अमरावती : क्रीडा क्षेत्राचा दिवसेंदिवस विस्तार होत असून जगभर विविध खेळ वेगवेगळ्या प्रकारे विकसित होत आहेत. त्यामुळे देशात उत्तमोत्तम खेळाडू निर्माण होण्यासाठी अद्ययावत व प्रभावी प्रशिक्षणाची गरज आहे. या पार्श्वभूमीवर श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाचे क्रीडा विद्यापीठ होण्यासाठी लवकरच शासनाकडून समिती गठित करुन निश्चितपणे सकारात्मक कार्यवाही केली जाईल, अशी ग्वाही राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी […]
अमरावती
नागपूर-औरंगाबाद महामार्गावर दोन ट्रक धडकल्याने भीषण अपघात, चौघांचा जागीच मृत्यू
अमरावती : नागपूर-औरंगाबाद महामार्गावर दोन ट्रक समोरासमोर धडकल्याने भीषण अपघात झाला आहे. या अपघातात चार जणांचा मृत्यू झाला आहे. गुरुवारी मध्यरात्री 12 ते 1 दरम्यान अमरावती जिल्ह्यातील शिंगणापूर चौफुली समोर दोन ट्रकची समोरासमोर धडक झाली. नागपूर अमरावती महामार्गावर लोखंडी रॉड घेऊन जाणारा ट्रक खड्डे वाचवण्याच्या नादात अनियंत्रित झाला आणि औरंगाबादहून नागपूरकडे कांदे वाहून नेणाऱ्या ट्रकला […]
मेळघाटात पिकअप झाडावर आदळून भीषण अपघात, तिघांचा जागीच मृत्यू तर 18 जण गंभीर जखमी
अमरावती : मेळघाटात मालवाहक पिकअप झाडावर आदळून भीषण अपघात झाला आहे. यामध्ये तिघांचा जागीच मृत्यू झाला असून १८ जण गंभीर जखमी झाले आहेत. या अपघातातील मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. ही घटना ज्या परिसरात घडली तो घाट हा अतिदुर्गम भागात येतो. सातपुड्यात असलेल्या धारणी तालुक्यातील ग्राम सुसरदा येथे मोठा आठवडी बाजार भरत […]
महिलांमध्ये आर्थिक सक्षमीकरणाबाबत सकारात्मकता निर्माण करावी – प्रधान सचिव मनीषा वर्मा
अमरावती : रोजगाराविषयी प्रशिक्षणाचा कालावधी पूर्ण करुन रोजगार प्राप्त होईपर्यंत सहभागी महिला प्रशिक्षणार्थींचे सातत्याने समुपदेश करावे. प्रेरणादायी सत्र, उद्योजक कंपन्यांचे भरती मेळावे व विषय तज्ज्ञांच्या व्याख्यानांचे नियमीत आयोजन करावे. प्रशिक्षणानंतर रोजगार प्राप्त होऊन आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्याबाबत सकारात्मकता या महिलांमध्ये निर्माण करावी, अशा सूचना कौशल्य विकास, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाच्या प्रधान सचिव श्रीमती मनीषा वर्मा […]
दूषित पाणी पिल्याने मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबीयांना ५ लाख रुपयांची मदत, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा
अमरावती : अमरावती जिल्ह्यातील पाचडोंगरी आणि कोयलारी गावातील विहिरींचे दूषित पाणी पिल्याने मृत्यूमुखी पडलेल्यांच्या कुटुंबीयांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून प्रत्येकी ५ लाख रुपये देण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. अमरावती जिल्ह्यातील मेळघाट परिसरातील पाचडोंगरी आणि कोयलारी गावात खुल्या विहिरीतील दूषित पाणी प्यायल्यामुळे 50 जणांना अतिसाराची लागण झाली. या दुर्घटनेत तीन नागरिकांचा मृत्यू झाला. या घटनेची माहिती […]
दूषित पाण्याने बाधा झालेल्यांना त्वरित उपचार द्या; मृतांच्या कुटुंबीयांना सर्वतोपरी मदत करा, मुख्यमंत्र्यांचे निर्देश
अमरावती : मेळघाटमध्ये दूषित पाण्यामुळे आजारी पडलेल्या नागरिकांना तातडीने चांगले उपचार मिळवून द्यावेत. आवश्यक असल्यास खासगी रूग्णालयात दाखल करावे, असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अमरावतीच्या जिल्हाधिकाऱ्यांना दूरध्वनीद्वारे दिले. या घटनेत मृत्यूमुखी पडलेल्या व्यक्तींच्या कुटुंबियांना आवश्यक ती सर्व मदत मिळवून दिली जाईल, अशी ग्वाहीही त्यांनी दिली. अमरावती जिल्ह्यातील मेळघाट परिसरातील पाचडोंगरी आणि कोयलारी गावात खुल्या […]
बच्चू कडू यांना 17 वर्षांपुर्वी पोलिसांशी हुज्जत घातल्याप्रकरणी 20 हजार रुपयांचा दंड
अमरावती : आमदार बच्चू कडू यांनी २००५ मध्ये विभागीय आयुक्त कार्यालयासमोर आंदोलन करताना पोलिसांसोबत हुज्जत घातली होती. या प्रकरणात अमरावती जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्यायाधीश एस. एस. अडकर यांनी सोमवारी कडू यांना २० हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख ५ ऑगस्ट २००५ रोजी अमरावती जिल्हा दौऱ्यावर आले असता त्यांनी विभागीय आयुक्त कार्यालयात […]
बियाणे महोत्सव : शेतकऱ्यांनी घरगुती, उत्कृष्ट उगवणक्षमता असलेल्या बियाण्यांचा वापर करावा
अमरावती : शेतकऱ्यांनी उगवण क्षमतेची खात्रीशीररित्या तपासणी केलेले घरचे बियाणे वापरावे. बियाणे महोत्सवाच्या माध्यमातून एकाच ठिकाणी शेतकऱ्यांना खात्रीशीर व उत्कृष्ट उगवणक्षमता असलेले बियाणे उपलब्ध होणार असून शासन खंबीरपणे शेतकऱ्यांच्या पाठीशी असल्याचे प्रतिपादन जलसंपदा व लाभक्षेत्र विकास राज्यमंत्री बच्चू कडू यांनी केले. चांदुर बाजार येथील प्रहार कार्यालयाच्या प्रांगणात बियाणे महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते […]
मोठी बातमी! राणा दाम्पत्याचा कोठडीतील मुक्काम वाढला; १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी
मुंबई, २४ एप्रिल : सामाजिक तेढ निर्माण करणारं विधान केल्याप्रकरणी अटकेत असलेल्या राणा दाम्पत्याला वांद्रे न्यायालयानं कोठडी सुनावली आहे. राणा दाम्पत्याला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. सुट्टीकालीन न्यायालयानं हा निकाल दिला. या प्रकरणातील पुढील सुनावणी २९ एप्रिलला होईल. त्याआधी उच्च न्यायालयात दाद मागण्याचा पर्याय राणा दाम्पत्याकडे उपलब्ध आहे. राणा दाम्पत्याला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी […]
दुःखद! राज्यमंत्री बच्चू कडू यांच्या आईचे निधन
अमरावती : राज्यमंत्री बच्चू कडू यांच्या मातोश्री इंदिराबाई कडू यांचे दीर्घ आजाराने निधन झाले. बच्चू कडू यांनी स्वतःच त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवरून ही माहिती दिली. इंदिराबाईंनी वयाच्या ८४ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. बच्चू कडू यांनी ट्विट करत सांगितले कि, “माझ्या आयुष्याला योग्य वळण देणारी माझी आई इंदिराबाई बाबाराव कडू यांचे वयाच्या ८४ व्या वर्षी […]









