मुंबई : राज्य सरकारमधील मंत्री नवाब मलिक यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी निषेध मोर्चा काढणारे भाजप नेते देवेंद्र फडणवीस आणि इतर पक्षाच्या नेत्यांना मुंबई पोलिसांनी ताब्यात घेतले. नवाब मलिक यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी निषेध मोर्चा काढल्याबद्दल फडणवीस यांच्यासह मुंबई पोलिसांनी प्रवीण दरेकर, आशिष शेलार, गिरीश महाजन, नितीश राणे, मंगल प्रभात लोढा आणि निरंजन डावकरे यांनाही अटक केली. मला […]
मुंबई
नवाब मलिकांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी, विशेष न्यायालयाकडून ईडीची मागणी मान्य
मुंबई : कुख्यात गुंड दाऊद इब्राहिम याच्याशी आर्थिक व्यवहार केल्याप्रकरणी ईडीच्या कोठडीत असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री नवाब मलिक यांना विशेष न्यायालयाने दिलासा देण्यास नकार दिला आहे. पीएमएलए न्यायालयाने नवाब मलिक यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. यापूर्वी नवाब मलिक हे ईडीच्या कोठडीत होते. मात्र, आजच्या सुनावणीदरम्यान ईडीने नवाब मलिक यांना न्यायालयीन कोठडीत पाठवण्यास हरकत […]
मुंबईतील ‘डबेवाला भवन’चे उद्घाटन
मुंबई : बेस्ट बस आणि लोकल यांना मुंबईची लाईफलाईन म्हटले जाते. त्या नसा असतील तर मुंबईतील डबेवाले रक्त आहेत, अशा शब्दात पर्यावरण मंत्री तथा मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री आदित्य ठाकरे यांनी मुंबईतील डबेवाल्यांच्या कार्याचे कौतुक केले. मुंबई महानगरपालिकेच्या शेरली, बांद्रा व्हिलेज, बांद्रा (पश्चिम) येथील समाज कल्याण केंद्राची २८६.२७ चौ. मी. क्षेत्रफळाची जागा मुंबई टिफिन बॉक्स […]
श्री छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखान्यास उत्पादन बंद ठेवण्याचे प्रदूषण नियंत्रण मंडळाचे आदेश
मुंबई : सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प कार्यकारी व्यवस्थापन व देखभाल यंत्रणा समाधानकारक नसल्याने श्री छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखान्यास उत्पादन बंद ठेवण्याचे आदेश प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या कोल्हापूर विभागीय कार्यालयाने दिले आहेत. पंचगंगा नदी प्रदूषणाबाबत तक्रारी प्राप्त होत असल्याने स्थानिक पातळीवर प्रदूषण नियंत्रण मंडळामार्फत पाहणी करण्यात आली. यानंतर सुनावणी घेण्यात येऊन त्रुटी आढळल्यानुसार हे आदेश बजावण्यात आले […]
मुंबईत फॉर्म्युला- १ पॉवर बोट वर्ल्ड चॅम्पियनशिप स्पर्धा २०२२ चे आयोजन
मुंबई : मुंबईत फॉर्म्युला 1 (F 1 H 2 O) पॉवर बोट वर्ल्ड चॅम्पियनशिप 2022 या स्पर्धेचे डिसेंबर 2022 मध्ये आयोजन करण्यात येणार असून, ही स्पर्धा यशस्वीपणे पार पाडण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्यात येणार असल्याची माहिती क्रीडा व युवक कल्याण मंत्री सुनील केदार यांनी दिली. जागतिक स्तरावरील पॉवर बोट वर्ल्ड चॅम्पियनशिप स्पर्धेविषयी मंत्रालयात आज बैठकीचे आयोजन […]
नारायण राणे आणि नितेश राणे उद्या मुंबई पोलिसांसमोर हजर होणार
मुंबई : केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि आमदार नितेश राणे उद्या मुंबई पोलिसांसमोर हजर होणार आहेत. दिवंगत अभिनेता सुशांत सिंग राजपूतची माजी व्यवस्थापक दिशा सालियन यांच्यावर कथित बदनामीकारक वक्तव्य केल्याप्रकरणी केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि त्यांचा मुलगा आमदार नितेश राणे उद्या उपनगर मालवणी येथे मुंबई पोलिसांसमोर हजर होणार आहेत. एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की याआधी […]
अधिवेशनाचा पहिलाच दिवस वादळी, राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या विरोधात घोषणाबाजी आणि…
मुंबई : महाविकास आघाडीच्या आमदारांनी विधानसभेच्या बाहेर गुरुवारी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्याविरोधात जोरदार निदर्शने केली. राज्यपालांनी छत्रपती शिवाजी महाराजांविरोधात वादग्रस्त वक्तव्य केल्याचा आरोप आमदारांनी केला आहे. एएनआय या वृत्तसंस्थेनेही निदर्शनाचा व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये आमदार राज्यपालांच्या विरोधात घोषणाबाजी करताना दिसले. राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा पहिला दिवस वादळी ठरला. अधिवेशनाची सुरुवात प्रथेप्रमाणे राज्यपाल किंवा राष्ट्रपतींच्या […]
एसटीचे विलनीकरण नाहीच?; राज्य सरकारच्या त्रिसदस्यीय समितीचा महत्त्वाचा अहवाल सादर..
मुंबई : एसटीचे राज्य सरकारमध्ये विलीनीकरण करावे ही एसटी कर्मचाऱ्यांची मागणी अपूर्णच राहण्याची चिन्हे आहेत. राज्य सरकारच्या त्रिसदस्यीय समितीने हे विलीनीकरण अशक्य असल्याचे आपल्या अहवालात म्हटले असून, हा अहवाल बुधवारच्या मंत्रिमंडळ बैठकीत सादर करण्यात आला. विशेष म्हणजे येत्या काळात एसटीतील कर्मचारी भरतीही बंद करण्यात येणार असून, भविष्यात कंत्राटी पद्धतीनेच कर्मचाऱ्यांची भरती करण्याबाबत बैठकीत चर्चा झाल्याचे […]
मुंबई-पुणे एक्स्प्रेसवर भीषण अपघात; ट्रेलरची एकापाठोपाठ ४ कारना धडक.. असा झाला अपघात..
खोपोली : मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर विचित्र अपघात झाला आहे. मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरील मुंबईकडील मार्गिकेवर ट्रेलरने चार कारना जोरदार धडक दिली. या अपघातात दोघांचा मृत्यू झाला. तर अन्य दोघे जण जखमी झाले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर खोपोलीजवळ हा भीषण अपघात झाला. ट्रेलर चालकाचे नियंत्रण सुटले. अनियंत्रित ट्रेलरने मुंबईच्या दिशेकडील मार्गिकेवर एका कारला धडक दिली. […]
राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेच्या जिल्हानिहाय उद्दिष्टांमध्ये सुधारणा
मुंबई : राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेअंतर्गत राज्यात सात कोटी लाभार्थ्यांना लाभ मिळत आहे. राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियमांतर्गत जिल्हानिहाय उद्दिष्टांमध्ये सुधारणा केल्यानंतर राज्यात 25 लाख 05 हजार 300 अंत्योदय अन्न योजना शिधापत्रिकाधारकांना तर 5 कोटी 92 लाख 16 हजार प्राधान्य कुटुंब लाभार्थींना सवलतीच्या दरात अन्नधान्य योजनेचा लाभ मिळणार आहे. अशी माहिती अन्न,नागरी पुरवठा व ग्राहक हक्क […]










