मुंबई : मुंबई देशाची आर्थिक राजधानी असून महाराष्ट्र राज्य हे देशाच्या विकासाचे इंजिन आहे. राज्य देशात औद्योगिक विकासात आघाडीवरील राज्य आहे. राज्यात उद्योगांसाठी शाश्वत पायाभूत सोयीसुविधा, दळण-वळणाची अद्ययावत साधने उपलब्ध असून येथे उपस्थित विविध देशांच्या वाणिज्यदुतांनी महाराष्ट्रात गुंतवणुकीला प्राधान्य द्यावे, असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी येथे केले. भारतीय स्वातंत्र्याच्या ७६ व्या वर्धापन दिनानिमित्त हॉटेल […]
महाराष्ट्र
Stay updated with the latest news from Maharashtra. Our Maharashtra News section covers local events, state politics, government decisions, social issues, and all the important happenings that impact the people of Maharashtra.
कल्याणमध्ये बारा वर्षांच्या अल्पवयीन मुलीची चाकूने वार करत हत्या, आरोपी पोलिसांच्या ताब्यात
कल्याण : तिसगाव परिसरात एका तरुणानं एका बारा वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर चाकूने हल्ला केल्याची संतापजनक घटना घडली. आरोपीने अल्पवयीन मुलीवर चाकूने सात ते आठ वार करत तिची हत्या केली. नागरिकांनी आरोपीला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. या आरोपीचे नाव आदित्य कांबळे (वय 20) आहे. मुलीवर हल्ला केल्यानंतर आरोपी फिनेल प्यायला होता. त्यामुळे त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल […]
पुणे : वानवडीत ज्वेलर्सच्या दुकानाला भीषण आग
पुणे : पुण्यात वानवडी येथील एका ज्वेलर्सच्या या दुकानाला पहाटे भीषण आग लागली. या आगीत दुकानातील फर्निचर जळून खाक झाले तर चांदीच्या मूर्ती आणि इतर वस्तू आगीत वितळून गेल्या. वानवडी येथील परमार पार्क सोसायटीत या दुकानाला सकाळी सात वाजण्याच्या सुमारास आग लागली होती. मिळालेल्या माहितीनुसार, ज्वेलर्सच्या दुकानाला सकाळी सात वाजण्याच्या सुमारास आग लागली होती. दुकानातून […]
स्वातंत्र्यदिनानिमित्त आयोजित ‘स्पिरिट ऑफ इंडिया’ चित्रप्रदर्शनास मुख्यमंत्र्यांची भेट
मुंबई : स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर दि. १४ आणि १५ ऑगस्ट रोजी भारतीय वन सेवेतील अधिकारी व चित्रकार प्रदीप वाहुळे यांच्या ‘स्पिरिट ऑफ इंडिया’ या चित्र प्रदर्शनाचे आयोजन मंत्रालयातील त्रिमूर्ती प्रांगणात करण्यात आले होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी १५ ऑगस्ट रोजी ध्वजारोहणानंतर या प्रदर्शनाला भेट दिली व चित्रकार वाहुळे यांचे कौतुक केले. ‘स्पिरिट ऑफ इंडिया’ या चित्र […]
पुणे : बाप-लेकीचा भाटघर धरणात बुडून मृत्यू
पुणे : दोन पर्यटकांचा भाटघर धरणात बुडून मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. भाटघर धरणाच्या बॅकवॉटरमध्ये पोहताना तेरा वर्षीय ऐश्वर्या शिरीष धर्माधिकारी आणि तिचे वडील शिरीष मनोहर धर्माधिकारी (वय ४५) यांचा बुडून मृत्यू झाला. मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी संध्याकाळी शिरीष धर्माधिकारी आणि ऐश्वर्या कुटुंबातील इतर सदस्यांसह भोर तालुक्यातील पसुरे गावाजवळ पिकनिकसाठी आले असताना ही घटना घडली. […]
शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे – मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील
बुलडाणा : राज्यात पावसाचा असमतोल निर्माण झाला आहे. काही वेळा जिल्ह्यात एकीकडे अतिवृष्टी तर दुसरीकडे पावसाची कमी नोंद झाली आहे. जिल्ह्यातील काही तालुक्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांवर आलेल्या या संकटात शासन शेतकऱ्यांच्या पाठिशी खंबीरपणे उभे राहिल, अशी ग्वाही मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांनी दिली. स्वातंत्र्यदिनाच्या 76 व्या वर्धापनदिनी जिल्हाधिकारी कार्यालयात […]
पुरामुळे गडचिरोलीतील संपर्क तुटणारी गावे पूल आणि बारमाही रस्त्याने जोडणार – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
गडचिरोली : भारतीय स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नक्षलग्रस्त गडचिरोली जिल्ह्यात अनेक विकास कामांचे लोकार्पण केले. गडचिरोलीच्या इतिहासात कोठी कोरनार या अतिशय दुर्गम व नक्षलग्रस्त भागात जाणारे देवेंद्र फडणवीस हे पहिलेच वरिष्ठ लोकप्रतिनिधी आहेत. कोठी कोरणार येथे वीर बाबुराव शेडमाके पुलाचे लोकार्पण त्यांच्या हस्ते करण्यात आले. या पुलामुळे छत्तीसगड राज्य […]
मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीसाठी मोबाईल ॲप तथा व्हॉट्स ॲप हेल्पलाईनचे मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते उद्घाटन
मुंबई : मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीच्या लाभार्थींसाठी मोबाईल ॲप तथा व्हॉट्स ॲप हेल्पलाईनचा शुभारंभ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आज करण्यात आला. याचवेळी दुर्धर व गंभीर आजारांवर यशस्वी मात केलेल्या रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांचा आनंद मेळा सह्याद्री अतिथीगृह येथे आयोजित करण्यात आला होता. यावेळी विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा, […]
सहा महिन्यांत कायमस्वरूपी पुनर्वसन करणार, इरशाळवाडीवासियांना मुख्यमंत्र्यांचा दिलासा
मुंबई : इरशाळवाडी दुर्घटनाग्रस्तांसाठी तात्पुरत्या उभारलेल्या निवारा व्यवस्थेची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पाहणी केली. महिनाभराच्या आत दुसऱ्यांदा मुख्यमंत्री इरशाळवाडीवासियांचे अश्रू पुसण्यासाठी आले. त्यांनी वडीलकीच्या नात्याने सर्वांना धीर दिला..शासन भक्कमपणे पाठीशी असल्याची ग्वाही दिली. कायमस्वरूपी निवासाची व्यवस्था सहा महिन्यांत होईल, असा विश्वास स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी मुख्यमंत्र्यांनी डौलाने फडकणाऱ्या तिरंग्याच्या साक्षीने यावेळी दिला! दिवसभरातील स्वातंत्र्य दिनानिमित्तचे कार्यक्रम आटोपून […]
पुणे मेट्रो : बाणेर रोडवरील वाहतुकीत बदल, वापरा ‘हे’ पर्यायी मार्ग…
पुणे : पुणे मेट्रो प्रकल्पासाठी सुरू असलेल्या बांधकामामुळे बाणेर रोडवरील वाहतूक मार्गांमध्ये आवश्यक बदल करण्यात आले आहेत. या बांधकामाच्या महत्त्वाच्या टप्प्यात पोर्टल बीम टाकण्याचे काम समाविष्ट आहे, जे बाणेर रोडवरील ग्रीन पार्क हॉटेल जंक्शन आणि पल्लोड फार्म रोड दरम्यान होणार आहे. दरम्यान, उपरोक्त बांधकाम कार्यान्वित करताना बाणेर रोडवर सुरळीत वाहतूक व्यवस्था सुनिश्चित करणे अत्यावश्यक आहे. […]










