cabinet
महाराष्ट्र मुंबई

प्राचीन, ऐतिहासिक वास्तूंचे नुकसान केल्यास दोन वर्षाचा तुरुंगवास, एक लाख दंडाची तरतूद

मुंबई : राज्यातील प्राचीन व ऐतिहासिक वास्तूंचे नुकसान केल्यास आता दोन वर्षांच्या तुरूंगवासाची तसेच एक लाख रुपयांपर्यंतच्या दंडाची तरतूद करण्यास मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. अशा वास्तूंना हानी पोहचवून त्यांचे पावित्र्य भंग करणाऱ्यांना आळा घालण्यासाठी ही तरतूद करण्यात येत आहे. सध्या, महाराष्ट्र प्राचीन स्मारके व पूराणवस्तूशास्त्रविषयक स्थळे व अवशेष […]

cabinet
महाराष्ट्र मुंबई

राज्यातील अकृषिक कर पूर्णपणे माफ, मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय

मुंबई : राज्यातील अकृषिक कर आकारणीचा जनतेवर पडत असलेला बोजा पूर्णपणे काढण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. सद्या गावातील गावठाणांमध्ये असणाऱ्या जमिनीवरील अकृषिक कर कायमस्वरुपी माफ आहे. मात्र गावठाणाबाहेर रहिवासी घरांची संख्या वाढत असल्याने आणि शहरी भागात बहुमजली इमारती वाढत असल्याने अशा इमारतींखालील जमिनींचा संपूर्ण अकृषिक कर रद्द करण्याचा […]

पुणे महाराष्ट्र

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते येरवडा येथील विविध विकास कामांचे भूमिपूजन

पुणे : उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या हस्ते येरवडा येथील भाजी मंडईच्या नूतनीकरण कामाचे तसेच शास्त्रीनगर चौक येथील उड्डाणपूल बांधकामाचे भूमिपूजन करण्यात आले. यावेळी आमदार सुनील टिंगरे, महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा श्रीमती रुपाली चाकणकर, पुणे महानगर पालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले, शहर अभियंता प्रशांत वाघमारे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता डॉ. सुरेंद्रकुमार […]

महाराष्ट्र

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची पुनर्वसित इर्शाळवाडीला भेट, पुनर्वसित विद्यार्थ्यांना नोकरी तर महिलांना देणार रोजगार

रायगड : इर्शाळवाडी दुर्घटनेला एक वर्ष पूर्ण झाले आहे. सिडकोमार्फत या दरडग्रस्तांच्या 44 घराचे बांधकाम हे अंतिम टप्प्यात आहे. आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या ठिकाणी भेट देऊन पाहणी केली आणी कामाचा आढावा घेतला. येत्या काही दिवसात या घराचा ताबा संबंधित कुटुंबाला देण्यात येईल, असेही त्यांनी यावेळी सांगितले. पुणे दौरा आटोपून मुंबईकडे जात असताना मुख्यमंत्री […]

महाराष्ट्र

मायमराठीच्या इतिहासातील एक ऐतिहासिक दिवस- उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई : मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याचा निर्णय हा मराठी भाषेसाठी ऐतिहासिक असून आजचा दिवस सोनेरी दिवस असल्याची प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त करीत या निर्णयाबद्दल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे आभार मानले आहेत. महाराष्ट्रातील 12 कोटी जनतेच्या वतीने आभार मानताना उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, हा दिवस उजाडावा, यासाठी मी मुख्यमंत्री असताना आणि आताही […]

Crime News Rape
क्राईम पुणे महाराष्ट्र

पुणे हादरलं! बोपदेव घाटात २१ वर्षीय तरुणीवर सामूहिक बलात्कार

पुणे : पुण्यात मुलींवरील अत्याचाराची घटना ताजी असतानाच पुण्यातील बोपदेव घाट परिसरातून सामूहिक बलात्काराची घटना समोर आली आहे. बोपदेव घाटामध्ये एका २१ वर्षीय तरुणीवर तीन जणांनी सामूहिक बलात्कार केल्याचे समोर आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पीडित तरुणी मित्रासोबत फिरायला गेली होती. यावेळी तीन अज्ञात व्यक्तींनी बोपदेव घाटात तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. ही मुलगी जखमी अवस्थेत सापडली […]

Police constable dies after falling from train
महाराष्ट्र मुंबई

पोलीस कॉन्स्टेबलचा ट्रेनमधून पडून मृत्यू, रात्रभर मिळाली नाही मदत…

मुंबई: एका पोलीस कॉन्स्टेबलचा ट्रेनमधून पडून मृत्यू झाला आहे. हा पोलीस हवालदार सुमारे सहा ते सात तास गंभीर अवस्थेत रेल्वे रुळावर पडून राहिला.  परंतु, वेळेवर मदत न मिळाल्याने त्यांचा मृत्यू झाला. अमित ज्ञानेश्वर गोंदके (वय २८) असं या पोलीस हवालदाराचे नाव असून, ते अंधेरी रेल्वे पोलीस ठाण्यात कार्यरत होते. बुधवारी गोंदके कर्तव्य बजावल्यानंतर डोंबिवली येथे […]

monkeypox
देश महाराष्ट्र

मंकीपॉक्स विषाणूच्या प्रादुर्भावाविषयी केंद्र सरकारकडून जनजागृतीसाठी सूचना

नवी दिल्ली : केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने मंकीपॉक्स विषाणूच्या संदर्भात सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना सजग राहण्याचे निर्देश दिले आहेत. भारतात मंकीपॉक्स क्लेड 1बी चा नवीन रुग्ण आढळल्याने, भारत हा आफ्रिकेबाहेरील तिसरा देश ठरला आहे, ज्यात या प्रकारचा रुग्ण आढळला आहे. 26 सप्टेंबर रोजी जारी केलेल्या निर्देशानुसार, केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण विभागाने मंकीपॉक्स संशयित रुग्णांना […]

महाराष्ट्र शेती

शेतकऱ्यांच्या बँक खात्यात आंबिया बहारमधील नुकसान भरपाई लवकरच जमा होणार

मुंबई : आंबिया बहार २०२३-२४ हंगामासाठी आत्तापर्यंत निर्धारित झालेली ८१४ कोटी रुपये नुकसान भरपाईची रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर विमा कंपनीमार्फत लवकरच जमा करण्यात येईल, अशी माहिती कृषी आयुक्त कार्यालयाने दिली आहे. फळपिकांना हवामान धोक्यापासून विमा संरक्षण दिल्यास शेतकऱ्यांचे आर्थिक स्थैर्य अबाधित राखण्याच्या दृष्टीने मदत होईल, या हेतूने राज्यात हवामान आधारित फळ पीक विमा योजना राबविण्यात […]

sanjay raut
महाराष्ट्र मुंबई

संजय राऊत अब्रूनुकसानीच्या खटल्यात दोषी, न्यायालयाने सुनावली १५ दिवसांची कैद

मुंबई : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे खासदार संजय राऊत यांना अब्रुनुकसानीच्या खटल्यात दोषी ठरवण्यात आले आहे. राऊत यांना १५ दिवसांची कैद सुनावण्यात आली आहे. याशिवाय २५ हजार रुपयांचा दंडही ठोठावण्यात आला आहे. शिवडीच्या शहर दंडाधिकाऱ्यांनी याप्रकरणी निकाल सुनावला. भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांच्या पत्नी मेधा सोमय्या यांनी यासंदर्भात कोर्टात याचिका दाखल केली होती. […]