Implemented a single window scheme for obtaining all types of permits for election campaigning
ठाणे महाराष्ट्र राजकारण

निवडणूक प्रचारासाठी सर्व प्रकारच्या परवानग्या घेणेकामी एक खिडकी योजना कार्यान्वित

ठाणे : भिवंडी लोकसभा मतदार संघांतर्गत निवडणुकी करता उभे राहिलेले सर्व उमेदवार अंतिम झाल्यावर सर्व उमेदवारांना चिन्ह वाटप केल्यावर सर्व उमेदवारांची स्थायी समिती स्थापन करण्यात आली असून या समितीची पहिली बैठक निवडणूक निर्णय अधिकारी संजय जाधव यांच्या अधिपत्याखाली घेण्यात आली. या बैठकीला केंद्रीय खर्च विषयक निरीक्षक चित्तरंजन माझी, केंद्रीय सर्वसाधारण निवडणूक राजनविर सिंग कपूर उपस्थित […]

Election Commission Of India
महाराष्ट्र राजकारण

पाचव्या टप्प्यात राज्यात २६४ उमेदवार निवडणूक रिंगणात

मुंबई : लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यात राज्यातील 13 मतदारसंघात नामनिर्देशन पत्र दाखल करण्याची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. यात छाननीनंतर 301 उमेदवारांचे अर्ज पात्र ठरले होते. त्यातील 37 उमेदवारांनी माघार घेतल्याने आता 264 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत, अशी माहिती मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने दिली आहे. पाचव्या टप्प्यातील निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांची अंतिम संख्या पुढीलप्रमाणे : धुळे […]

election
महाराष्ट्र राजकारण

लोकसभा निवडणूक : सकाळी ११ वाजेपर्यंत सरासरी १८.१८ टक्के मतदान

मुंबई : राज्यातील लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातील मतदान आज दि.७ में २०२४ रोजी सकाळी ७.००वा.पासून सुरु झाले आहे. तिसऱ्या टप्प्यातील एकूण अकरा मतदार संघात ११वाजेपर्यंत सरासरी १८.१८ टक्के मतदान झाले आहे. तिसऱ्या टप्प्यातील एकूण ११ लोकसभा मतदारसंघनिहाय टक्केवारी पुढीलप्रमाणे लातूर – २०.७४ टक्के सांगली – १६.६१ टक्के बारामती – १४.६४ टक्के हातकणंगले – २०.७४ टक्के […]

Raj Thackeray is praised by the Chief Minister
ठाणे महाराष्ट्र

राज ठाकरे हे कोत्या मनाचे नसून मोठ्या मनाचे व्यक्ती, मुख्यमंत्र्यांकडून राज ठाकरेंचे कौतुक

ठाणे : राज ठाकरे हे मोठ्या मनाचे व्यक्ती असून कोत्या मनाचे नाहीत, असे एकनाथ शिंदे यांनी म्हटले आले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज ठाकरे यांचे कौतुक केले असून उद्धव ठाकरे यांना टोला लगावला आहे. मनसेचे पदाधिकारी महायुतीचा प्रचार मनापासून करत असल्याचेही एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे. ठाणे लोकसभा मतदारसंघात महायुतीच्या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते, […]

election
महाराष्ट्र सातारा

सातारा जिल्हा परिषदेच्या २००० अधिकारी-कर्मचारी पथकांकडून १ लाख कुटुंबांना भेटून मतदान जनजागृती

सातारा : लोकसभा मतदारसंघातील मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी ४ मे २०२४ हा दिवस मतदार गृहभेट दिवस म्हणून सातारा स्वीप कक्षाकडून राबविण्यात आला. आजच्या दिवशी जिल्ह‌्यामध्ये मा. याशनी नागराजन, मुख्य कार्यकारी अधिकारी तथा जिल्हा नोडल अधिकारी स्वीप कार्यक्रम, लोकसभा सार्वत्रिक निवडणूक -२०२४ यांचे निर्देशानुसार स्थानिक स्वराज्य संस्थांचा व्यापक जनसंपर्क पाहता विस्तारीत प्रशासकीय यंत्रणा असल्याने जिल्हयातील सर्व अधिकारी, […]

A foreign delegation arrived at Alibaug to inspect the election process
महाराष्ट्र मुंबई राजकारण

निवडणूक प्रक्रियेच्या पाहणीसाठी विदेशी प्रतिनिधी मंडळाचे अलिबाग येथे आगमन

रायगड : भारत निवडणूक आयोगाने इतर देशांच्या निवडणूक व्यवस्थापन संस्था यांच्याबरोबर आंतरराष्ट्रीय सहकार्य आणि सहभागासाठी आइव्हीपी कार्यक्रम आयोजित केला आहे. त्याअंतर्गत विदेशी प्रतिनिधीचे मंडळ निवडणूक प्रक्रियेची पाहणी करण्याकरिता रायगड जिल्ह्यातील 32 रायगड लोकसभा मतदार संघात आगमन झाले आहे. या प्रतिनिधी मंडळाने आज अलिबाग विधानसभा मतदारसंघातील मतदान अधिकारी आणि टीमच्या साहित्य वाटप, वाहतूक आणि स्ट्रॉंग रूम, […]

Keep 'nursery' at polling stations ready - Collector Dilip Swamy
छत्रपती संभाजी नगर महाराष्ट्र राजकारण

मतदान केंद्रांवरील ‘पाळणाघरे’ सज्ज ठेवा – जिल्हाधिकारी दिलीप स्वामी

छत्रपती संभाजीनगर, दि.४ (जिमाका): मतदान केंद्रांवर मतदानासाठी येणाऱ्या मातांची बालके सांभाळण्यासाठी मतदान केंद्रांवर पाळणाघरांची सुविधा उपलब्ध करावयाची आहे. ही जबाबदारी आरोग्य विभाग व महिला व बालकल्याण विभाग यांनी संयुक्तपणे पार पाडावयाची असून ही पाळणाघरे मतदानाच्या आदल्यादिवशी म्हणजे दि.१२ रोजी सज्ज असायला हवी, यादृष्टीने नियोजन करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी दिलीप स्वामी यांनी […]

In the wake of the Lok Sabha elections a major operation of confiscation of liquor
जळगाव महाराष्ट्र राजकारण व्यसनमुक्ती

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दारु जप्तीची मोठी कारवाई

जळगाव, दि. 4 (जिमाका) : लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 च्या पार्श्वभूमीवर जळगाव राज्य उत्पादन शुल्क विभागाने दि. 4 मे , 2024 रोजी एमआयडीसी भागातील के-10 सेक्टर मधील मंदार आयुर्वेदित प्रोडक्ट या कंपनीत मारलेल्या छाप्यात बनावट देशी दारुचा कारखाना जमीनदोस्त केला असुन 75 लक्ष 64 हजार 200 रुपये किमंतीचा मुद्दामाल हस्तगत केला आहे. याप्रकरणी 05 आरोपींना […]

Central Government announces prestigious Padma Awards
देश महाराष्ट्र

पद्म पुरस्कारांसाठी नामांकने मागविण्याचे आवाहन; १५ सप्टेंबरपर्यंत मुदत

नवी दिल्ली : केंद्रसरकार प्रजासत्ताकदिनाच्या पूर्वसंध्येला पद्म पुरस्कारांची घोषणा करत असते. त्यास अनुसरून यावर्षीही पद्म पुरस्कार 2025 साठी ऑनलाईन नामांकन/ शिफारशीबाबतचे आवाहन केले आहे. याबाबतची निवेदने स्वीकारण्याची सुरुवात 1 मे 2024 पासून सरकारने केली असून, पद्म पुरस्कारांसाठी नामांकने स्वीकारण्याची अंतिम तारीख 15 सप्टेंबर 2024आहे. पद्म पुरस्कारांसाठी नामांकन/ शिफारशी राष्ट्रीय पुरस्कार पोर्टल (https://awards.gov.in) वर ऑनलाइन स्वीकारल्या […]

Election Commission Of India
देश महाराष्ट्र राजकारण

निवडणुकीदरम्यान ‘डीप फेक’ सारख्या गैरप्रकारांवर कारवाईचे शासनाचे आदेश

मुंबई : लोकसभा निवडणुकीदरम्यान डीप फेक व्हिडिओज, क्लिप्स, फोटो किंवा इतर प्रकारचा कंटेंट तयार करून तो समाजमाध्यमे / डिजिटल माध्यमांवरून प्रसारित करण्यात येत आहे. या गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी संबंधितांवर कडक कारवाई शासनामार्फत करण्यात येणार आहे. यासंदर्भात पोलीस महासंचालकांना सूचना देण्यात आल्या आहेत. फोटोशॉप, मशीन लर्निंग (एमएल) किंवा आर्टिफिशियल इंटेलिजन्स (एआय) यांसारख्या विविध तंत्रांचा गैरवापर करून […]