बीड : मराठा आरक्षणाच्या मागणीदरम्यान राज्यात या आंदोलनाला हिंसक वळण लागले आहे. आरक्षणाची मागणी करणाऱ्या काही लोकांनी सोमवारी बीडमधील माजलगाव येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचे आमदार प्रकाश सोळंके यांच्या घरावर आणि कार्यालयावर दगडफेक केली. शेकडो आंदोलकांनी येथे डझनभर बाईक आणि कारही पेटवल्या. नुकताच राष्ट्रवादीचे आमदार प्रकाश सोळंके यांचा एक ऑडिओ क्लिप व्हायरल झाली होती, […]
बीड
बीड जिल्हा आत्महत्या मुक्तीकडे नेण्यासाठी सर्वांनी एकदिलाने काम करावे – पालकमंत्री धनंजय मुंडे
बीड : बीड जिल्ह्याचा मागासलेपणा दूर करून हा जिल्हा आत्महत्या मुक्त झाला पाहिजे यासाठी जिल्ह्यातील शासन प्रशासनासह जनतेनेही एकदिलाने काम करावे. प्रत्येक व्यक्तीपर्यंत शक्य त्या लाभासाठी सर्वांनी पोहोचावे आणि जिल्हा प्रगतिशील जिल्हा बनवावा, असे आवाहन राज्याचे कृषिमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी केले. जिल्हा नियोजन समितीची सभा मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी ते […]
पीक विम्याचा अग्रीम दिवाळी पूर्व शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होईल – कृषीमंत्री तथा पालकमंत्री धनंजय मुंडे
बीड : जिल्ह्यात पीक विम्याची अग्रीम रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर दिवाळीपूर्वी जमा होईल असा शब्द मी आज देतो, अशा शब्दात कृषीमंत्री आणि पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी शेतकऱ्यांना वचन यांत्रिक लाभ योजनेतील लाभ वितरण प्रसंगी दिले. जिल्हा विकासाच्या वाटेवर न्यायचा आहे हेच उद्दीष्ट ठेवून आपण काम करीत आहोत असेही ते यावेळी म्हणाले. येथील सामाजिक न्याय भवन परिसरात […]
बीड हादरले! विधवा महिलेवर चालत्या जीपमध्ये बलात्कार
बीड : एका विधवा महिलेवर दोघांनी चालत्या जीपमध्ये बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या महिलेच्या प्रियकरासमोर दोघांनी तिच्यावर अत्याचार केला. ही घटना शुक्रवारी बीड जिल्ह्यात घडली असून, या प्रकरणी बीडच्या शिवाजीनगर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बीडच्या शिवाजीनगर पोलिसांत 26 वर्षीय पीडितेने दिलेल्या तक्रारीनुसार, तिच्या पतीचे पाच वर्षांपूर्वी निधन झाले. त्यानंतर, ती […]
वैद्यनाथ कारखान्याच्या अध्यक्षपदी पंकजा मुंडे यांची निवड
परळी : वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याच्या अध्यक्षपदी पंकजा मुंडे यांची निवड झाली आहे. या साखर कारखान्याची निवडणूक लागल्यानंतर पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे एकत्र आले होते. २१ संचालकांसाठी ही निवडणूक झाली होती. दरम्यान २१ पैकी ११ संचालक पंकजा मुंडे तर १० संचालक धनंजय मुंडे गटाचे बिनविरोध निवडून आले. यानंतर आता वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याच्या चेअरमनपदावर […]
परळीमध्ये भव्य आरोग्य तपासणी शिबिर संपन्न, ४०० व्यक्तीहून अधिक व्यक्तींनी घेतला लाभ
परळी : श्री ष.ब्र. १०८ वेदांताचार्य दिगंबर शिवाचार्य महाराज यांच्या नेतृत्वाखाली थोरला मठ संस्थान वसमत आयोजित वसमत ते श्री क्षेत्र कपिलाधार पदयात्रा मागिल १२ वर्षा पासुन आयोजित करण्यात येते . हजारो भाविकांचा त्या पदयात्रेत सहभाग असतो. या वर्षी भव्य आरोग्य तपासणी शिबिर संपन्न झाले त्यात ४०० व्यक्तीहून अधिक लोकांनी घेतला शिबिराचा लाभ घेतला. रेवली फाटा, […]
बीडमध्ये नवीन भव्य क्रीडा संकुल उभारणार, एकता दौडला बीडकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
बीड : जिल्ह्याच्या क्रीडा क्षेत्राच्या विकासासाठी जिल्हा क्रीडा संकुलात विविध सुविधा निर्माण करण्यात येतील. तसेच केंद्र शासकीय योजनेतून बीडमध्ये नवीन भव्य असे क्रीडा संकुल निर्माण करण्यात येईल, असे प्रतिपादन राज्याचे सहकार व इतर मागास बहुजन कल्याण मंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री अतुल सावे यांनी आज येथे केले. देशाचे पहिले उपपंतप्रधान व गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल […]
नवीन आष्टी – अहमदनगर रेल्वे मार्ग दोन्ही जिल्ह्यांच्या विकासाची भाग्यरेखा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा विश्वास
बीड : नवीन आष्टी – अहमदनगर हा नवीन रेल्वेमार्ग बीड आणि अहमदनगर या दोन्ही जिल्ह्यांच्या विकासाची भाग्यरेखा ठरेल, असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज व्यक्त केला. राज्यातील पायाभूत सुविधांच्या क्षेत्रातील सर्वच प्रकल्पांच्या कामांना गती देण्यात येणार असून शहरी आणि ग्रामीण विकासाचा समतोल साधण्यावर आपले सरकार भर देणार असल्याची ग्वाही त्यांनी दिली. अहमदनगर – बीड […]
बीडमध्ये खळबळ! मामाने केली 4 वर्षांच्या भाच्याची हत्या, झोपेतच केले धारदार हत्याराने वार
बीड : सख्ख्या मामानेच आपल्या चार वर्षीय भाच्याचा झोपेतच हत्याराने वार करून खून केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. ही घटना शनिवारी मध्यरात्री नागापूर (ता. परळी) येथे घडली. कार्तिक विकास करंजकर असे या चिमुकल्याचे नाव आहे. तो आपल्या आईसोबत मामाच्या गावी आलेला होता, यादरम्यान सख्ख्या मामानेच त्याचा निर्घृण खून केला. पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले आहे. मिळालेल्या […]
अंबाजोगाईतील अवैध धंद्याबाबत जबाबदार पोलीस निरीक्षकाला निलंबित करणार – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
मुंबई : बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई ग्रामीण पोलीस स्टेशनच्या हद्दीत सुरू असलेल्या अवैध धंद्याबाबत जबाबदार धरून पोलीस निरीक्षक वासुदेव मोरे यांना निलंबित केले जाईल, असे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत सांगितले. सदस्य नमिता मुंदडा, अबू आझमी यांनी मांडलेल्या लक्षवेधी सूचनेस उत्तर देताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही माहिती दिली. त्यांनी सांगितले की, अंबाजोगाई […]










