खेळातून निवृत्ती घेऊन 13 वर्षांहून अधिक काळ लोटला असला तरी, ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार स्टीव्ह वॉ सतत भारतात येत असतो. 2009 मध्ये त्याने स्थापन केलेल्या स्टीव्ह वॉ फाऊंडेशनसह विविध धर्मादाय कार्यांमध्ये त्याचा सहभाग आणि तज्ञ पॅनेलचा भाग म्हणून तो अनेकदा येथे येत असतो. तथापि, मंगळवारी, त्याने पूर्णपणे वेगळ्या कारणासाठी वाराणसीला भेट दिली. सिडनीतील त्याच्या मित्राच्या अस्थिकलशाचे […]
क्रीडा
Stay updated with the latest sports news from Maharashtra and India. Our Sports section covers national and regional updates, match results, player performances, and all the exciting developments in football, cricket, athletics, and more.
ICC World Women’s Cup : वेस्ट इंडिजला धूळ चारत भारताचा १५५ धावांनी दणदणीत विजय
एकदिवसीय महिला विश्वचषक स्पर्धेमध्ये आज भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील सामना पार पडला. हॅमिल्टन येथे झालेल्या या सामन्यात भारताने इंडिजला धूळ चारत १५५ धावांनी विजय नोंदवला आहे. भारताने वेस्ट इंडिजसमोर ३१७ धावांचे तगडे आव्हान उभे केले होते. हे लक्ष्य गाठत असताना वेस्ट इंडिजचा संघ अवघ्या १६२ धावांवर गारद झाला. भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील सामना […]
श्रीशांतची क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा, चाहत्यांना मोठा धक्का…
भारतीय क्रिकेट खेळाडू एस. श्रीशांतने व्यावसायिक क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. श्रीशांत 2007 टी20 विश्वचषक आणि 2011 विश्वचषक विजेत्या भारतीय संघाचा सदस्य होता. तो नुकताच रणजी ट्रॉफीमध्ये केरळकडून खेळत होता. मात्र दुखापतीनंतर त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले. यावेळी त्याला आयपीएल 20022 च्या लिलावात कोणत्याही संघाने विकत घेतले नाही. श्रीशांतने सोशल मीडियावर व्यावसायिक क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्याची […]
दिग्गज क्रिकेटपटू शेन वॉर्नचा मृत्यू नैसर्गिकच, थायलंडच्या अधिकाऱ्यांनी केली पुष्टी
ऑस्ट्रेलियाचा दिग्गज क्रिकेटपटू शेन वॉर्नचा मृत्यू नैसर्गिक कारणाने झाल्याची पुष्टी थायलंडच्या अधिकाऱ्यांनी केली आहे. थायलंडमध्ये शुक्रवारी 52 वर्षीय शेन वॉर्नचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. त्यानंतर वेगवेगळ्या चर्चांना उधाण आले होते. राष्ट्रीय पोलीस उपप्रवक्ता किसाना फथनाचारोएन यांनी एका निवेदनात म्हटले आहे की “आज तपासकर्त्यांना शेन वॉर्नचा शवविच्छेदन अहवाल मिळाला, ज्यात वैद्यकीय मतानुसार मृत्यूचे कारण नैसर्गिक असल्याचे […]
ब्रेकिंग! दिग्गज क्रिकेटपटू शेन वॉर्न यांचे निधन
ऑस्ट्रेलियाचा महान क्रिकेटपटू शेन वॉर्न यांचे वयाच्या ५२ व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. वॉर्न यांच्या व्यवस्थापनाने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की ‘शेन त्याच्या व्हिलामध्ये प्रतिसाद देत नसल्याचे आढळले आणि वैद्यकीय कर्मचार्यांच्या सर्वोत्तम प्रयत्नांनंतरही त्याला बरे करता आले नाही. ऑस्ट्रेलियाचा माजी फिरकीपटू शेन वॉर्न या खेळातील सर्वकालीन महान खेळाडूंपैकी एक मानला जातो, त्यांचे थायलंडमध्ये संशयास्पद […]
चेन्नई सुपर किंग्जला मोठा झटका, दीपक चहर स्पर्धेतून बाहेर
IPL २०२२ : इंडियन प्रीमियर लीगचा 15वा सीझन 26 मार्चपासून सुरू होणार आहे. 14 किंवा 15 मार्चपासून सर्व संघ आपला सराव सुरू करतील. मात्र, याआधी चेन्नई सुपर किंग्जला मोठा धक्का बसला आहे. उत्कृष्ट फॉर्ममध्ये असलेला गोलंदाज अष्टपैलू दीपक चहर आयपीएल 2022 च्या पहिल्या काही सामन्यांमध्ये खेळू शकणार नाही. वेस्ट इंडिजविरुद्धच्या मालिकेत दीपक चहरला दुखापत झाली […]
रोहित शर्मा आता कसोटीचाही कर्णधार, पुजारा आणि अजिंक्य रहाणेला कसोटी संघात स्थान नाही
भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) शनिवारी श्रीलंकेविरुद्धच्या आगामी टी-20 आणि कसोटी मालिकेसाठी संघाची घोषणा केली. रोहित शर्माकडे कसोटी संघाची कमान सोपवण्यात आली आहे, तर विराट कोहली आणि ऋषभ पंत यांना टी-२० मालिकेसाठी विश्रांती देण्यात आली आहे. सलामीवीर केएल राहुल दुखापतीमुळे वेस्ट इंडिजविरुद्धच्या वनडे मालिकेतून बाहेर आहे. जसप्रीत बुमराह दोन्ही संघाचा उपकर्णधार असेल. मोठी बातमी म्हणजे […]
IPL Auction 2022 : पंजाब किंग्जने शिखर धवनला 8.25 कोटींना खरेदी केले, अश्विनला मिळाले 5 कोटी
शिखर धवन आणि आर अश्विन : इंडियन प्रीमियर लीग (IPL) च्या 15 व्या हंगामाचा लिलाव सुरू झाला आहे. मेगा लिलावाच्या पहिल्या दिवशी पहिली बोली भारतीय क्रिकेटपटू शिखर धवनची आली. त्याला पंजाब किंग्सने 8.25 कोटींना विकत घेतले. दुसरीकडे राजस्थान रॉयल्सने ऑफस्पिनर आर अश्विनला पाच कोटी रुपयांना विकत घेतले.
टीम इंडियाचा नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय, धवन-कुलदीपचे पुनरागमन
भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील तिसऱ्या आणि शेवटच्या वनडेमध्ये रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. टीम इंडियाने प्लेइंग इलेव्हनमध्ये 3 बदल केले आहेत. केएल राहुलच्या जागी शिखर धवन, दीपक हुडाच्या जागी श्रेयस अय्यर आणि युजवेंद्र चहलच्या जागी कुलदीप यादव यांना संधी मिळाली आहे. कायरन पोलार्ड अजूनही तंदुरुस्त नाही आणि त्याच्या जागी निकोलस […]
मोठी बातमी! IPL चे टायटल स्पॉन्सर म्हणून टाटा ग्रुपने घेतली चिनी कंपनी विवोची जागा
टाटा समूह पुढील वर्षापासून इंडियन प्रीमियर लीग (IPL) चे शीर्षक प्रायोजक म्हणून चिनी मोबाईल निर्माता विवोची जागा घेईल, असे क्रिकेट लीगचे अध्यक्ष ब्रिजेश पटेल यांनी सांगितले आहे. आयपीएल गव्हर्निंग कौन्सिलच्या मंगळवारी झालेल्या बैठकीत हा महत्वाचा निर्णय घेण्यात आला. २०२३ पासून ही लीग ‘टाटा आयपीएल’ म्हणून ओळखली जाणार आहे. IPL आणि Vivo मधील टायटल स्पॉन्सरशिप डीलची […]









