जळगाव, दि. 4 (जिमाका वृत्तसेवा) : क्रीडा व युवक सेवा संचालनालय, पुणे व महाराष्ट्र कबड्डी असोसिएशन व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने छत्रपती शिवाजी महाराज चषक राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेच्या आयोजनाचा मान जळगाव जिल्ह्यास मिळाला आहे. ही जिल्ह्यासाठी गौरवाची बाब असल्याने या स्पर्धेचे सर्व संबंधितांनी काटेकोरपणे नियोजन करावे. अशा सूचना, क्रीडा व युवक […]
जळगाव
मुक्ताईनगर तालुक्यातील उपसा सिंचन योजनेस मान्यता, 26 हजार हेक्टर क्षेत्रास लाभ
जळगाव जिल्ह्यातील कुऱ्हा-वढोदा इस्लामपूर उपसा सिंचन योजनेला गती देण्याचा आणि त्यासाठी २२२६ कोटी रुपयाच्या सुधारित खर्चास मान्यता देण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. इस्लामपूर धरणातून जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर तालुक्यातील २१ गावे तसेच बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव-जामोद तालुक्यातील ५३ गावे तसेच संग्रामपूर तालुक्यातील ३० गावे अशी एकूण १०४ गावातील २५ हजार […]
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते पाळधी येथील पाणीपुरवठा योजनेचे ई- भूमिपूजन
जळगाव : पाळधी येथे महाराष्ट्रातील पहिल्या सौर ऊर्जेवर चालणाऱ्या 22 कोटी रुपयांच्या पाणीपुरवठा योजनेचे ई- भूमिपूजन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते पार पडले. तसेच शासकीय विश्रामगृहाच्या नूतन इमारतीचे लोकार्पणदेखील मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झाले. जळगाव जिल्ह्यातील विविध प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचेदेखील यावेळी मुख्यमंत्री म्हणाले. यावेळी कृषिमंत्री अब्दुल सत्तार, पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री गुलाबराव पाटील, उद्योगमंत्री उदय सामंत, […]
जळगाव हादरले! अल्पवयीन मुलाने केला सख्ख्या बहिणीचा आणि तिच्या प्रियकराचा खून…
जळगाव : बहिण-भावाच्या पवित्र नात्याचा रक्षाबंधन सण साजरा झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी जळगावच्या चोपड्यात एक भयंकर घटना घडली आहे. प्रेम प्रकरणातून भावानेच बहिणीचा तिच्या प्रियकराचा खून केला. तरुणाने आपल्या बहिणीचा गळा आवळून, तर तिच्या प्रियकरावर गोळी झाडून दोघांचा खून केला. मिळालेल्या माहितीनुसार, चोपडा शहर पोलीस स्टेशनच्या हद्दीत रात्री अकरा वाजेच्या सुमारास एक १७ वर्षीय अल्पवयीन मुलगा […]
चाकूचा धाक दाखवून नवविवाहीत तरुणीला जबरदस्ती बाईकवर बसवलं आणि घरात डांबलं! तू माझी झाली नाहीस तर….
जळगाव : जळगावमध्येही धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. 20 वर्षांच्या तरुणानं एक नवविवाहीत तरुणीला घरात डांबून ठेवलं होतं. चाकूचा धाक दाखवून बाईकवर बसवलं आणि या तरुणीला मावशीच्या घरामध्ये तरुणाने नवविवाहितेला डांबून ठेवलं. त्यानंतर या तरुणाला पोलिसांनी तत्काळ अटकही केली. न्यायालयानं दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, तरुणाचे नाव निखिल सोनावणे असून त्याचं वय […]
जळगाव हादरले! अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार
जळगाव : 14 वर्षीय अल्पवयीन मुलीवर पाच ते सहा जणांनी सामूहिक बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. याप्रकरणी पिंपळगाव हरेश्वर पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी 3 आरोपींना अटक करण्यात आली आहे. तर इतरांचा शोध सुरू आहे. या घटनेमुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जळगाव जिल्ह्यातील पाचोरा तालुक्यातील एका गावात […]
जळगावमध्ये दुधाच्या टँकरचा भीषण अपघात, पाच जण जागीच ठार
जळगाव : जळगावमध्ये मुक्ताईनगरच्या घोडसगावाजवळ बंद पडलेल्या टँकरमधून दुसर्या टँकरमध्ये दुध टाकत असताना भरधाव वेगाने आलेल्या ट्रकने या टँकर आणि क्रेनला धडक दिली. यामध्ये पाच जण जागीच ठार झाले आहेत. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. पोलीस तपास सुरू आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मुक्ताईनगर घोडसगावाजवळ हायवे क्रमांक ६ वर दुधाच्या ट्रकचा आणि टेम्पोचा भीषण अपघात […]
अन् क्षणात होत्याच नव्हतं! तरुणाचा विहिरीत पडून मृत्यू, पाच दिवसांवर आलं होतं लग्न…
जळगाव : जळगाव जिल्ह्यातील एरंडोल येथे अतिशय दुःखद घटना घडली आहे. अवघ्या पाच दिवसांनी ज्याचे लग्न होणार होते, त्या तरुणाचा शेतातील विहिरीत पडून मृत्यू झाला आणि घरातील आनंदाचे वातावरण क्षणात दुःखात बदलून गेले. ही घटना आज सकाळी ९ वाजेच्या सुमारास एरंडोल येथे घडली. भावेश संजय महाजन (वय-२५) असे मृत तरुणाचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, एरंडोल […]
भीषण अपघात! दुचाकी घसरल्याने रस्त्यावर पडलेल्या मुलाला ट्रकने चिरडले
जळगाव : ट्रकने दुचाकीवर मागे बसलेल्या शाळकरी मुलाला चिरडल्याची घटना बुधवारी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास घडली. जळगावकडून मोहाडीकडे जाणाऱ्या रस्त्यावर ही दुर्दैवी घटना घडली. या घटनेनंतर संतप्त झालेल्या नागरिकांनी ट्रकवर दगडफेक केली. सुजय गणेश सोनवणे (वय १३) असे मृत विद्यार्थ्याचे नाव आहे. मोहाडी येथील सुजय गणेश सोनवणे हा सेंट टेरेसा शाळेत इयत्ता ४ च्या वर्गात […]
टाटा मॅजिक चालक-मालक संघटना व नशाबंदी मंडळ महाराष्ट्र राज्य यांच्याकडून बॅनर्स पोस्टर्स गाड्यांना लावून जनजागृती कार्यक्रम
जळगाव जिल्हा परवानाधारक टाटा मॅजिक चालक-मालक संघटना,भुसावळ, व नशाबंदी मंडळ महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्त विद्यमाने यांच्यावतीने सालाबादाप्रमाणे 31 डिसेंबर आणि येणाऱ्या नवीन वर्षाचे स्वागत हे कुठलीही नशा न करता व व्यसन न करता धुंदीत नव्हे तर शुद्धी मध्ये आपल्या मुलाबाळांना सोबत साजरे करावे आणि आपल्या स्वतःचे कुटुंब व प्रवाशांचे कुटुंब हे सुरक्षित रहावे या अनुषंगाने […]









