इंदू मिलवरील जागेवर डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या राष्ट्रीय स्मारकाच्या पुतळ्याच्या पायाभरणीचा कार्यक्रम रद्द करण्यात आला आहे. “इंदू मिल येथे महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांचे भव्य स्मारक उभे करण्याची सर्वांची इच्छा आहे. यामध्ये कुठलाही पक्ष किंवा संघटना असा भेदभाव असूच शकत नाही,” असं उद्धव ठाकरेंनी सांगितलं आहे. “एमएमआरडीएने राज्य मंत्रिमंडळाच्या निर्णयानंतर पुतळ्याच्या सुधारित संरचनेच्या दृष्टीने सर्व तयारी पूर्ण […]
महाराष्ट्र
Stay updated with the latest news from Maharashtra. Our Maharashtra News section covers local events, state politics, government decisions, social issues, and all the important happenings that impact the people of Maharashtra.
काही होत नसेल तर पदावर राहून काय उपयोग?- खासदार उदयनराजे भोसले
“मी कधी राजकारण करत नाही. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर राजीनामा द्यावा लागला तर मी देणारच,” असं वक्तव्य भाजपचे राज्यसभा खासदार उदयनराजे भोसले यांनी केलं. मराठा आरक्षणाबाबत एक ठोस निर्णय व्हावा, अशी इच्छा त्यांनी व्यक्त केली. “इतर समाजांप्रती मला आदर आहे. मात्र प्रत्येकाला त्यांचा हक्क मिळाला पाहिजे ही माझी भूमिका आहे. न्यायालयाने सर्वांना समान अधिकार द्यावेत. न्याय […]
उपमुख्यमंत्री अजित पवारांकडून पुणे मेट्रोच्या कामाची पाहणी; अधिकाऱ्यांना केल्या सूचना
पुणे : अजित पवार आपल्या वेळेच्या तंतोतंत नियोजनामुळे ओळखले जातात, अजित पवार पुणे मेट्रोच्या कामाची पाहणी करण्यासाठी सकाळी सहा वाजता पोहोचले त्यांनी पिंपरी-चिंचवड ते पुणे मेट्रोचा आढावा घेत अजित पवारांनी मेट्रोचे मुख्य अधिकारी ब्रिजेश दीक्षित यांच्यासोबत बैठक घेतली. त्यानंतर संत तुकाराम नगर येथे मेट्रोचे पहिले तिकीट घेऊन अजित पवार यांनी मेट्रो प्रवास केला. यावेळी अजित […]
मुंबईकरांवर पुन्हा एकदा निर्बंध येणार; आज मध्यरात्रीपासून जमावंबदी लागू
मुंबई : आता पुन्हा एकदा मुंबईकरांवर निर्बंध येणार आहेत. मुंबईत आज मध्यरात्रीपासून जमावंबदी लागू करण्यात येणार आहे. ही जमावबंदी ३० सप्टेंबरपर्यंत लागू असणार आहे. याविषयी मुंबई पोलीस आयुक्तालयाकडून परिपत्रक जारी करण्यात आलं आहे. मात्र असं असलं तरीही कोणत्याही प्रकारचा लॉकडाऊन यावेळी करण्यात आलेला नाही. मात्र, यावेळी नागरिकांना कुठेही गर्दी करता येणार नाही. अत्यावश्यक सेवेत असणाऱ्या […]
शेतकरी पुत्राने मागितली राज्यापालांना भेटण्यासाठी वेळ..
सोलापूर : प्रशासनाच्या वतीने घालून दिलेल्या लॉकडाऊनमुळे देखील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. मात्र सध्या शेतकऱ्यांना कांद्याला चांगला भाव मिळत असल्याने शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर समाधान होते. मात्र अचानकपणे कांदा निर्यातीवर केंद्र सरकारने बंदी घातल्याने देशभरातील कांद्याचे भाव कमी होणार आहेत. सरकारने घेतलेल्या निर्णयामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. केंद्र सरकारने घेतलेला कांदा निर्यात बंदीचा निर्णय मागे […]
मराठा आरक्षणाबाबत आम्ही सरकारसोबत आहोत – विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस
सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण कायद्याला अंतरिम स्थगिती दिली. त्यासंदर्भात पुढील भूमिका निश्चित करण्यासाठी सर्वपक्षीय बैठक पार पडली. या बैठकीनंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आपली प्रतिक्रिया देताना सांगितले कि, “आम्ही सरकारसोबत आहोत, यामध्ये कुठलंही राजकारण आणणार नाही.” “मराठा आरक्षणाला सर्वोच्च न्यायलयाने स्थगिती दिल्यानंतर राज्य सरकार सध्या तीन पर्यायाने विचार करत आहे. अध्यादेश काढणे, फेरविचार याचिका […]
केंद्रीय रस्ते वाहतूक आणि परिवहन मंत्री नितीन गडकरी यांना कोरोनाची लागण
केंद्रीय रस्ते वाहतूक आणि परिवहन मंत्री नितीन गडकरी यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांनी स्वत: ट्वीट करत याबाबतची माहिती दिली. गडकरी यांचं ट्विट: “काल मला अशक्तपणा वाटत होता. त्यामुळे मी माझ्या डॉक्टरला याबाबत सांगितले. त्यानंतर मी कोरोना चाचणी केली असता, मला कोरोना झाल्याचे निष्पन्न झाले आहे. सध्या मी सर्वांच्या आशीर्वादाने ठीक आहे. मी सध्या विलगीकरण […]
मराठा आरक्षणासाठी जे काही करावं लागेल ते सगळं करु, मुख्यमंत्र्यांचा निर्धार
सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणास गेल्या आठवड्यात स्थगिती दिली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सह्याद्री अतिथीगृहावर विरोधकांशी मराठा आरक्षणावर चर्चा केली. बैठकीनंतर बोलताना दोन ते तीन दिवसांत निर्णय जाहीर करणार असल्याचं त्यांनी सांगितलं आहे. “आजच्या बैठकीत पुढील न्यायालयीन लढाई कशी करायची आणि त्याचसोबत जोपर्यंत निकाल लागत नाही तोपर्यंत मराठा समाजातील तरुण, तरुणींना काय दिलासा द्यायचा हादेखील प्रश्न […]
मराठा समाज आक्रमक; मुंबई, पुण्याचा दूध पुरवठा रोखणार
कोल्हापुर : आरक्षणासह नोकरभरती थांबवण्याच्या मागणीला राज्य सरकारने अपेक्षित प्रतिसाद दिलेला नाही त्यामुळे कोल्हापुरातील सकल मराठा समाजाने आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे. आजपासून कोल्हापुरातून मुंबई, पुणे या शहरांना होणार दूध पुरवठा रोखण्यात येणार आहे. सकाळी नऊ वाजल्यापासून या आंदोलनाची सुरुवात, गोकुळ शिरगाव औद्योगिक वसाहतीमधील गोकुळ दूध संघाच्या प्रवेशद्वारावर हे आंदोलन केले जाईल. मराठा समाजाच्या क्रांती मोर्चाचे […]
भाजप खासदार उदयनराजे भोसले यांनी मराठा आरक्षणासंदर्भात नेतृत्व करावे- विनायक मेटे
मराठा आरक्षणाच्या अंमलबजावणीला स्थगिती मिळाल्यानंतर मराठा समाजासाठी काम करणाऱ्या संघटना, नेते, पदाधिकारी, मान्यवर मंडळीनी आपापली मतं, रोष व्यक्त केला आहे. मराठा समाजाचे आरक्षण अबाधित राहावे यासाठी काय काय भूमिका घ्यावी, मग आंदोलनाबाबत असो, न्यायालयात असो किंवा सरकारविरोधात, भूमिका घेण्यासाठी कोणी तरी पुढाकार घेणे आवश्यक आहे. भाजप खासदार उदयनराजे भोसले यांनी मराठा आरक्षणासंदर्भात नेतृत्व करावे, अशी […]









