Full support from the state for Italian investors – Deputy Chief Minister Devendra Fadnavis
देश महाराष्ट्र

इटालीयन गुंतवणूकदारांसाठी राज्याकडून संपूर्ण सहकार्य – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई : इटली आणि भारताचे संबंध हे नेहमीच सौहार्दपूर्ण राहीले आहेत. गुंतवणूकदारांना येत असलेल्या अडचणी दूर करण्यासाठी राज्याकडून संपूर्ण सहकार्य केले जाईल, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. इंडो- इटालीयन औद्योगिक संबंधांची पाच दशके साजरे करण्यासाठी मुंबई येथे आयोजित एका कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी इटलीचे भारतातील राजदूत विंचेझो दे लुका, इंडो -इटालीयन चेंबर […]

Chandrakant Patil
महाराष्ट्र मुंबई

मराठा समाजातील विद्यार्थ्यांना एससी, एसटी, ओबीसी प्रमाणे निर्वाह भत्ता

मुंबई : मराठा समाजातील विद्यार्थ्यांना सामाजिक न्याय विभागाच्या निकषानुसार एससी/एसटी/ओबीसी या प्रवर्गातील विद्यार्थ्यांप्रमाणे वर्षाला 60 हजार रुपये निर्वाह भत्ता देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली. छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्था (सारथी) या अंतर्गत वसतीगृह, शिष्यवृत्ती योजनांच्या अंमलबजावणीबाबत मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष चंद्रकांत […]

DCC's 30th Anniversary Blood Donation Camp Concluded
पुणे महाराष्ट्र

डीसीसीच्या ३०व्या वर्धापनदिनानिमित्त भव्य रक्तदान शिबीर संपन्न

पुणे : संगणक क्षेत्रातील डेटा केअर कॉर्पोरेशनच्या ३०वा वर्धापन दिन व कंपनीचे संस्थापक व व्यवस्थापकीय संचालक अनिल म्हस्के यांच्या वाढदिवसानिमीत्त रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. डीसीसी आणि सह्याद्री हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने जेएम रोडला आयोजित करण्यात आलेल्या या शिबीरात १५० जणांनी सहभाग घेतला यामध्ये १०१ पिशव्या रक्त संकलन करण्यात आले. यावेळी दत्ता खाडे सरचिटणीस […]

Shivshahi bus catches fire in Pune on Yerwada Road
पुणे महाराष्ट्र

ब्रेकिंग! पुण्यात येरवडा परिसरात शिवशाही बसला भीषण आग

पुणे : पुण्यातील येरवडा परिसरात शिवशाही बसला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. दरम्यान, बसमधील सर्व प्रवाशांना सुखरूप बाहेर काढण्यात आलं आहे. सर्व ४२ प्रवासी सुखरूप आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, येरवडा येथील शास्त्रीनगर चौकात शिवशाही (यवतमाळ ते पुणे) बसला भीषण आग लागली. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या 2 गाड्या आणि एक पाण्याचा टँकर घटनास्थळी दाखल झाले. […]

A new grand sports complex will be built in Beed
बीड महाराष्ट्र

बीडमध्ये नवीन भव्य क्रीडा संकुल उभारणार, एकता दौडला बीडकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

बीड : जिल्ह्याच्या क्रीडा क्षेत्राच्या विकासासाठी जिल्हा क्रीडा संकुलात विविध सुविधा निर्माण करण्यात येतील. तसेच केंद्र शासकीय योजनेतून बीडमध्ये नवीन भव्य असे क्रीडा संकुल निर्माण करण्यात येईल, असे प्रतिपादन राज्याचे सहकार व इतर मागास बहुजन कल्याण मंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री अतुल सावे यांनी आज येथे केले. देशाचे पहिले उपपंतप्रधान व गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल […]

Central government approval for electronic manufacturing cluster in Ranjangaon 5000 youths will get employment
पुणे महाराष्ट्र

पुणेकरांसाठी आनंदाची बातमी! रांजणगावमध्ये इलेक्ट्रॉनिक मॅन्युफॅक्चरिंग क्लस्टरसाठी केंद्र सरकारची मान्यता, ५००० तरुणांना रोजगार उपलब्ध होणार

पुणे : राष्ट्रीय इलेक्ट्रॉनिक्स धोरणांतर्गत रांजणगाव (पुणे) येथे 297.11 एकरमध्ये इलेक्ट्रॉनिक मॅन्युफॅक्चरिंग क्लस्टरसाठी केंद्र सरकारने आज मान्यता दिली आहे. या माध्यमातून 5000 तरुणांना रोजगार उपलब्ध होणार आहेत. हा प्रकल्प राज्यात आणल्याबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी आभार मानले आहेत. तसेच पुण्यामध्ये CDAC हाही प्रकल्प लवकरच येणार असून या […]

Chief Minister Eknath Shinde reviewed the tourism development works in Satara district
महाराष्ट्र सातारा

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला सातारा जिल्ह्यातील पर्यटन विकास कामांचा आढावा

सातारा : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दोन दिवसांच्या दरे (ता. महाबळेश्वर) दौऱ्यावर आहेत. त्यांनी महाबळेश्वर, पाचगणीसह सातारा जिल्ह्यातील क वर्ग पर्यटन तसेच धार्मिक व यात्रा स्थळांच्या विकास कामांचा आढावा घेतला. दरे ता. महाबळेश्वर येथील निवासस्थानी जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी सादरीकरणाद्वारे जिल्ह्यातील पर्यटन व धार्मिक स्थळांच्या विकास कामांची माहिती दिली. या प्रसंगी कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस […]

Veterinarians should be treated as per improved recommendations for lumpy - Animal Husbandry Commissioner Sachindra Pratap Singh
महाराष्ट्र मुंबई

लम्पी चर्मरोग : नुकसान भरपाईपोटी राज्यात 3091 पशुपालकांच्या खात्यावर 8.05 कोटी रुपये जमा

मुंबई : राज्यात लम्पी चर्मरोगामुळे ज्या पशुपालकांचे गोवंशीय पशुधन मृत्युमुखी पडले, अशा 3091 पशुपालकांच्या खात्यांवर नुकसान भरपाईपोटी रु. 8.05 कोटी रक्कम जमा करण्यात आली असल्याचे पशुसंवर्धन आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह यांनी सांगितले. सिंह म्हणाले, राज्यामध्ये 31 ऑक्टोबर २०२२ अखेर 33 जिल्ह्यांमधील एकूण 3204 गावांमध्ये लम्पी चर्मरोग प्रादुर्भाव दिसून आला आहे. बाधित गावांतील एकूण 172528 बाधित […]

Major fire breaks out at restaurant in Pune
पुणे महाराष्ट्र

पुणे : मार्व्हल व्हिस्टा व्यावसायिक इमारतीच्या सातव्या मजल्यावरील रेस्टॉरंटमध्ये भीषण आग

पुणे : पुणे शहरातील लुल्लानगर भागात एका इमारतीच्या वरच्या मजल्यावर असलेल्या रेस्टॉरंटमध्ये आग लागली. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या तीन गाड्या आणि तीन पाण्याचे टँकर आग विझवण्यासाठी घटनास्थळी पोहोचले. मार्व्हल व्हिस्टा कमर्शियल बिल्डिंगच्या सातव्या मजल्यावर असलेल्या व्हेजिटा रेस्टॉरंटमध्ये ही आग सकाळी 8.15 च्या सुमारास लागली. अधिकाऱ्यांनी सांगितले की सकाळी ९.१५ च्या सुमारास आग आटोक्यात आणण्यात […]

Chief Minister Eknath Shinde Not Feeling Well, doctors advised him to rest
महाराष्ट्र सोलापूर

सांगोला-मिरज मार्गावर कारने चिरडल्याने 8 वारकऱ्यांचा मृत्यू, मृतांच्या कुटुंबियांना पाच लाख रुपये मदतीची मुख्यमंत्र्यांची घोषणा

सोलापूर : कार्तिकी यात्रेसाठी पंढरपूरकडे पायी निघालेल्या वारकऱ्यांना सांगोला-मिरज मार्गावर वाहनाने चिरडल्यामुळे झालेल्या दुर्घटनेवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शोक व्यक्त केला आहे. तसेच मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी पाच लाख रुपये तातडीच्या मदतीची देखील त्यांनी घोषणा केली आहे. विठ्ठलाचे नामस्मरण करत ही दिंडी पायी पंढरपूरकडे रवाना झालेली होती. कोल्हापूर जिल्ह्यातील जठारवाडी या गावातील रहिवासी या दिंडीमध्ये होते. […]