मुंबई : शक्ती कायद्यासंदर्भात विधानभवन येथे संयुक्त समितीसमोर मुंबईतील विविध महिला संघटना तसेच वकील संघटनांकडून महत्त्वपूर्ण सूचना व निवेदने प्राप्त झाली असून समितीच्या बैठकीत त्यावर सविस्तर चर्चा होईल, असे या संदर्भातील समितीचे अध्यक्ष तथा गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सांगितले. मुंबईतील जवळपास 46 महिला व वकील संघटनांकडून सूचना, निवेदने प्राप्त झाली होती. त्यांच्या प्रतिनिधींनी समितीसमोर सूचना […]
महाराष्ट्र
Stay updated with the latest news from Maharashtra. Our Maharashtra News section covers local events, state politics, government decisions, social issues, and all the important happenings that impact the people of Maharashtra.
पाचवी ते आठवीचे वर्ग ‘या’ तारखेपासून होणार सुरु, शिक्षणमंत्र्यांनी दिली माहिती
कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी मागच्यावर्षी राज्यातील शाळा बंद होत्या. आता शाळा सुरु होत आहेत. नववी ते बारावीचे वर्ग अगोदरच सुरु झाले होते. आता सरकारने पाचवी ते आठवीचे वर्ग उघडण्याचा निर्णय घेतला आहे. राज्याच्या शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी माहिती दिली कि, येत्या २७ जानेवारीपासून पाचवी ते आठवीचे वर्ग सुरु होतील. शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी म्हटले […]
राष्ट्रवादी पुरस्कृत ग्राम विकास परिवर्तन पॅनलच्या उमेदवाराचा विजेच्या धक्क्याने मृत्यू
जळगाव : मुक्ताईनगर तालुक्यातील राष्ट्रवादी पुरस्कृत ग्रामपंचायत उमेदवाराचा विजेच्या धक्क्याने मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. शेतात पाणी देण्यासाठी गेलं असताना विजेचा धक्का बसल्याने रमेश घाईट यांचे निधन झाले. घाईट यांच्या निधनाने त्यांच्या जागेसाठी मतदान होणार की नाही, असा प्रश्न उपस्थिच होत आहे. रमेश घाईट हे जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर तालुक्यातील वडोदा ग्रामपंचायत निवडणुकीच्या रिंगणात उतरले […]
महाराष्ट्रातल्या ‘या’ सहकारी बँकेचं लायसन्स रद्द, ग्राहकांच्या पैशावर संक्रांत?
पुणे : उस्मानाबादच्या वसंतदादा नागरी सहकारी बँकेचं लायसन्स रद्द करण्यात येत असल्याची घोषणा आरबीआयनं केलीय. बँकेची जी सध्याची स्थिती आहे, त्यात बँक ग्राहकांची देणी देण्यात किंवा व्यवहार करण्यास असमर्थ असल्याचंही आरबीआयनं म्हटलंय. विशेष म्हणजे बँकेचं लायसन्स रद्द झालं तर कोणत्याही ग्राहकाची 5 लाखापर्यंतची रक्कम सुरक्षित आहे. ती त्यांना परत मिळण्याची गॅरंटी आहे. त्यानुसार उस्मानाबादच्या वसंतदादा […]
राज्यात इलेक्ट्रिक वाहनांच्या वापरासोबतच हरित उर्जानिर्मितीस चालना देणार – पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे
मुंबई : पर्यावरण संवर्धनाच्या अनुषंगाने राज्यात इलेक्ट्रिक वाहनांच्या वापरासोबतच हरित उर्जेच्या निर्मितीला चालना देण्यात येईल. राज्यातील महामार्गावर सौरउर्जेचा वापर करणे, मुंबईतील बेस्टमध्ये पुढील पाच वर्षात साधारण ३० टक्के इलेक्ट्रिक बसेस आणणे यासह विविध उपाययोजना राबवून पर्यावरण संवर्धनास चालना देण्यात येईल. हवेचे प्रदूषण कमी करण्याच्या अनुषंगाने शासनामार्फत इलेक्ट्रिक वाहनांना येत्या काळात प्रोत्साहन दिले जाईल, असे पर्यावरण […]
महाराष्ट्रात ‘बर्ड फ्लू’चा धोका वाढला! ८०० कोंबड्यांचा बर्ड फ्लू’मुळे मृत्यू
परभणी : परभणी जिल्ह्यात ८०० कोंबड्यांचा मृत्यू झाला आहे. या कोंबड्यांचा मृत्यू ‘बर्ड फ्लू’मुळेच झाला असल्याचं प्रयोगशाळेनं दिलेल्या अहवालातून स्पष्ट झालं आहे. मुरूंबा येथे ही घटना घडली असून, परभणीचे जिल्हाधिकारी डी.एम. मुंगळीकर यांनी याविषयीची माहिती दिली आहे. देशातील सहा राज्यांमध्ये बर्ड फ्लूने थैमान घातलेलं असतानाच परभणी जिल्ह्यातील मुरूंबा गावात एकाच दिवशी ८०० कोंबड्या मरण पावल्याची […]
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून स्व. विलासकाका पाटील उंडाळकर यांच्या कुटुंबियांचे सांत्वन
सातारा : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्याचे ज्येष्ठ नेते व माजी सहकारमंत्री स्व. विलासकाका पाटील उंडाळकर यांच्या कुटुंबियांची भेट घेऊन त्यांच्या कुटुंबियांचे सांत्वन केले. यावेळी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात व आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनीही त्यांच्या कुटुंबियांचे सांत्वन केले. उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात व आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी स्व. विलासकाका पाटील उंडाळकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार […]
इनलॅक्स व बुधारानी रुग्णालयात O+ रक्तगटाची गरज; इच्छुकांना संपर्क साधण्याचे आवाहन
पुणे : ‘रक्तदान हेच जीवनदान, रक्तदान हेच सर्वश्रेष्ठ दान‘ असे समजले जाते. शहरातील विविध रुग्णालयांमध्ये कोरोनामुळे आज रक्तपेढींमधील साठा कमी पडू लागला आहे. कोरोनामुळे शिबिराची संख्या कमी आहे.त्यामुळे रक्तटंचाई निर्माण झाली आहे. वेळेवर रक्त मिळत नसल्याने मृत्यू होण्याच्या घटना कानावर येतात. त्यामुळे तरुणाईने अधिकाअधिक रक्तदान करण्याचे आवाहन इनलॅक्स व बुधारानी रुग्णालयाकडून केले जात आहे. इनलॅक्स […]
नागरिकांच्या सुरक्षेसाठी पोलिसांनी ‘स्मार्ट’ होऊन काम करावे – उपमुख्यमंत्री अजित पवार
पुणे, दि. 8 : महाराष्ट्र पोलिसांना त्यागाची, शौर्याची उज्ज्वल पंरपरा आहे. पोलिसांनी कर्तव्य बजावताना स्वत:च्या तंदुरुस्तीकडे लक्ष देऊन नागरिकांच्या सुरक्षेसाठी ‘स्मार्ट’ होऊन काम करावे. ‘पिंपरी-चिंचवड’ पोलीस आयुक्तालयाला राज्यातले दर्जेदार पोलीस आयुक्तालय बनविण्यासाठी राज्य शासनाच्यावतीने आवश्यक सर्व सहकार्य करण्यात येणार असल्याची ग्वाही उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी आज दिली. उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, राज्याच्या […]
मोठी संधी : युवा महिलांना रोजगार मिळावा या उद्देशानं लष्करात महिलांची भरती, असा करा अर्ज..
पुणे: महाराष्ट्र, गोवा आणि गुजरातमधील युवा महिलांना रोजगार मिळावा या उद्देशानं महिलांसाठी लष्कर भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे. 10 वी उत्तीर्ण महिला आणि मुलींसाठी ही भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे. आर्मी इन्स् ट्यूट ऑफ फिजिकल ट्रेनिंगच्या मैदानावर 12 ते 14 जानेवारीदरम्यान ही भरती प्रक्रिया पार पडणार आहे. भरती प्रक्रियेत सहभागी होऊ इच्छिणाऱ्या महाराष्ट्र, गोवा आणि […]










