मुंबई : जात प्रमाणपत्र देणे आणि त्याची पडताळणी करणे याकरिता सन २००१ चा महाराष्ट्र अधिनियम क्र. २३ व त्याअंतर्गत कार्यपद्धती निश्चितीकरिता नियम तयार करण्यात आलेले आहेत. यामध्ये हैद्राबाद गॅझेटिअरमधील नोंदी विचारात घेऊन मराठा समाजाच्या व्यक्तींना कुणबी, मराठा-कुणबी किंवा कुणबी-मराठा जातीचे प्रमाणपत्र मिळविण्याची प्रक्रिया अधिक सुलभ करण्यासाठी गावपातळीवर समित्या गठीत करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याबाबतचा […]
महाराष्ट्र
Stay updated with the latest news from Maharashtra. Our Maharashtra News section covers local events, state politics, government decisions, social issues, and all the important happenings that impact the people of Maharashtra.
गृहपयोगी संचाचे वाटप पूर्णतः नि:शुल्क – पालकमंत्री संजय शिरसाट
छत्रपती संभाजीनगर : महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याण मंडळ व मे. मफतलाल इंडस्ट्रीज लि. यांच्या मार्फत जिल्ह्यातील 15 वितरण केंद्रांवर होत असलेल्या गृहपयोगी संचाच्या वाटपाबाबतच्या तक्रारीच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री संजय शिरसाट यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली. त्यात त्यांनी हे वितरण पूर्णतः निःशुल्क असून कुणाकडून पैशांची मागणी केल्यास तात्काळ पोलिसांत तक्रार द्यावी असे आवाहन त्यांनी […]
सरकारने मान्यता दिलेलं ‘हैदराबाद गॅझेट’ – पुरावा म्हणून किती महत्त्वाचं? सविस्तर जाणून घ्या…
मुंबई : मराठा आरक्षणाच्या संदर्भात सध्या चर्चेत असलेलं ‘हैदराबाद गॅझेट’ म्हणजे नेमकं काय, हा प्रश्न अनेकांना पडला आहे. प्रत्यक्षात हे गॅझेट म्हणजे तत्कालीन हैदराबाद संस्थानकडून निघणारं सरकारी राजपत्र (Government Gazette) असून, ते आजही ऐतिहासिक आणि कायदेशीर दृष्टीने महत्त्वाचं मानलं जातं. काय आहे ‘हैदराबाद गॅझेट’? 1948 पूर्वी मराठवाडा भाग हैदराबाद संस्थानच्या अखत्यारीत होता. त्या काळात सरकारकडून […]
मनोज जरांगेंच्या आंदोलनाला मोठं यश, मराठा आरक्षणासाठी मसुद्यातील प्रमुख मुद्दे जाणून घ्या…
मुंबई : मनोज जरांगे यांच्या नेतृत्वाखालील मराठा आंदोलनाला मोठं यश मिळाले आहे. मराठा समितीने हैदराबाद गॅझेट मान्य असल्याचे जाहीर केले असून, उपसमितीने गावातील, नात्यातील आणि कुळातील लोकांची चौकशी करून कुणबी प्रमाणपत्र देण्याची तयारी केली आहे. तसेच सातारा गॅझेटच्या मागणीवरही जलदगतीने निर्णय घेण्यात येणार असल्याचे उपसमितीने मान्य केले. मनोज जरांगे यांनी सांगितले की, मराठा आंदोलनाच्या मागण्यांवर […]
हांडेवाडी-मंतरवाडी रस्त्यावर सिमेंट मिक्सर ट्रकची दुचाकीला धडक, दोघांचा मृत्यू
पुणे : हांडेवाडी-मंतरवाडी रस्त्यावर काल सकाळी दुर्दैवी अपघात झाला, ज्यात दोघांचा जागीच मृत्यू झाला. हा अपघात हांडेवाडी रोडवरील एचपी पेट्रोल पंपासमोर घडला. या अपघातातील मृतांची ओळख पटली असून ते आहेत – संतोष प्रल्हाद कांबळे (वय ४९, रहिवासी हांडेवाडी रोड, मूळचे अहिल्यानगर) आणि सदाशिव गोरख फुलावे (वय ३६, रहिवासी उरुळी देवाची). दोघेही हांडेवाडीहून मंतरवाडीकडे दुचाकीवर जात […]
नाशिकमध्ये धक्कादायक घटना! पहिल्या पत्नीला जास्त वेळ दिल्याचा राग, दुसऱ्या पत्नीने भावांच्या मदतीने केली पतीची हत्या
नाशिक : नाशिक जिल्ह्यातील आडगाव-सैयद पिंपरी रोड परिसरात पतीने पहिल्या पत्नीला जास्त वेळ दिल्याच्या रागातून दुसऱ्या पत्नीने दोन भावांच्या मदतीने पतीची हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल करून पत्नी व तिच्या भावांना ताब्यात घेतले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मृताचे नाव भावसार मूलचंद पवार उर्फ बाला असून तो खेळणी विक्रीचा व्यवसाय […]
स्पाइसजेटचे पुणे-दिल्ली विमान पुणे विमानतळावर परतले, उड्डाणानंतर वैमानिकाला तांत्रिक बिघाड जाणवला…
पुणे : सोमवारी सकाळी पुणेहून दिल्लीकडे जाणारे स्पाइसजेटचे बोईंग ७३७ (VT-SLG) विमान उड्डाणानंतर तांत्रिक बिघाड आढळल्याने परत पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळावर आणण्यात आले. विमानाने सुरक्षित लँडिंग केल्याची पुष्टी एअरलाइनने केली आहे. विमान परत आल्यानंतर सर्व प्रवाशांना व्यवस्थितपणे उतरवण्यात आले. काही प्रवाशांनी याला आपत्कालीन लँडिंग असे संबोधले असले तरी विमानतळ प्रशासनाने स्पष्ट केले की कोणतीही आपत्कालीन परिस्थिती […]
पुणे : डंपरच्या धडकेत तरुणाचा मृत्यू, डंपरचालक मोबाईलवर व्यस्त आणि…
पुणे : रविवारी सकाळी देहू रोड परिसरात झालेल्या अपघातात ३२ वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू झाला. मृताचे नाव दीपल बहादूर साई असून तो विकास नगर येथे राहात होता आणि खाजगी सुरक्षा रक्षक म्हणून कार्यरत होता. हा अपघात किवळे येथील साई द्वारका हाऊसिंग सोसायटीजवळ सकाळी साडेनऊच्या सुमारास घडला. दीपल बहादूर आपल्या दुचाकीवरून जात असताना डंपरने त्याला जोरदार […]
अभिनेत्री प्रिया मराठे-मोघेचे अवघ्या ३८ व्या वर्षी निधन, कलाविश्वात हळहळ
मुंबई : मराठी आणि हिंदी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री प्रिया मराठे मोघे यांच्या निधनाने कलाविश्वात शोककळा पसरली आहे. वयाच्या अवघ्या ३८ व्या वर्षी, रविवारी पहाटे मुंबईतील मीरा रोड येथील निवासस्थानी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. गेल्या दोन ते अडीच वर्षांपासून त्या कर्करोगाशी झुंज देत होत्या. अभिनय कारकीर्द ‘या सुखांनो या’ या मालिकेतून प्रिया मराठे यांनी अभिनयक्षेत्रात […]
गणेशोत्सव २०२५ : पुणे जिल्ह्यात सुधारित ड्राय डे आदेश लागू
पुणे : गणेशोत्सव २०२५ दरम्यान उत्सव सुरळीत पार पडावा यासाठी पुणे जिल्हा प्रशासनाने सुधारित ड्राय डे आदेश जारी केले आहेत. या आदेशानुसार दारू दुकाने, बार आणि परमिट रूमवर विशिष्ट दिवशी विक्रीबंदी राहणार आहे. आदेशानुसार, २७ ऑगस्ट (गणेश चतुर्थी) व ६ सप्टेंबर (अनंत चतुर्दशी) रोजी संपूर्ण जिल्ह्यात दारू विक्री पूर्णपणे बंद राहील. ७ सप्टेंबर रोजी गणपती […]










