अमरावती : डोळ्यात मिरचीपूड फेकून एका व्यक्तीकडील १९ लाख ५० हजार रुपये लुटण्याचा प्रयत्न झाला होता. १९ मे रोजी सकाळी १०.30 च्या दरम्यान ही धक्कादायक घटना घडली होती. पोलिसांनी या प्रकरणातील गुन्हेगारांना शोधण्यासाठी शहरातील विविध ठिकाणांवरील सीसीटीव्ही फुटेज तपासून तिघांना अटक केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मनोज चौधरी (वय ३५) हे एका खाजगी कंपनीत मनी ट्रान्सफरचे […]
अमरावती
अमरावती जिल्ह्यात कडक लॉकडाऊनची घोषणा, दुकानात जाण्यावर निर्बंध, ‘या’ सेवा मिळणार घरपोच
अमरावती : अमरावतीत कोरोना बाधितांची संख्या वाढू लागली आहे. विदर्भातील विविध जिल्ह्यांसह मध्य प्रदेशातूनही उपचारासाठी मोठ्या प्रमाणात रुग्ण अमरावती येथे येत आहेत. या सर्व बाबी लक्षात घेऊन जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी कठोर पाऊल उचलले आहे. अमरावती जिल्ह्यात कोरोनाची साखळी तोडण्यासाठी ९ ते १५ मे दरम्यान कडक लॉकडाऊन लावण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. जिल्हाधिकारी शैलेश नवाल […]
अमरावती वनविभागाच्या जंगलात तीन दिवसांपासून भीषण आग, अग्निशमन दलाची गाडीही जळून खाक
अमरावती : तिवसा येथील सारसी सातरगाव रोड येथील वनविभागाच्या जंगलात गेल्या तीन दिवसांपासून भीषण आगीचे तांडव सुरू आहे. आज ही आग नियंत्रणात आणण्यासाठी गेलेली तिवसा नगरपंचायतीच्या अग्निशमन दलाची नवीन गाडी जळून खाक झाली आहे. या दुर्घटनेत नगरपंचायतीचे तीन कर्मचारी किरकोळ जखमी झाले आहेत. अग्निशमन दलाच्या गाडीला आग लागल्याची माहिती मिळाल्यानंतर चांदूर रेल्वे येथील अग्निशमन दलाची […]
‘लेडी सिंघम’ अशी ओळख असणाऱ्या RFO दिपाली चव्हाण यांची आत्महत्या, सुसाईड नोटमधून समोर आलं कारण..
अमरावती : मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्या गुगामल राष्ट्रीय उद्यान अंतर्गत येणाऱ्या वन परीश्रेत्रात कार्यरत RFO दिपाली चव्हाण यांनी आत्महत्या केली आहे. या २८ वर्षीय तरूण महिला अधिकाऱ्याने शासकीय निवासस्थानी स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली. आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या सुसाईड नोटमध्ये त्यांनी अधिकाऱ्याच्या जाचाला कंटाळून आत्महत्या करत असल्याचं म्हटलं आहे. मूळच्या सातारच्या असणाऱ्या दिपाली चव्हाण यांची महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची […]