मुंबई : महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडे नोंदणीकृत बांधकाम कामगारांकरीता तीन नवीन योजना राबविण्याचा निर्णय घेण्यात असून या तीन नवीन योजनांमध्ये बांधकाम कामगाराच्या एका मुलीच्या विवाहाकरीता 51 हजार रुपये देण्यात येणार आहे. बांधकाम कामगाराचा अपघाती किंवा नैसर्गिक मृत्यू झाल्यास त्याचे शव मूळ गावी पाठविण्यासाठी वाहतुकीचा खर्च मंडळ करणार आहे व बांधकाम कामगाराचा […]
महाराष्ट्र
Stay updated with the latest news from Maharashtra. Our Maharashtra News section covers local events, state politics, government decisions, social issues, and all the important happenings that impact the people of Maharashtra.
मोठी बातमी! आमदार नितेश राणे यांना ४ फेब्रुवारीपर्यंत पोलिस कोठडी
सिंधुदुर्ग : संतोष परब हल्ला प्रकरणी भाजप आमदार नितेश राणे यांना कणकवली दिवाणी न्यायालयाने ४ तारखेपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. यामुळे नितेश राणे यांना पुढील दोन दिवस कणकवली पोलिस ठाण्यातील कोठडीत राहावे लागणार आहे. न्यायालयासमोर आत्मसमर्पण केल्यानंतर नितेश राणे यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती. मात्र, आरोपी नितेश राणे हे पोलिसांच्या ताब्यात असणे अत्यंत आवश्यक […]
आरटीई २५ टक्के प्रवेश प्रक्रियेसाठीचे अर्ज १६ फेब्रुवारी पासून भरता येणार
मुंबई : शैक्षणिक वर्ष २०२२-२३ साठी आरटीई २५ टक्के प्रवेश प्रक्रियेचे संभाव्य वेळापत्रक प्रसिद्ध करण्यात आले आहे. त्यानुसार १ फेब्रुवारी २०२२ पासून पालकांना ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी कळविण्यात आले होते. तथापि काही अपरिहार्य कारणास्तव आरटीई पोर्टलवर सदरचे अर्ज १ फेब्रुवारी २०२२ ऐवजी बुधवार १६ फेब्रुवारी २०२२ पासून भरता येतील, संबंधितांनी या बदलाची नोंद घेऊन अर्ज दाखल […]
सावर्डे येथील नदीवरील पूल बांधण्यासाठी १५ लाख रुपये मंजूर, पालकमंत्री दादाजी भुसे यांनी दिले ‘हे’ निर्देश
पालघर : मोखाडा तालुक्यातील सावर्डे गाव ते शहापूर तालुक्यातील गावाला जोडणारा वैतरणा नदीवरील पुलाच्या कामाला 15 लाख रुपये मंजूर करण्यात आले असून हे काम जिल्हा प्रशासनाने तातडीने पूर्ण करावे असे निर्देश कृषी, माजी सैनिक कल्याण मंत्री तथा पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री दादाजी भुसे यांनी दिले. पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांची सावर्डे गावाचे सरपंच हनुमंत पादीर व […]
मोदी सरकारचे बजेट केवळ उद्योगपती मित्रांसाठी, सर्वसामान्यांना दिलासा नाहीच
चंद्रपूर : मोदी सरकारने सादर केलेला आजचा अर्थसंकल्प हा देश उद्धवस्त करण्याची सातवी पायरी म्हणावी लागेल. बजेटचा पेपर कोराच आहे. शून्य गुणही देतांना विचार करावा लागतो. रोजगार निर्मितीची कोणतीही शाश्वती नाही. हे बजेट केवळ मूठभर कॉर्पोरेट सेक्टरला, काही विशिष्ट बड्या उद्योगपतींना मदत करणारे आहे. फक्त उद्योजकांना मोठे करण्याचा चंग या केंद्र सरकारने बांधला आहे, अशी […]
राज्यात आजपासून कोविड संसर्ग रोखण्यासाठी नवीन नियमावली लागू, मिळतील ‘या’ सवलती
मुंबई : राज्य शासनाने 1 फेब्रुवारी पासून राज्यातील सर्व राष्ट्रीय उद्याने, सफारी, पर्यटन स्थळे, स्पा, समुद्रकिनारे, मनोरंजन पार्क, जलतरण तलाव, नाट्यगृह, हॉटेल तसेच सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी सशर्त परवानगी दिली आहे. यात लग्नसमारंभासाठी दोनशे व्यक्तीपर्यंत मुभा असेल तर अंतिम संस्कारासाठी उपस्थित राहणाऱ्यांच्या संख्येवर कोणतेही निर्बंध नसणार आहेत. याबाबत शासनाच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाने सुधारित नवीन नियमावली जाहीर केली […]
सिमेंट बांध कार्यक्रमाचे तालुकानिहाय आराखडे बनवताना टंचाईग्रस्त गावांना प्राधान्य
मुंबई : सिमेंट बांध कार्यक्रमाचे तालुकानिहाय आराखडे बनवताना टंचाईग्रस्त गावांना प्राधान्य देण्याचे निर्देश मृद व जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांनी दिले. मंत्रालयातील दालनात मृद व जलसंधारण विभागाची सिमेंट बांध कार्यक्रम तसेच गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार योजनेसंदर्भात आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत मृद व जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख बोलत होते. मंत्री गडाख […]
माजी खासदार डॉ सुनील बळीराम गायकवाड यांना ‘बॉलिवूड आयकॉनिक अवॉर्ड’ जाहीर
मुंबई : लातूरचे माजी खासदार डॉ सुनील बळीराम गायकवाड यांनी १६ व्या लोकसभेत माहिती आणि तंत्रज्ञान स्थाई समितीत केलेले काम आणि भारत सरकारच्या चित्रपट सेन्सॉर बोर्डचे सदस्य असताना अनेक भाषिक चित्रपटांचे सेन्सॉर परीक्षण करून अनेक सूचना दिल्या. अनेक चित्रपट सेन्सॉर होण्यापूर्वी प्रमाणित करण्याचे काम आणि काही चित्रपटात पाहुणा कलाकार म्हणून भूमिका केलेले प्रोफेसर डॉ सुनील […]
डॉ सुनील गायकवाड यांनी घेतली पालकमंत्री अमित देशमुख यांची भेट
लातूर : लातूरचे माजी खासदार प्रोफेसर डॉ सुनील बळीराम गायकवाड यांनी लातूरचे पालकमंत्री अमित देशमुख यांची त्यांच्या कार्यालयात भेट घेतली. लातूर हे शैक्षणिक हब असलेले ठिकाण आहे. त्यासाठी डॉ बाबासाहेब आंबेडकर पार्क या ठिकाणी अत्याधुनिक सेंट्रल लायब्ररी तयार करावी, छत्रपती शिवाजी महाराज चौकात बस डेपो च्या पश्चिम दिशेस असलेल्या खाडी मध्ये एक हजार बैठक व्यवस्था […]
महापालिका क्षेत्रातील शाळांमधून फिरत्या पथकाद्वारे लसीकरण करण्याचे उपमुख्यमंत्र्यांचे निर्देश
पुणे : जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून कोविड संसर्गाचे प्रमाण कमी झाले असल्याने कोविडविषयक मार्गदर्शक सूचनांचे पालन करून 1 फेब्रुवारीपासून शाळा सुरू करण्यात याव्यात आणि महानगरपालिका क्षेत्रातील शाळांमध्ये फिरत्या पथकाद्वारे लसीकरणाची सुविधा उपलब्ध करून देण्यात यावी, असे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले. विभागीय आयुक्त कार्यालयात झालेल्या पुणे जिल्हा कोविड व्यवस्थापन आढावा बैठकीत ते बालेत होते. […]










