मुंबई : शिवसेना (उबाठा) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या ‘मातोश्री’ निवासस्थानाबाहेर रविवारी चार फूट लांब नाग आढळला. उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री निवासस्थानी पाण्याच्या टाकीमागे हा साप आढळून आला. याची माहिती तातडीने वनविभागाला देण्यात आली. याबद्दल माहिती मिळाल्यानंतर उद्धव ठाकरे आणि त्यांचा मुलगा तेजस ठाकरे साप पाहण्यासाठी निवासस्थानाबाहेर आले. यानंतर साप पकडणारे पथक घटनास्थळी पोहोचले आणि नागाला […]
मुंबई
राज्य सरकारचा मोठा निर्णय! पुणे-मुंबई महामार्गावरील वाहतूक कोंडी लवकरच संपणार…
पुणे : पुणे-मुंबई आणि मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर ट्रॅफिक जाम होणे आता नित्याचे झाले आहे. एक्स्प्रेस वेवर प्रवास करणाऱ्या वाहनचालकांना जादा टोल भरूनही नेहमीच वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे आता याबाबत राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे वाहतूक कोंडीचा प्रश्न सुटणार आहे. पुणे-मुंबई द्रुतगती मार्ग 2002 मध्ये बांधण्यात आला. या […]
महाराष्ट्र विधिमंडळाचे सन 2023 चे पावसाळी अधिवेशन विधेयकांची माहिती
मुंबई : राज्यातील सर्वसामान्य जनतेला न्याय देण्याचा प्रयत्न पावसाळी अधिवेशनात करण्यात आला. अधिवेशनात 41 हजार 243 कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्या मांडण्यात आल्या, अशी माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्रकार परिषदेत दिली. पुरवणी मागण्यांद्वारे प्राप्त निधी शेतकऱ्यांसाठी नमो सन्मान योजना, नैसर्गिक आपत्तीत शेतकऱ्यांना मदत, महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजना अशा सर्वसामान्यांसाठी असणाऱ्या विविध योजनांसाठी निधी उपलब्ध […]
पावसाळी अधिवेशन राष्ट्रगीताने संस्थगित, पुढील अधिवेशन ७ डिसेंबर रोजी नागपूर येथे
मुंबई : विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन आज राष्ट्रगीताने संस्थगित करण्यात आले. पुढील अधिवेशन गुरुवार 7 डिसेंबर 2023 रोजी विधानभवन, नागपूर येथे होणार असल्याची घोषणा विधानपरिषदेत उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी, तर विधानसभेत अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर यांनी केली. विधानपरिषदेत प्रत्यक्षात 88 तास 33 मिनिटे कामकाज विधानपरिषदेत प्रत्यक्षात 88 तास 33 मिनिटे कामकाज झाले. रोजचे सरासरी कामकाज […]
गुणवत्तापूर्ण शैक्षणिक उपक्रमासाठी तंत्र शिक्षण संचालनालय आणि आयआयटी, मुंबई यांच्यात सामंजस्य करार
मुंबई : राज्यातील अभियांत्रिकी अभ्यासक्रमाच्या शासकीय व अनुदानित पदवी संस्थांमधील अध्यापक तसेच विद्यार्थ्यांना आयआयटी, मुंबई येथील तज्ज्ञ प्राध्यापकांचे मार्गदर्शन मिळावे आणि गुणवत्तापूर्ण शैक्षणिक उपक्रम राबवता यावेत, यासाठी तंत्र शिक्षण संचालनालय आणि आयआयटी, मुंबई यांच्यात आयआयटी पवई येथे सामंजस्य करार करण्यात आला आहे, अशी माहिती उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली. मंत्री पाटील […]
महसूल हा शासनाचा महत्त्वाचा विभाग – विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर
मुंबई : महसूल विभागासोबत समाजातील प्रत्येक नागरिकांचा संबंध येतो. त्यांच्या सेवेसाठी विभाग सदैव तत्पर असून हा विभाग प्रशासनाचा कणा असल्याचे गौरवोद्गार विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर यांनी काढले. महसूल विभागाकडून देण्यात येणाऱ्या सेवा आणि विभागाद्वारे राबविण्यात येणाऱ्या विविध योजना याबाबत राज्यातील नागरिकांना अधिकाधिक माहिती प्राप्त होणे आवश्यक आहे. नागरिकांना या योजनांचा योग्य लाभ घेता यावा […]
महात्मा फुले जनआरोग्य योजनेत आता ५ लाखाचे आरोग्य संरक्षण कवच
मुंबई : महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना ही राज्यातील सर्व शिधापत्रिकाधारक, अधिवास प्रमाणपत्र धारण करणाऱ्या नागरिकांना लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे राज्याच्या सर्व नागरिकांना आरोग्य कवच प्राप्त होणार असून या योजनेंतर्गत आरोग्य संरक्षण प्रती कुटुंब प्रती वर्ष दीड लाख रूपयांवरून 5 लाख रूपये एवढे करण्याचा निर्णय 28 जून,2023 रोजी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत […]
मुंबई उपनगरातील रस्त्यांचे दोन वर्षांच्या आत काँक्रीटीकरण करणार – पालकमंत्री मंगल प्रभात लोढा
मुंबई : अंधेरी येथील गोखले पुलाच्या पहिल्या गर्डरसाठी साहित्य पुरविण्यात आले असून, पुलाचे बांधकाम गतीने पूर्ण करा. सततच्या पावसामुळे रस्त्यावर खड्डे पडून नागरिकांना वाहतूक कोंडींचा सामना करावा लागत आहे, यासाठी तातडीने खड्डे भरावेत. नागरिकांना दर्जेदार रस्ते मिळावेत यासाठी मुंबई उपनगरातील सर्व रस्त्यांचे दोन वर्षांच्या आत अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून काँक्रीटीकरण करण्याच्या सूचना मुंबई उपनगरचे पालकमंत्री […]
पालघरजवळ जयपूर-मुंबई ट्रेनमध्ये गोळीबार, पोलीस कर्मचाऱ्यासह अन्य तीन प्रवाशांचा मृत्यू
मुंबई : जयपूर-मुंबई एक्स्प्रेस ट्रेनमध्ये गोळीबार झाल्याची घटना समोर आली आहे. पालघरनजीक चालत्या ट्रेनमध्ये ही धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये चार जणांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये एका पोलीस कर्मचाऱ्याचा देखील समावेश आहे. एक्स्प्रेस ट्रेनच्या बी-५ या बोगीमध्ये हा प्रकार घडला. त्यानंतर ही एक्सप्रेस मीरारोड स्थानकात थांबवून मृत्यमुखी पडलेल्या चारही व्यक्तींचे मृतदेह शताब्दी रुग्णालयात नेण्यात आले. […]
राजपूत भामटा जमातीच्या नावातील भामटा शब्द वगळला जाणार नाही – इतर मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे
मुंबई : राज्यातील विमुक्त जाती व भटक्या जमातीमध्ये समावेश असलेल्या राजपूत भामटा या जमातीतील ‘भामटा’हा शब्द वगळला जाणार नाही, असे इतर मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे यांनी विधान परिषदेत स्पष्ट केले. त्याचप्रमाणे खोट्या जात प्रमाणपत्रांबाबत एसआयटी नेमली जाईल आणि सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई केली जाईल, असेही त्यांनी सांगितले. राजपूत भामटा जमातीच्या नावातील भामटा […]








