मुंबई : कोरोना रुग्णांमध्ये संथपणे वाढ दिसत असून राज्यातील जनतेने मास्क वापरत रहावे, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीच्या माध्यमातून जनतेला केले. राज्याची साप्ताहिक पॉझिटीव्हीटी 1.59 टक्के असून मुंबई आणि पुणे या दोन शहरांमध्ये राज्याच्या सरासरीपेक्षा जास्त पॉझिटीव्हीटी आढळते. मुंबईत रुग्णसंख्येत 52.79 टक्के वाढ झाली असून ठाण्यामध्ये 27.92 टक्के तर रायगड आणि […]
मुंबई
सारथी संस्थेस खारघरमध्ये भुखंड उपलब्ध करुन देणार, मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय
मुंबई : छत्रपती शाहू महाराज संशोधन प्रशिक्षण व मानव विकास संस्था (सारथी), पुणे या संस्थेस नियोजन विभागामार्फत नवी मुंबईतील खारघर सेक्टर 37, मधील 3 हजार 500 चौ.मी.क्षेत्रफळाचा भूखंड देण्याचा निर्णय आज मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते. राज्य शासनाने मराठा, कुणबी, कुणबी-मराठा व मराठा-कुणबी यांच्या शैक्षणिक, आर्थिक व सामाजिक उन्नतीसाठी या […]
राज्याचे परिवहनमंत्री अनिल परब यांच्यावर ‘ईडी’ची मोठी कारवाई; मनी लाँन्ड्रिंगचा गुन्हा दाखल
मुंबई: राज्याचे परिवहनमंत्री आणि शिवसेना नेते अनिल परब यांच्यावर सक्तवसुली संचलनालयाकडून (ईडी) आर्थिक गैरव्यवहारप्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच अनिल परब यांच्याशी संबंधित राज्यातील सात ठिकाणांवर ईडीकडून छापे टाकण्यात आले आहे. या छाप्यांमधून ईडीच्या हाती कोणती माहिती आणि पुरावे लागणार, हे पाहावे लागेल. ईडीच्या या कारवाईमुळे अनिल परब यांच्यासमोरील अडचणी वाढण्याची शक्यता आहे. आता […]
कृषी उत्पादन निर्यातीत महाराष्ट्र देशात प्रथम क्रमांकावर असल्याचा अभिमान – कृषिमंत्री दादाजी भुसे
मुंबई : भाजी आणि फलोत्पादन निर्यातीत महाराष्ट्र देशात प्रथम क्रमांकावर असल्याचा अभिमान आहे. अर्थव्यवस्थेचा कणा असलेल्या शेतकरी बांधवांना आम्ही अन्नदाता संबोधतो. कर्नाटक राज्याप्रमाणे ‘ई-पिक पाहणी’ ॲप राज्यात कार्यरत असून, त्याचा लाभ शेतकऱ्यांयांना होणार असल्याचे कृषिमंत्री दादाजी भुसे यांनी सांगितले. आज सह्याद्री अतिथिगृहात कर्नाटकचे कृषिमंत्री बी.सी. पाटील यांच्या समवेत शिष्टमंडळाने कृषिमंत्री दादाजी भुसे यांची भेट घेतली. […]
मत्स्योत्पादनात महाराष्ट्राला देशातील प्रथम क्रमांकाचे राज्य बनवणार, महामत्स्य अभियान कसे आहे? जाणून घ्या…
मुंबई : महाराष्ट्राला लाभलेला ७२० कि.मी. समुद्रकिनाऱ्याचा आणि मुबलक प्रमाणात उपलब्ध असलेल्या नैसर्गिक संसाधनांचा कल्पकतेने उपयोग करण्याची आवश्यकता आहे. त्यासाठी आधुनिक तंत्रज्ञान व नाविन्यपूर्ण उपक्रमांच्या सहाय्याने या क्षेत्रातील तज्ज्ञांना सोबत घेऊन राज्याला मत्स्योत्पादनामध्ये प्रथम क्रमांक प्राप्त करुन देण्याचा निर्धार मत्स्यव्यवसाय मंत्री अस्लम शेख यांनी आज केला. मुंबईतील तारापोरवाला मत्स्यालयात स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त ‘महामत्स्य अभियाना’चा […]
जोडीदारासोबत संभोग करताना 61 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू, मुंबईतील हॉटेलमध्ये घडली धक्कादायक घटना
मुंबई : मुंबईतील एका हॉटेलमध्ये एक अतिशय धक्कादायक घटना घडली आहे. आपल्या जोडीदारासोबत शारीरिक संबंध ठेवत असताना 61 वर्षीय व्यक्ती बेशुद्ध पडली आणि त्यानंतर त्याला रुग्णालयात मृत घोषित करण्यात आले. अधिकाऱ्याच्या म्हणण्यानुसार, मृत व्यक्ती सकाळी १० वाजता उपनगरातील कुर्ला येथील हॉटेलमध्ये ४० वर्षीय महिलेसह आला होता, या व्यक्तीने त्याच्याबरोबर असलेली महिला आपली प्रेयसी असल्याचे सांगितले […]
स्नातकांनी उदयोन्मुख भारताच्या निर्मितीत योगदान द्यावे – राज्यपाल भगत सिंह कोश्यारी
मुंबई : देशात पुनरुत्थान होत असून आत्मनिर्भर भारत बनविण्यासाठी सर्वंकष प्रयत्न सुरु आहेत. अशावेळी विद्यापीठाच्या स्नातकांनी उन्नत भारताच्या निर्मितीसाठी योगदान द्यावे, असे आवाहन राज्यपाल तथा कुलपती भगत सिंह कोश्यारी यांनी आज येथे केले. राज्यपाल कोश्यारी यांच्या दूरस्थ उपस्थितीत मंगळवारी (दि. २४) जळगाव येथील कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचा ३० वा दीक्षांत समारोह संपन्न झाला […]
महाअनुषाच्या माध्यमातून शिक्षण, आरोग्यासोबतच पर्यावरण संवर्धनाचे काम व्हावे – विभागीय आयुक्त सौरभ राव
पुणे : महाअनुषा पोर्टलच्या माध्यमातून पुणे जिल्ह्यात शिक्षण, आरोग्य, महिला व बालविकास घटकाच्या विकासासोबतच यापुढे पर्यावरण संवर्धनाचे काम व्हावे, असे प्रतिपादन विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी केले. पुणे जिल्ह्यात महाअनुषा पोर्टलला स्वयंसेवी संस्था, उद्योगसमूहांनी दिलेल्या प्रतिसादाबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले. विभागीय आयुक्त कार्यालयात पुणे जिल्हा परिषदेच्यावतीने महाअनुषा पोर्टल अंतर्गत आयोजित चर्चासत्रात ते बोलत होते. यावेळी […]
सेवाग्राम विकास आराखड्याअंतर्गत करावयाच्या कामांसाठी ८१ कोटी रुपयांचा अतिरिक्त निधी मंजूर
मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या शिखर समितीच्या बैठकीत आज सेवाग्राम विकास आराखड्यांतर्गत करण्यात येत असलेल्या कामांसाठी ८१.५७ कोटी रुपयांचा अतिरिक्त निधी मंजूर करण्यात आला तसेच एकूण २४४.०८७ कोटी रुपयांच्या सुधारित सेवाग्राम आराखड्यास मान्यता देण्यात आली. सेवाग्राम विकास आराखड्याअंतर्गत करावयाची कामे ही वेळेत पूर्ण व्हावीत तसेच त्या कामांचा दर्जा उत्कृष्ट राहील याची दक्षता […]
इतर मागास बहुजन कल्याण विभागातर्फे परदेश शिष्यवृत्तीकरिता अर्ज करण्याचे आवाहन
मुंबई : इतर मागास बहुजन कल्याण विभागातर्फे विजाभज, इमाव व विमाप्र या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना परदेशात शिक्षण घेण्यासाठी शिष्यवृत्ती देण्यात येते. सन २०२२-२३ या आर्थिक वर्षात परदेश शिष्यवृत्ती साठी २३ जून २०२२ पर्यंत विद्यार्थ्यांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. तरी इच्छुकांनी विहीत वेळेत अर्ज करावेत, असे आवाहन इतर मागास बहुजन कल्याण संचालनालयाचे संचालक डी.डी.डोके यांनी केले आहे. […]










