Ganeshotsav 2025: Pune District Announces Dry Day Orders for Festival
पुणे महाराष्ट्र

गणेशोत्सव २०२५ : पुणे जिल्ह्यात सुधारित ड्राय डे आदेश लागू

पुणे : गणेशोत्सव २०२५ दरम्यान उत्सव सुरळीत पार पडावा यासाठी पुणे जिल्हा प्रशासनाने सुधारित ड्राय डे आदेश जारी केले आहेत. या आदेशानुसार दारू दुकाने, बार आणि परमिट रूमवर विशिष्ट दिवशी विक्रीबंदी राहणार आहे.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

आदेशानुसार,

  • २७ ऑगस्ट (गणेश चतुर्थी) व ६ सप्टेंबर (अनंत चतुर्दशी) रोजी संपूर्ण जिल्ह्यात दारू विक्री पूर्णपणे बंद राहील.
  • ७ सप्टेंबर रोजी गणपती विसर्जन मिरवणूक संपेपर्यंत ही बंदी कायम राहील.

याशिवाय पुणे शहरात,

  • विसर्जन मार्गावरील सर्व दारू दुकाने उत्सवाच्या ५ व्या आणि ७ व्या दिवशी मिरवणूक पूर्ण होईपर्यंत बंद ठेवण्याचे निर्देश दिले आहेत.
  • ज्या भागात स्थानिक पातळीवर ५ वा व ७ वा दिवस विसर्जनाचे आयोजन होते, तेथील मिरवणूक मार्गावरील दुकानेही विसर्जन पूर्ण होईपर्यंत बंद राहणार आहेत.

जिल्हा प्रशासनाने नागरिकांनी व व्यापाऱ्यांनी आदेशांचे पालन करून उत्सव शांततेत व सुव्यवस्थित पार पाडावा, असे आवाहन केले आहे.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

थोडक्यात घडामोडी टीम
कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत