मुंबई : भाजप नेते गणेश नाईक यांच्यावर लैंगिक अत्याचार आणि बंदुकीचा धाक दाखवून धमकावल्याप्रकरणी गुन्हा दाखल आहे. नेरुळ आणि सीबीडी पोलीस ठाण्यातील दोन्ही गुन्ह्यात त्यांच्या अडचणीत वाढ होताना दिसत आहे. ठाणे सत्र न्यायालयाने गणेश नाईक यांच्या विरोधातील दोन्ही गुन्ह्यात अटकपूर्व जामीन नाकारल्यानंतर गणेश नाईक आज हायकोर्टात धाव घेण्याची शक्यता आहे. दरम्यान, ठाणे सत्र न्यायालयानं गणेश […]
राजकारण
Stay updated with the latest political news from Maharashtra and India. Our Politics News section covers government policies, political events, leadership updates, and all major developments at both state and national levels.
राज ठाकरे यांच्या ताफ्यातील तीन गाड्या एकमेकांवर धडकल्या
अहमदनगर : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या ताफ्यातील गाड्यांना अपघात झाल्याची माहिती मिळाली आहे. राज ठाकरे यांच्या ताफ्यातील मागील बाजूला असलेल्या तीन गाड्या एकमेकांवर धडकल्याचे समजते. दोन गाड्यांच्या बोनेटचे नुकसान झाल्याची माहिती आहे. दरम्यान, या घटनेत कोणीही जखमी झालेले नाही. नगर-औरंगाबाद महामार्गावर घोडेगाव (ता. नेवासा) येथे ही घटना घडली आहे. यात दिग्दर्शक केदार […]
योगींबाबत राज ठाकरे यांचे मतपरिवर्तन कसे झाले? हा पीएचडीचा विषय, संजय राऊत यांची खोचक टीका
मुंबई : महाराष्ट्र सरकार भोंग्यांबाबत सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे पालन करेल, असे शिवसेना नेते संजय राऊत यांनी म्हटले आहे. ते मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते. यावेळी राऊत यांनी म्हटले कि, उत्तर प्रदेशमध्ये मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी भोंग्यांबाबत तोडगा काढला. महाराष्ट्रातही सरकारने असाच तोडगा काढण्यासाठी सर्वपक्षीय बैठक बोलावली होती. मात्र, भाजपचे नेते या बैठकीला आले नाहीत. त्यांना भोंग्यांच्या […]
मोठी बातमी! राणा दाम्पत्याचा कोठडीतील मुक्काम वाढला; १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी
मुंबई, २४ एप्रिल : सामाजिक तेढ निर्माण करणारं विधान केल्याप्रकरणी अटकेत असलेल्या राणा दाम्पत्याला वांद्रे न्यायालयानं कोठडी सुनावली आहे. राणा दाम्पत्याला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. सुट्टीकालीन न्यायालयानं हा निकाल दिला. या प्रकरणातील पुढील सुनावणी २९ एप्रिलला होईल. त्याआधी उच्च न्यायालयात दाद मागण्याचा पर्याय राणा दाम्पत्याकडे उपलब्ध आहे. राणा दाम्पत्याला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी […]
नरेंद्र मोदींमुळे राणा दाम्पत्याने ‘मातोश्री’वर जाण्याची भूमिका बदलली, रवी राणा यांनी दिली माहिती…
मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या ‘मातोश्री’ या निवासस्थानाच्या बाहेर हनुमान चालीसाचं पठण करण्याची घोषणा करणाऱ्या खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांनी आपली भूमिका बदलली आहे. राणा दाम्पत्याविरोधात शिवसैनिकांनी आक्रमक भूमिका घेतल्याने मुंबईत काही ठिकाणी तणावाची स्थितीही निर्माण झाली होती. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मुंबई दौऱ्यामुळे नवनीत राणा आणि रवी राणा यांनी […]
मोठी बातमी! नवाब मलिक यांना मोठा झटका, सर्वोच्च न्यायालयानेही फेटाळली याचिका
नवी दिल्ली : मनी लाँड्रिंग प्रकरणातील न्यायालयीन कोठडीतून सुटकेची मागणी करणारी महाराष्ट्राचे मंत्री नवाब मलिक यांची याचिका सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी फेटाळून लावली, ज्याची अंमलबजावणी संचालनालय (ईडी) मार्फत चौकशी केली जात आहे. न्यायमूर्ती डीवाय चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने सांगितले की, सर्वोच्च न्यायालय या टप्प्यावर हस्तक्षेप करू शकत नाही. न्यायमूर्ती चंद्रचूड म्हणाले, “तुम्ही योग्य न्यायालयात जामीनासाठी अर्ज […]
डॉ. सुनील गायकवाड यांना लेजंड दादासाहेब फाळके पुरस्कार घोषित
मुंबई : लातूर लोकसभेचे माजी खासदार प्रोफेसर डॉक्टर सुनील बळीराम गायकवाड यांना कृष्णा चव्हाण फाउंडेशन, मुंबई यांच्याकडून दिला जाणारा अत्यंत सन्मानाचा “लेजंड दादासाहेब फाळके पुरस्कार, २०२२” मिळाला आहे. हा पुरस्कार मुंबई येथे 4 मे रोजी एका शानदार पुरस्कार समारोह कार्यक्रमात त्यांना दिला जाणार आहे. डॉ. सुनील बळीराम गायकवाड यांनी सोळाव्या लोकसभेत अनेक महत्त्वपूर्ण कामे केली. […]
सिलबंद विदेशी मद्याच्या विक्री परवान्यांसाठी नवीन दोन श्रेणी, मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता
राज्यात सिलबंद विदेशी मद्याच्या किरकोळ विक्रीच्या परवान्यासाठी क्षेत्रफळ तसेच सुविधांच्या आधारे नवीन दोन श्रेणी तयार करण्यास मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते. यानुसार सध्या अस्तित्वात असलेल्या एफ.एल.-2 परवान्यांचे क्षेत्रफळ तसेच सुविधांच्या आधारे नवीन दोन श्रेणी तयार करुन विद्यमान परवानाधारकांना त्यांच्याकडील परवान्याची श्रेणीवाढ करण्यास मुभा देण्यात येणार आहे. यात अतिउच्च दर्जाची […]
मोठी बातमी! बिहारमध्ये सर्वांना मोफत मिळणार कोरोनाचा प्रिकॉशन डोस, हा निर्णय घेणारे पहिलेच राज्य
पाटणा : बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी झालेल्या मंत्रिपरिषदेच्या बैठकीत एकूण 26 अजेंड्यांना मंजुरी देण्यात आली. या बैठकीत कोरोना लसीचा प्रिकॉशन डोस घेण्यास पात्र असलेल्या राज्यातील सर्व नागरिकांना मोफत लस देण्याच्या प्रस्तावाला मान्यता देण्यात आली. या कामासाठी 1314.15 कोटी रुपयांच्या अंदाजित खर्चासही मान्यता देण्यात आली आहे. याशिवाय बिहार आकस्मिकता निधीसाठी ५८३.४३ कोटी रुपये […]
काँग्रेस, राष्ट्रवादीला शिवसेनेकडून मोठा धक्का; ‘त्या’ पत्रावर स्वाक्षरी करण्यास दिला नकार
मुंबई, १९ एप्रिल : सध्या राज्यामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेना विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस असे आरोप प्रत्यारोपांचं सत्र रंगलं असतानाच दुसरीकडे शिवसेनेसंदर्भातील मोठी बातमी समोर आली आहे. केंद्र सरकारविरोधात विरोधी पक्षांनी जारी केलेल्या एका पत्रकार शिवसेनेकडून स्वाक्षरी करण्यात आलेली नाही. राज्यामध्ये सध्या महिवकास आघाडीमधील सर्वात मोठा घटक पक्ष असणारी शिवसेना ही काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत सत्तेत आहेत. देशामध्ये […]









