हणजे आरोपी मुलाने पोलिसांना सांगितले की त्याला पॉर्न पाहण्याचे व्यसन आहे.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

एका बांधकाम सुरू असलेल्या निवासी वसाहतीत मुलीवर बलात्कार आणि हत्येचा प्रयत्न केल्याच्या आरोपाखाली पोलिसांनी या मुलाला अटक केल्याचे पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले. बिलासपूर जिल्ह्यातील सरकंडा पोलिस स्टेशन हद्दीतील ही घटना आहे. बिलासपूर जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक (एसपी) रजनीश सिंह यांनी सांगितले की, सरकंडा परिसरातील एका बांधकाम सुरू असलेल्या वसाहतीत सोमवारी संध्याकाळी एक मुलगी बेपत्ता झाल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती, तिचा मृतदेह मंगळवारी एका बांधकाम सुरू असलेल्या घरात आढळला. सिंह म्हणाले की, माहिती मिळाल्यानंतर पोलिसांचे पथक घटनास्थळी पाठवण्यात आले आणि मुलीचा मृतदेह ताब्यात घेण्यात आला. तिच्या डोक्यावर आणि शरीराच्या इतर भागांवर जखमांच्या खुणा होत्या.

मुलीचे पालक मजूर:
ज्या ठिकाणी ही घटना घडली तेथे शेकडो घरांचे बांधकाम सुरू आहे आणि एक हजाराहून अधिक पुरुष आणि महिला कामगार त्यांच्या मुलांसह तेथे राहतात. ज्या मुलीची हत्या झाली तिचे पालकही कामगार आहेत आणि ते कॉलनीतीलच कामगारांच्या निवासस्थानी राहतात.

पोलिस अधीक्षकांनी सांगितले की, घटनेच्या तपासादरम्यान असे आढळून आले की आरोपी बांधकाम सुरू असलेल्या वसाहतीत राहतो. सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या तपासणीदरम्यान एक मुलगा ह्या मुलीला सोबत घेऊन जाताना दिसला. चौकशीदरम्यान मुलाने आपला गुन्हा कबूल केला. चौकशीदरम्यान मुलाने सांगितले की तो अश्लील चित्रपट पाहत असे. संध्याकाळी, जेव्हा त्याने मुलीला एकटीला पाहिले तेव्हा तो तिला आपल्यासोबत एका बांधकाम सुरू असलेल्या घरात घेऊन गेला आणि तिच्यावर बलात्कार करण्याचा प्रयत्न केला. जेव्हा मुलीने विरोध केला तेव्हा त्याने तिला दगड आणि लाकडी काठीने वार करून ठार मारले.

सिंह म्हणाले की, मुलाला ताब्यात घेण्यात आले आहे. आरोपी अल्पवयीन असल्याने त्याच्यावर बाल कल्याण कायद्यातील तरतुदींनुसार कारवाई केली जात आहे. त्याला लवकरच बाल न्याय मंडळासमोर हजर केले जाईल.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

थोडक्यात घडामोडी टीम
कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत