माजी केंद्रीयमंत्री जसवंत सिंह यांचे आज निधन झाले. ते ८२ वर्षांचे होते. केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी ट्विटद्वारे याबाबत माहिती दिली आहे. याचबरोबर पंतप्रधान मोदी यांनी देखील जसवंत सिंह यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केले आहे. अगोदर एका सैनिकाच्या रुपात आणि नंतर राजकारणातील आपल्या प्रदीर्घ कार्यकाळाद्वारे जसवंत सिंह यांनी देशाची कायम सेवा केली असल्याचे पंतप्रधान मोदी […]
राजकारण
Stay updated with the latest political news from Maharashtra and India. Our Politics News section covers government policies, political events, leadership updates, and all major developments at both state and national levels.
जेव्हा भारत कोणाशी मैत्रीचा हात पुढे करतो तेव्हा तो तिसऱ्या देशाविरोधात नसतो – पंतप्रधान
दिल्ली : जेव्हा भारत कोणाशी मैत्रीचा हात पुढे करतो तेव्हा तो तिसऱ्या देशाविरोधात नसतो, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेत केले. भारतानं कायमचं विश्वकल्याणाला प्राधान्य दिलं असल्याचंही त्यांनी यावेळी जगाला सांगितंल. मोदी म्हणाले, “भारतानं जर कोणाला मैत्रीचा हात दिला तर त्याचा अर्थ तो कधीच तिसऱ्या देशाच्या विरोधात आहे असा होत नाही. भारत […]
देवेंद्र फडणवीस आणि संजय राऊत यांच्या भेटीमुळे सर्वांच्या भुवया उंचावल्या.. जाणून घ्या प्रतिक्रिया
मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणात कधीही काहीही घडू शकतं, आम्ही कोणतीही गोष्ट नाकारत नाही अशी सूचक प्रतिक्रिया विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर यांनी दिली. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि संजय राऊत यांनी भेट घेऊन दोन तास चर्चा केल्याची माहिती समोर आली आहे. भेटीची माहिती समोर आल्याने महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात विविध आडाखे बांधले जात आहेत. […]
पंकजा मुंडे- धनंजय मुंडे यांच्यात पुन्हा वादाची ठिणगी
बीड: धनंजय मुंडे यांनी आपण वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याला मदत मिळवून दिल्याचा दावा केला आहे तर पंकजा मुंडे यांच्याकडून स्वतः प्रयत्न केल्याचं म्हटलं जात आहे. परळी येथील वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याला १० कोटी ७७ लाख रुपयांची थकहमी मिळाल्यानंतर श्रेयवादावरून मुंडे बहीण-भावात पुन्हा एकदा वादाची ठिणगी पडली आहे. आहे. यावरून धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे पुन्हा […]
कृषी विधेयकांना विरोध; शेतकरी संघटनांचे देशव्यापी आंदोलन
कृषी विधेयकांना विरोध आज शेतकरी संघटनांचे देशव्यापी आंदोलन, विविध शेतकरी संघटनांची अखिल भारतीय किसान संघर्ष समन्वय समिती, अखिल भारतीय शेतकरी संघटना, भारतीय किसान संघटना, अखिल भारतीय किसान महासंघ या देशव्यापी संघटनांनी भारत बंदची हाक दिली आहे. प्रामुख्याने पंजाब, हरियाणा, कर्नाटकमध्ये झालेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाला काँग्रेस कार्यकर्त्यांनीही सक्रिय पाठिंबा दिला. या आंदोलनात ३०हून अधिक शेतकरी संघटना सहभागी […]
राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांना करोनाची लागण
मुंबई : राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांना करोनाची लागण झाली. यांनी स्वत: ट्विट करत ही माहिती दिली ते ट्विटमध्ये म्हटलं आहे की, काल मी माझी कोव्हीड-१९ ची तपासणी करून घेतली असता ती पॉझिटिव्ह आली आहे. आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने प्रकृती ठीक आहे. गेल्या काही दिवसांत माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांनी योग्य ती काळजी घ्यावी आणि स्वतःची […]
आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र; रेस्टॉरंटमध्ये खानपानाला परवानगी द्या
मुंबई : महाराष्ट्रात हॉटेल व्यवसायावर आजही निर्बंध कायम आहेत. महाराष्ट्र सरकारने एक जूनपासून राज्यात हॉटेल, रेस्टॉरंट उघडायला अनुमती दिली. पण ही परवानगी फक्त पार्सल आणि होम डिलिव्हरीपुरता मर्यादीत आहे. हॉटेलमध्ये बसून खाण्यापिण्यावर अद्यापी बंदी कायम आहे त्यामुळे लॉकडाउनचा मोठा फटका हॉटेल व्यवसायाला बसला आहे. सरकारने राज्य परिवहन सेवा, मुंबईत बेस्ट आणि पुण्यात पीएमपीएमएलला पूर्ण क्षमतेने […]
डॉ. काशिनाथ घाणेकर चित्रपट पाहून राज ठाकरे म्हणाले…एकदम कडक…
मराठी रंगभूमीवरील पहिले सुपरस्टार अशी ओळख असलेल्या डॉ. काशिनाथ घाणेकर यांच्या आयुष्यावरील सिनेमा दोन वर्षांपूर्वी प्रदर्शित झाला होता. काही दिवसांपूर्वी हा सिनेमा ‘नेटफ्लिक्स’ ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाला. हा सिनेमा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी बघितला आणि त्यांनाही सिनेमाचं कौतुक करण्याचा मोह आवरला नाही. सिनेमा बघून भारावून गेलेल्या राज ठाकरे यांनी पोस्ट ट्विट करून […]
देशाचे रेल्वे राज्यमंत्री सुरेश अंगडी यांचे कोरोनामुळे निधन
दिल्ली: देशाचे रेल्वे राज्यमंत्री सुरेश अंगडी यांचे निधन एम्स हॉस्पिटलमध्ये (AIIMS) झाले त्यांना कोरोना झाला होता ते ६५ वर्षांचे होते. त्यांच्या निधनाचे वृत्त येताच राष्ट्रपती रामनाथ कोविंद, पंतप्रधान नरेंद्र मोदी, मोदी मंत्रिमंडळातील सर्व मंत्री तसेच माजी पंतप्रधान एच. डी. देवेगौडा यांनी शोक व्यक्त केला. याआधी कर्नाटकमधून राज्यसभा खासदार झालेल्या अशोक गस्टी यांचे कोरोनामुळे निधन झाले […]
एकनाथ खडसे राष्ट्रवादीत प्रवेश करणार?
एकनाथ खडसे यांनी अनेकदा जाहीरपणे आपल्याला इतर पक्षांकडून ऑफर असल्याचंही सांगितलं आहे. त्यातच आता एकनाथ खडसे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे पण चंद्रकांत पाटील यांनी एकनाथ खडसे अशी कोणती भूमिका घेणार नाहीत असा विश्वास व्यक्त केला आहे. राष्ट्रवादीकडून याबाबत कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. दरम्यान कोल्हापुरात आयोजित पत्रकार परिषदेत भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत […]










