जळगाव : जळगावमध्येही धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. 20 वर्षांच्या तरुणानं एक नवविवाहीत तरुणीला घरात डांबून ठेवलं होतं. चाकूचा धाक दाखवून बाईकवर बसवलं आणि या तरुणीला मावशीच्या घरामध्ये तरुणाने नवविवाहितेला डांबून ठेवलं. त्यानंतर या तरुणाला पोलिसांनी तत्काळ अटकही केली. न्यायालयानं दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, तरुणाचे नाव निखिल सोनावणे असून त्याचं वय 20 वर्ष आहे. निखिल हा दुचाकीवर आला आणि त्याने दुपारी तीन वाजता गुजराल पेट्रोल पंपकडून घरी जात असताने पीडितेला रस्ता अडवल. तू माझी झाली नाहीस, तुला कुणाचीच होऊ देणार नाही, म्हणत निखिलने पीडितेला चाकूचा धाक दाखवला. इतकंच काय तर तिला जबरदस्त दुचाकीवर बसवलं आणि तिला शिवाजी नगर इथं घेऊन गेला. शिवाजी नगर इथल्या मावशीच्या घरी निखिलने तिला डांबून ठेवलं होतं. तरुणानं नवविवाहितेच्या हातातील मोबाईलही हिसकावून घेतला होता. तसंच तिला शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकीही दिली होती. या तरुणानं पीडितेच्य वडिलांनाही जीवे मारण्याची धकमीही दिल्याचा आरोप करण्यात आला आहे. या तरुणाविरोधात करण्यात आलेल्या तक्रारीनंतर पोलिसांनी या संपूर्ण प्रकाराची गंभीर दखल घेतली. त्यानंतर या तरुणाला पोलिसांनी तत्काळ अटकही केली. गुन्हा दाखल करण्यात आलेल्या निखिल सोनावणे या आता न्यायालयानं दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. जळगाव पोलीस या घटनेप्रकरणी आता अधिक तपास करत आहेत.