Interested students are invited to apply for the training scheme of Sahitya Ratna Demokratir Anna Bhau Sathe Development Corporation
महाराष्ट्र मुंबई शैक्षणिक

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे विकास महामंडळाच्या प्रशिक्षण योजनेसाठी इच्छुक विद्यार्थ्यांनी अर्ज करण्याचे आवाहन

मुंबई दि.७ : साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे विकास महामंडळ (मर्या) मुंबई शहर व उपनगर साठी विविध प्रशिक्षण योजनेचे उद्दिष्ट प्राप्त झाले असून, मातंग समाज व तत्सम १२ पोटजातीतील कुटुंबाच्या सामाजिक,आर्थिक उन्नतीसाठी रोजगार व स्वयंरोजगाराची साधने उपलब्ध व्हावेत या उद्देशाने सन २०२४-२५ या आर्थिक वर्षाकरिता उद्दिष्ट प्राप्त झाले आहे. जिल्ह्यातील इच्छुक पात्र विद्यार्थ्यांनी योजनेच्या लाभासाठी […]

What exactly are the 'Red', 'Orange', 'Green' and 'Yellow' alerts issued by the Meteorological Department
महाराष्ट्र

सिंधुदुर्ग जिल्ह्यात ७ ते ८ जून रोजी यलो अलर्ट, तर ९ ते ११ जूनदरम्यान ऑरेंज अलर्ट

सिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्ग जिल्ह्यात 7 ते 8 जून 2024 रोजी यलो अलर्ट तर दि. 9 ते 11 जून 2024 रोजी ऑरेंज अलर्ट असल्याचे प्रादेशिक हवामान विभागाने कळविले आहे. जिल्ह्यात दि. 7 व 8 जून 2024 या कालावधीत गडगडाट होऊन पाऊस पडण्याची व वीजा चमकण्याची शक्यता आहे. तसेच दि. 7 जून रोजी 50 ते 60 किमी […]

pre-kharif season planning by agriculture minister
महाराष्ट्र मुंबई

खरीप हंगाम पूर्व नियोजनाचा कृषीमंत्र्यांकडून आढावा; बी-बियाणे, खते वेळेत उपलब्ध करण्याचे निर्देश

मुंबई दि. ७ : यावर्षी खरिपाच्या क्षेत्रात एक लाख दहा हजार हेक्टरने वाढ झाली असून बियाण्यांच्या व खतांच्या पुरवठ्याबाबत सूक्ष्म नियोजन केले जात आहे. सध्याची एकूण बियाणे मागणी ही 18 लाख क्विंटल इतकी असून वाढलेल्या क्षेत्राचा विचार करून राज्य शासनाने 24 लाख क्विंटल बियाणे मंजूर केले आहे. त्यापैकी 13 लाख क्विंटल वितरीत केले असून आणखी […]

Record of Somnath Gite's work in London Book of World Records
देश पुणे महाराष्ट्र

लंडन बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये डॉ. सोमनाथ गिते यांच्या कार्याची नोंद

पुणे : व्यसनमुक्ती विषयावर अनेक वर्षांपासून काम करणाऱ्या डॉ. सोमनाथ गिते यांच्या कार्याची दखल ‘लंडन बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड या संस्थेने घेतली आहे. व्यसनमुक्तीवर प्रचार, प्रसार, प्रबोधनाचे उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल लंडन बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये गिते यांच्या नावावर विक्रम नोंदवण्यात आला आहे. या संस्थेकडून त्यांना सन्मानचिन्ह, ट्रॉफी, प्रमाणपत्र देवून गौरविण्यात आले आहे. सध्याची तरुणाई ही […]

SDRF trooper drowns while searching for drowned children in Pravara river
अहिल्यानगर महाराष्ट्र

दुःखद घटना – प्रवरा नदीत बुडालेल्या मुलांचा शोध सुरू असताना एसडीआरएफचे जवान बुडाले, तीन जवानांचा मृत्यू, दोघांचा शोध सुरु…

संगमनेर – बुडालेल्या मुलांच्या शोधासाठी एसडीआरएफचे जवान गुरुवारी सकाळी पोहचले होते. सकाळी त्यांनी मुलांच्या शोध सुरु केल्यानंतर त्यांची बोट बुडाली. या दुर्घटनेत तीन जवानांचा मृत्यू झाला आहे. तसेच दोन जवानांचा शोध सुरु आहे. अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यात प्रवरा नदीत पोहण्यासाठी गेलेले दोन युवकांचा बुधवारी बुडून मृत्यू झाला. सागर पोपट जेडगुले (वय – २५ रा. धुळवड […]

Agriculture Department's call for recommendations, amendments in the Handbook of Major Cereal Crops
महाराष्ट्र शेती

भरडधान्य पिकांच्या पुस्तिकेमध्ये शिफारशी, सुधारणा सुचविण्याचे कृषी विभागाचे आवाहन

मुंबई, दि. 21 : भरडधान्य, पौष्टिक तृणधान्य, कडधान्य व गळीतधान्य पिकांचे क्षेत्र, उत्पादन व उत्पादकता वाढविण्यासाठी कृषी विभागामार्फत पुस्तिका तयार करण्याचे काम सुरू आहे. या पुस्तिकेत या पिकांचे पेरणीपासून काढणीपर्यंतचे लागवड तंत्रज्ञान, कीड रोग व्यवस्थापन याविषयी माहिती देण्यात येणार आहे. या पुस्तिकेच्या मजकुराचा क्युआर कोड सोबत देण्यात येत आहे. या पुस्तिकेमध्ये काही शिफारशी, सुधारणा तसेच […]

Monsoon Preparedness Review of Amravati Division by Amravati Divisional Commissioner
अमरावती महाराष्ट्र

अमरावती विभागीय आयुक्तांकडून अमरावती विभागाच्या मान्सून पूर्वतयारी आढावा

अमरावती, दि. 18 (जिमाका) : पावसाळ्यात पुरामुळे बाधित होणाऱ्या ठिकाणी तसेच दुर्गम गावांत जलदरित्या मदत पोहोचण्याच्या दृष्टीने प्रभावी नियोजन करावे. त्यासाठी आपत्ती व्यवस्थापन कक्ष 24 तास कार्यान्वित ठेवून हवामान खात्याचे इशारे त्वरित नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी महसूल व संबंधित यंत्रणांनी सतर्क राहावे. तसेच जुने रस्ते-पुल व जुन्या इमारतींचे स्ट्रक्चरल ऑडीट करुन त्याचा अहवाल तातडीने सादर करावा, असे […]

Citizens should be vigilant to prevent heatstroke – Divisional Commissioner Dr. Nidhi Pandey
अमरावती तब्येत पाणी महाराष्ट्र

उष्माघातापासून बचावासाठी नागरिकांनी सतर्क राहावे – विभागीय आयुक्त डॉ. निधी पाण्डेय

अमरावती, दि. 8 : जिल्ह्याचे तापमान 40 अंशाच्या वर असून तापमानात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. उन्हाचा पारा वाढत असताना त्याकडे दुर्लक्ष केल्यास उष्माघाताचा त्रास होऊन प्रकृती गंभीर होऊ शकते. त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहणे आवश्यक आहे. यासाठी नागरिकांनी तीव्र उन्हात फिरणे टाळावे, भरपूर पाणी प्यावे, थकवा, मळमळ व ताप आल्यास तात्काळ वैद्यकीय सल्ला घेऊन उपचार […]

State Excise Department
महाराष्ट्र मुंबई व्यसनमुक्ती

राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई; २३.५५ लाख किंमतीचा मुद्देमाल जप्त

मुंबई, दि. 8 : उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने ठाणे जिल्ह्यातील विविध ठिकाणी 7 मे रोजी अवैध दारू निर्मिती करणाऱ्यांवर कारवाई केली. या संपूर्ण कारवाईमध्ये 59 हजार 980 लीटर दारू व इतर भट्टी साहित्यासह एकूण 23 लाख 55 हजार 210 रूपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई ठाणे जिल्ह्यातील दिवा गाव, घेसर, खर्डी, अलीमघर, […]

In eight constituencies in the second phase of the Lok Sabha elections
महाराष्ट्र सोलापूर

मतदारांना पाय दाबून देण्यासाठी फूट मसाजर मशीनची सुविधा

सोलापूर : जिल्ह्यातील सोलापूर व माढा लोकसभा मतदारसंघासाठी 7 मे 2024 रोजी सकाळी सात ते सायंकाळी सहा या कालावधीत मतदान होणार आहे. या अंतर्गत प्रत्येक विधानसभा मतदारसंघात दोन आदर्श मतदान केंद्र निर्माण करण्यात आलेली आहेत. या मतदान केंद्रावर मतदारांसाठी विविध सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत. त्याच अनुषंगाने करमाळा तालुक्यातील गोयेगाव येथे निवडणूक विभागाच्या वतीने […]