मुंबई : राष्ट्रीय स्तरावरील सनदी लेखापाल अर्थात चार्टर्ड अकौंटन्ट (सीए) परीक्षेत देशात पहिला क्रमांक पटकावणाऱ्या मुंबईच्या मीत शहा यांचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अभिनंदन केले आहे. द इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाऊंटन्ट्स ऑफ इंडियाने (आयसीएआय) घेतलेल्या सनदी लेखापाल (सीए) अभ्यासक्रमाच्या अंतिम परीक्षेचा निकाल आज जाहीर झाला आहे. ‘मीत यांचे हे यश करिअरच्या वेगवेगळ्या वाटा चोखाळणाऱ्या होतकरू […]
महाराष्ट्र
Stay updated with the latest news from Maharashtra. Our Maharashtra News section covers local events, state politics, government decisions, social issues, and all the important happenings that impact the people of Maharashtra.
बाळ ठाकरे स्मारकाच्या बांधकामासाठी सर्व कायदेशीर प्रक्रियांचे पालन, BMC आणि MHCC ची उच्च न्यायालयात माहिती
मुंबई : बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC) आणि मुंबई हेरिटेज कन्झर्व्हेशन कमिटी (MHCC) यांनी मुंबई उच्च न्यायालयाला सांगितले आहे की शिवसेना प्रमुख दिवंगत बाळ ठाकरे यांच्या स्मारकाच्या बांधकामासाठी जमीन देण्याआधी सर्व आवश्यक परवानग्या आणि प्रक्रियांचे पालन करण्यात आले होते. दादर येथील शिवाजी पार्क येथील जुन्या महापौर बंगल्याचे स्मारकात रूपांतर करण्याच्या महाराष्ट्र सरकारच्या 2017 च्या निर्णयाला आव्हान देणाऱ्या […]
मुंबई उपनगर जिल्ह्यातील विद्यमान मतदारांकडून ‘आधार’ची माहिती १ ऑगस्टपासून संग्रहित करणार
मुंबई : मुंबई उपनगर जिल्ह्यातील मतदार यादीतील नागरिकांचा आधार क्रमांक मिळविण्याचा उद्देश मतदारांच्या मतदार यादीतील मतदार नोंदीचे प्रमाणीकरण करणे आणि भविष्यात त्यांना अधिक चांगली निवडणूक सेवा प्रदान करणे आहे. मतदारांकडून ऐच्छिकपणे आधारची माहिती संग्रहित करण्यासाठी भारत निवडणूक आयोगाच्या शिफारशीनुसार निवडणूक कायद्यामध्ये व नियमामध्ये सुधारणा करण्यात आली आहे. त्यानुसार 1 ऑगस्ट 2022 पासून मुंबई उपनगर जिल्ह्यामध्ये […]
…अन्यथा ती दोन गावे वाहून गेली असती
नांदेड : नांदेड जिल्ह्यातील तेलंगणाच्या सिमेवर असलेले शेवटचे गाव अप्पारावपेठ. गत तीन दिवसाच्या सलग पावसाने किनवट तालुक्यातून वाहणाऱ्या पैनगंगेसह सर्वच लहान-मोठ्या नदी, नाल्याचे पाणी धोक्याच्या पातळीवर आलेले. विशेष म्हणजे माहूरच्या डोंगररांगा या संपूर्ण किनवट तालुक्यासह आदिलाबाद पर्यंत पोहचलेल्या आहेत. याच डोंगररांगावर किनवट तालुक्यातील सिमेवरचे गाव म्हणून अप्पारावपेठ ओळखले जाते. या गावाची दुसरी ओळख म्हणजे या […]
कोविड मोफत बूस्टर डोस मोहिमेची अंमलबजावणी करणार, मुख्यमंत्री शिंदे यांची पंतप्रधान मोदी यांना ग्वाही
मुंबई : शुक्रवारपासून पुढील 75 दिवस देशातील सर्व प्रौढ व्यक्तींना कोविडचा बूस्टर डोस(वर्धक मात्रा) मोफत देण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला असून या मोहिमेची पुरेपूर अंमलबजावणी महाराष्ट्रात केली जाईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना काल दिली. या देशव्यापी मोहिमेसंदर्भात आपली प्रधानमंत्र्यांशी आज चर्चा झाली आहे, अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी मंत्रिमंडळ बैठकीच्या वेळी […]
गडचिरोली पूर परिस्थितीचा आढावा, मंत्रिमंडळ बैठकीत मुख्यमंत्र्यांनी दिले ‘हे’ निर्देश
गडचिरोली : गडचिरोली येथील पूर परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन याठिकाणी नागरिकांचे स्थलांतर तसेच मदत कार्यासाठी तात्काळ अधिकची एनडीआरएफ, एसडीआरएफ पथके त्याठिकाणी पाठवावी, तसेच प्रसंगी बाजूच्या राज्यातूनही एनडीआरएफ पथक मागवावे असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत. आज राज्य मंत्रिमंडळ बैठकीत राज्यातील अतिवृष्टी व पूर परिस्थितीचा आढावा बैठकीत घेण्यात आला, यावेळी मुख्यमंत्र्यांनी हे निर्देश दिले. […]
शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर अनुदानाचा निर्णय पुढील मंत्रिमंडळ बैठकीत
मुंबई : राज्यात २०१८-१९ च्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांना शासनाच्या वतीने नुकसान भरपाई देण्यात आली होती. त्यामुळे त्यांना ५० हजार रुपये प्रोत्साहनपर अनुदान योजनेतून वगळण्यात आले होते. मात्र नियमित कर्जफेड करणाऱ्या या शेतकऱ्यांनादेखील हे प्रोत्साहनपर अनुदान देण्याचा निर्णय पुढील मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात येईल, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. खासदार धैर्यशील माने आणि आमदार प्रकाश आबिटकर यांनी […]
द्रौपदी मुर्मू मुंबईत दाखल, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी केले स्वागत
मुंबई : राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या राष्ट्रपती पदाच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू या आज मुंबईत दाखल झाल्या. यावेळी त्यांचे मुंबई येथील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वागत केले. राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीपूर्वी द्रौपदी मुर्मू या एक दिवसीय मुंबई दौऱ्यावर असून या भेटीत त्या शिवसेना आणि भाजप खासदार आणि आमदारांची लीला हॉटेलमध्ये […]
मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आले ‘हे’ महत्वाचे निर्णय, वाचा सविस्तर…
पेट्रोल करात पाच, तर डिझेलच्या करात तीन रुपयांची कपात राज्यातील पेट्रोलच्या करात पाच रुपये प्रति लिटर आणि डिझेलच्या करात तीन रुपये इतकी कपात करण्याचा निर्णय आज मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. कर कपातीचा निर्णय आज ( १४ जुलै) मध्यरात्रीपासून लागू होईल. पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांनी केलेल्या आवाहनानुसार राज्य सरकारने […]
ब्रेकिंग! पेट्रोल आणि डिझेलच्या किमती झाल्या कमी, राज्य सरकारची घोषणा
मुंबई : राज्यातील नागरिकांना महागाईच्या जाचातून काहीसा दिलासा मिळाला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील नवीन सरकारने पेट्रोल आणि डिझेलच्या किमती अनुक्रमे 5 रुपये आणि 3 रुपये प्रतिलिटरने कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. मंत्रिमंडळ बैठक निर्णय गुरूवार दि. १४ जुलै २०२२ रोजीच्या बैठकीतील निर्णय संक्षिप्त स्वरूपात: – पेट्रोलवर ५ रुपये आणि डिझेलवर ३ रुपये प्रति […]









