पुणे : आज सकाळी बारामती विमानतळाजवळ झालेल्या धक्कादायक अपघातात महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा आणि त्यांच्या सोबत असलेल्यांचा मृत्यू झाला आहे. हा अपघात त्यांच्या चार्टर्ड विमानाच्या लँडिंगच्या प्रयत्नात झाल्याचे पहिल्या अहवालांतून समोर येत आहे. उपमुख्यमंत्र्यांचे विमान मुंबईहून बारामतीकडे येत होते, तेव्हा लँडिंगच्या वेळी अचानक नियंत्रण सुटले आणि विमान अपघातग्रस्त झाले. विमानातील सर्व प्रवासी आणि कर्मचारी […]
महाराष्ट्र
Stay updated with the latest news from Maharashtra. Our Maharashtra News section covers local events, state politics, government decisions, social issues, and all the important happenings that impact the people of Maharashtra.
सासरच्या छळाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या; हुंडा, चारित्र्यावर संशय, जबरदस्ती गर्भपात…
पुणे : पुणे जिल्ह्यातील उरुळीकांचन जवळील सोरतापवाडी येथे सासरच्या छळामुळे एका विवाहितेने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. दीप्ती मगर चौधरी (वय अंदाजे 30) यांनी शनिवारी रात्री गळफास घेऊन आपले जीवन संपवले. या प्रकरणी उरुळीकांचन पोलिस ठाण्यात पती रोहन चौधरी, सासू सुनिता चौधरी, सासरे कारभारी चौधरी आणि दीर रोहित चौधरी यांच्याविरोधात गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल […]
पुणे हादरलं! आईकडूनच 11 वर्षीय मुलाची निर्घृण हत्या, मुलीची प्रकृती चिंताजनक
पुणे : पुणे शहरातील वाघोली परिसरात एक अत्यंत हृदयद्रावक आणि संतापजनक घटना उघडकीस आली आहे. वाघोलीतील बीएआयएफ (BAIF) रोड परिसरात राहणाऱ्या एका महिलेने आपल्या 11 वर्षांच्या मुलाचा गळा चिरून निर्घृण खून केल्याची घटना समोर आली आहे. याच वेळी तिने 13 वर्षांच्या मुलीवरही जीवघेणा हल्ला केला आहे. पोलिसांच्या प्राथमिक माहितीनुसार, आरोपी महिलेचे नाव सोनी संतोष जायभाय […]
निष्काळजीपणाचा कळस! विक्रोळीत स्पीकर अंगावर कोसळून 3 वर्षांच्या चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू
मुंबई : मुंबईतील विक्रोळी परिसरात प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी एक अत्यंत हृदयद्रावक दुर्घटना घडली असून निष्काळजीपणामुळे एका निष्पाप चिमुरडीला जीव गमवावा लागला आहे. ही घटना 26 जानेवारी रोजी विक्रोळी पूर्वेकडील टागोर नगरमधील आंबेडकर नगर परिसरात घडली. प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमासाठी रस्त्याच्या कडेला मोठा स्पीकर उभारण्यात आला होता. घटनेच्या वेळी तीन वर्षांची मुलगी खेळत असताना, अचानक तो स्पीकर तिच्या […]
राज्यात अनेक ठिकाणी पावसाची हजेरी, ‘या’ 6 जिल्ह्यांना अलर्ट जारी
मुंबई : महाराष्ट्रातील हवामानात लक्षणीय बदल होत असून नागरिकांना थंडी, पाऊस आणि वाढत्या तापमानाचा एकाच वेळी सामना करावा लागत आहे. गेल्या काही दिवसांपासून राज्यभरात जाणवणारी तीव्र थंडी आता हळूहळू ओसरत असून, त्याचबरोबर अनेक भागांत पावसाच्या सरींनी हजेरी लावली आहे. हवामान खात्याच्या माहितीनुसार, बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्राचा परिणाम महाराष्ट्राच्या काही भागांवर होणार आहे. […]
‘पुणे ग्रँड टूर’ने जिल्ह्याचा पर्यटन नकाशा जागतिक…!!
पुणे : दरवर्षी २५ जानेवारी हा दिवस भारतात ‘राष्ट्रीय पर्यटन दिन’ म्हणून साजरा केला जातो. पर्यटनाच्या माध्यमातून देशाचा सांस्कृतिक, ऐतिहासिक आणि नैसर्गिक वारसा जपणे, स्थानिक अर्थव्यवस्थेला चालना देणे आणि जागतिक स्तरावर भारताची ओळख अधिक भक्कम करणे, हा यामागचा मूलभूत उद्देश आहे. पर्यटन म्हणजे केवळ प्रवास नव्हे; तो संस्कृतीचा संवाद आहे, इतिहासाची ओळख आहे, निसर्गाशी नातं […]
निष्काळजीपणाचा कहर! दौंडमध्ये रोड रोलरखाली चिरडून 4 वर्षांच्या चिमुकल्याचा हृदयद्रावक मृत्यू
पुणे : पुणे जिल्ह्यातील दौंड शहरात मंगळवारी एक अत्यंत हृदयद्रावक आणि धक्कादायक घटना घडली. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने सुरू असलेल्या रस्त्याच्या डांबरीकरणाच्या कामादरम्यान रोड रोलरखाली सापडून चार वर्षांच्या चिमुकल्याचा जागीच मृत्यू झाला. या घटनेने दौंड शहर हादरले असून नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. मृत मुलाचे नाव आर्यन जाधव असे असून ही घटना दौंड शहरातील […]
दावोस दौरा शंभर टक्के यशस्वी; ३७ लाख कोटींचे सामंजस्य करार, सुमारे ४३ लाख रोजगारनिर्मिती – उद्योगमंत्री डॉ. उदय सामंत
मुंबई : दावोस (स्वित्झर्लंड) येथे झालेल्या वर्ल्ड इकॉनॉमिक फोरममध्ये आतापर्यंत एकूण ३७ लाख कोटी रुपयांचे सामंजस्य करार करण्यात आले असून, त्यातून राज्यात सुमारे ४३ लाख युवक-युवतींना रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत. त्यामुळे दावोस दौरा शंभर टक्के यशस्वी ठरलेला आहे, अशी माहिती उद्योगमंत्री डॉ. उदय सामंत यांनी मुंबई येथे झालेल्या पत्रकार परिषदेत दिली. उद्योगमंत्री सामंत म्हणाले […]
बीडमध्ये शेतात काम करणाऱ्या महिलेवर बिबट्याची झडप, शालमुळे वाचला जीव
बीड : बीड जिल्ह्यातील शिरूर कासार तालुक्यात बुधवारी दुपारी एक अंगावर काटा आणणारी घटना घडली. कोळवाडी गावातील ४५ वर्षीय मनकर्णा शिवराम नेटके यांच्यावर शेतात काम करत असताना बिबट्याने अचानक हल्ला केला. ही घटना रूपपूर शिवर परिसरात घडली. सकाळच्या सुमारास जवळच्या डोंगराळ भागातून बिबट्याची डरकाळी ऐकू आल्याचे स्थानिकांनी सांगितले. मात्र, शेतात काम करणाऱ्या मजुरांनी याकडे विशेष […]
मुंबई व पुणे विद्यापीठांमध्ये आदिवासी विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह उभारण्याबाबत बैठक
मुंबई : राज्यातील अनेक आदिवासी विद्यार्थी उच्च शिक्षणासाठी दुर्गम भागातून मुंबई, पुणे यांसारख्या मोठ्या शहरांमध्ये येतात. या विद्यार्थ्यांना त्यांच्या शैक्षणिक परिसरात राहण्याची सोय व्हावी यासाठी मुंबई व पुणे विद्यापीठाच्या परिसरात वसतिगृह उभारण्यासंदर्भात आढावा बैठक आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक वुईके यांच्या अध्यक्षतेखाली झाली. बैठकीस मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. रवींद्र कुलकर्णी, पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुरेश […]










