150 crore rupees for the upliftment of economically weaker sections – Deputy Chief Minister Devendra Fadnavis
महाराष्ट्र

आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांच्या उन्नतीसाठी दीडशे कोटी रुपये – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई : खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत)ची स्थापना करण्यात आली आहे. संस्थेमार्फत या घटकांच्या उन्नतीसाठी शैक्षणिक योजना, स्वयंरोजगारासाठी प्रशिक्षण व नोकरीइच्छुक युवकांसाठी यूपीएससी व एमपीएससीचे अभ्यासक्रम सुरू करण्यासाठी संस्थेला यावर्षी दीडशे कोटी रुपये देणार, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. अमृत संस्थेच्या अडीअडचणी आणि भविष्यातील योजना याबाबत आढावा […]

All the systems should maintain coordination in accordance with Kandal forest protection and conservation - Divisional Commissioner Dr. Mahendra Kalyankar
महाराष्ट्र

कांदळवन संरक्षण व संवर्धनाच्या अनुषंगाने सर्व यंत्रणांनी समन्वय ठेवावा – विभागीय आयुक्त डॉ. महेंद्र कल्याणकर

नवी मुंबई : कांदळवन संरक्षण व संवर्धनाच्या अनुषंगाने शासकीय यंत्रणांनी समन्वय ठेवून पर्यावरणाचा ऱ्हास होऊ नये यासाठी प्रयत्न करावे. अशा सूचना कोकण विभागीय आयुक्त महेंद्र कल्याणकर यांनी दिल्या. कोकण विभागीय आयुक्त कार्यालयाच्या सभागृहात कांदळवन संरक्षण व संवर्धनाच्या अनुषंगाने आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत ते बोलत होते. या बैठकीस अप्पर प्रधान वनसंरक्षक(कांदळवन) एस. व्ही. रामराव उपस्थित होते. […]

Agriculture universities should implement pilot projects of spraying by drones – Agriculture Minister Dhananjay Munde
महाराष्ट्र

कृषी विद्यापीठांनी ड्रोनद्वारे फवारणीचे पथदर्शी प्रकल्प राबवावेत – कृषी मंत्री धनंजय मुंडे

मुंबई : राज्यातील कृषी विद्यापीठांनी शेतीशी संबंधित कामांसाठी ड्रोन वापरण्याची व्यवहार्यता तपासण्यासाठी चालू खरीप हंगामात पथदर्शी प्रकल्प हाती घ्यावेत, असे निर्देश कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी आज दिले. महात्मा फुले कृषी विद्यापीठामध्ये रिमोट पायलट (ड्रोन) प्रशिक्षण संस्था (आर.पी.टी.ओ.) अंतर्गत सुरु असलेले ड्रोन प्रशिक्षण केंद्र इतर विद्यापीठात चालू करण्यासंदर्भात व प्रकल्पाचा आढावा घेण्यासाठी आयोजित बैठकीत ते […]

Eknath Shinde
महाराष्ट्र सातारा

सातारा जिल्ह्यात पर्यावरणपूरक पर्यटनाचा विकास करणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

सातारा : सातारा जिल्ह्यामध्ये पर्यटनाच्या वाढीसाठी मोठा वाव आहे. जिल्ह्यात पर्यावरण पूरक पर्यटनाचा विकास करुन स्थानिकांच्या रोजगार निर्मितीवर भर देणार असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. सातारा येथील शासकीय विश्रामगृहात माध्यमांशी संवाद साधताना ते बोलत होते. महाबळेश्वर सह तापोळा, बामणोली, कास, वासोटा या सर्व भागात पर्यटनाच्या विकासासाठी सर्व सुविधा उभरल्या जात असल्याचे सांगून मुख्यमंत्री शिंदे […]

Pune: One dead After Multiple Vehicles Collide With Each Other In Kondhwa
पुणे महाराष्ट्र

पुणे : कोंढव्यात अनेक वाहनांचा विचित्र अपघात, एकाचा मृत्यू

पुणे : कोंढवा येथील खडी मशीन चौकाजवळ भीषण अपघात झाला. अनेक वाहनांची धडक होऊन झालेल्या या अपघातात एका व्यक्तीला आपला जीव गमवावा लागला, तर पाच जण जखमी झाले आहेत. प्रशांत कृष्णा चौरे (४३, रा. धनकवडी) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी सकाळी साडेनऊच्या सुमारास कात्रज-कोंढवा बायपास रोडवर ही घटना घडली. एका वाहनाच्या […]

Proposal to set up agricultural processing industry under consideration of government – Marketing Minister Abdul Sattar
महाराष्ट्र

शेतमाल प्रक्रिया उद्योग उभारण्याचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन – पणन मंत्री अब्दुल सत्तार

मुंबई : शेती निसर्गावर अवलंबून असल्यामुळे त्यामध्ये अनेक प्रकारची अनिश्चितता असते. डोंगराळ व शेतकरी आत्महत्याग्रस्त भागांमध्ये शेतकरी हितासाठी शेतमाल प्रक्रिया सहकारी संस्थांच्या माध्यमातून प्रक्रिया उद्योग उभारण्याचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन आहे, असे पणन मंत्री अब्दुल सत्तार यांनी सांगितले. कृषी प्रक्रिया सहकारी संस्थांना प्रकल्प उभारणीसाठी देण्यात येणारे भाग भांडवल कर्ज व शासकीय भाग भांडवल याबाबत पणन विभागामार्फत […]

Tribals should take advantage of schemes for higher education – Chief Minister Eknath Shinde
महाराष्ट्र

आदिवासींनी उच्च शिक्षणासाठी योजनांचा लाभ घ्यावा – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

पालघर : जल, जंगल, जमिनीचे रक्षण करत पर्यावरण जपणाऱ्या आदिवासी बांधवांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शासनाच्या सहाय्याने सर्वांनी काम करणे गरजेचे आहे. आदिवासी विद्यार्थ्यांच्या उच्च शिक्षणासाठी सुरू केलेल्या शासकीय योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. मुख्यमंत्री शिंदे यांनी क्रांतीवीर बिरसा मुंडा यांना नमन करून जागतिक आदिवासी दिनाच्या सर्व आदिवासी बांधवाना शुभेच्छा दिल्या. […]

Deputy Chief Minister Ajit Pawar
पुणे महाराष्ट्र

विकासप्रकल्प मार्गी लावण्याच्या कामांना वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सर्वोच्च प्राधान्य द्यावे – उपमुख्यमंत्री अजित पवार

पुणे : “पुणे मेट्रो रेल्वे प्रकल्पातल्या मार्गिका १, २ आणि ३ ची उर्वरीत कामे तातडीने पूर्ण केली जातील. पुणे-नाशिक रेल्वेमार्गाच्या कामाला गती दिली जाईल. पुणे रिंगरोडचे काम आता कुठल्याही कारणामुळे रखडणार नाही. पुणे येथील कृषिभवन, शिक्षण आयुक्तालय, कामगार कल्याण भवन, सहकार भवन, नोंदणी भवन, साखर संग्रहालय, इंद्रायणी मेडिसिटी, शिरुर-खेड-कर्जत मार्गाचं चौपदरीकरण, ‘सारथी’चं प्रशिक्षण केंद्र, वढू-तुळापूर […]

Senior writer Prof. Hari Narke Passes away
महाराष्ट्र

ज्येष्ठ विचारवंत, लेखक प्रा. हरी नरके यांचे निधन

मुंबई : महात्मा फुले यांच्यावर विपुल लेखन करणारे, लेखक प्रा. हरी नरके यांचे निधन झाले आहे. ते ७० वर्षांचे होते. गेल्या अनेक दिवसांपासून ते आजारी होते. मुंबईतल्या एशियन हार्ट रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. समता परिषदेच्या माध्यमातून त्यांनी ओबीसी प्रश्नांवरून सत्ताधाऱ्यांना अनेकदा धारेवर धरलं होतं. त्यांच्या निधनाने पुरोगामी चळवळीची मोठी हानी झाली आहे. सकाळी मुंबईला […]

Filmmaker Siddique passes away
महाराष्ट्र

लोकप्रिय चित्रपट निर्माते सिद्दिकी यांचे निधन

लोकप्रिय चित्रपट निर्माते सिद्दिकी (63) यांचे 8 ऑगस्ट 2023 रोजी कोची येथे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. काल रात्री ९. १० वाजताच्या सुमारास त्यांचा अमृता रुग्णालयात मृत्यू झाला, जिथे गेल्या एक महिन्यापासून त्यांच्यावर यकृताशी संबंधित आजारांवर उपचार सुरू होते. मात्र, सोमवारी त्यांची प्रकृती बिघडली होती. डॉक्टरांनी त्यांना ईसीएमओ (एक्स्ट्राकॉर्पोरियल मेम्ब्रेन ऑक्सिजनेशन) सपोर्टवर ठेवले होते. सिद्दिकी यांच्या […]