खासदार नवनीत राणा यांना करोनाची लागण झाली आहे. चार दिवस आधी नवनीत राणा यांची मुलगी आणि मुलासोबत कुटुंबातील इतर सदस्यांना करोनाची लागण झाल्याचं समोर आलं होतं. त्यानंतर आमदार रवी राणा आई-वडिलांना घेऊन नागपूरला आले होते. नवनीत राणा मुलांची काळजी घेण्यासाठी घरीच थांबल्या होत्या. गुरुवारी अस्वस्थ वाटू लागल्याने चाचणी केली असता त्यांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. नवनीत […]
लेखक: थोडक्यात घडामोडी टीम
कोरोनामुक्त झालेल्या वुहानमधील ९०% रुग्णांची फुफ्फुसे खराब
जगभरात कोरोनाने अक्षरशः थैमान घातले आहे. दरम्यान कोरोना विषाणू आणि त्याच्या संसर्गामुळे होणाऱ्या दुष्परिणामांबाबत मोठ्या प्रमाणात संशोधन सुरू आहे. दरम्यान, कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांबाबत एक अत्यंत धक्कादायक माहिती समोर आली आहे. चीनमधील वुहानमध्ये कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची फुप्फुसे खराब झाल्याचे संशोधनातून समोर आले आहे. त्याबरोबरच कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांपैकी ५ टक्के रुग्ण पुन्हा संसर्ग होऊन रुग्णालयात भरती झाले […]
पुणेकरांवरील पाणीसंकट दूर, धरणक्षेत्रात दमदार पाऊस
पुणे शहरात आणि आजूबाजूच्या परिसरात संततधार पाऊस सुरु आहे. धरण क्षेत्रामध्ये सुद्धा या पावसाने दमदार हजेरी लावली आहे, खडकवासला धरणक्षेत्रात मुसळधार पाऊस सुरु आहे, त्यामुळे धरणात पाण्याची पातळी चांगली वाढली आहे. परिणामी गणेशोत्सवापर्यंत पुण्यात पाणी कपात न करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे.
आणखी एक अभिनेत्याचा मृत्यू; राहत्या घरी सापडला मृतावस्थेत
छोट्या पडद्यावरील अभिनेता समीर शर्मा मुंबईतील राहत्या घरी मृतावस्थेत आढळला. 44 वर्षीय समीर शर्माने आत्महत्या केली असावी असा अंदाज वर्तवला जात आहे. मालाडमधील राहत्या घरी किचनमध्ये त्याचा मृतदेह लटकलेल्या अवस्थेत आढळला. पोलिसांनी या प्रकरणी अपघाती मृत्यूची नोंद केली आहे. नाईट ड्यूटीवर असलेल्या सुरक्षारक्षकाने बुधवारी (5 ऑगस्ट) रात्री त्याचा मृतदेह पाहिला आणि रहिवाशांना याबाबत माहिती दिली. […]
आमच्यावर खरोखरच विनाशकारी संकट ओढवले आहे- लेबनॉनचे पंतप्रधान हसन दियाब
लेबनॉनची राजधानी बैरुतला हादरवणारा प्रचंड स्फोट फटाके आणि अमोनियम नायट्रेटचा साठा पेटल्याने झाला असल्याचे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले. या स्फोटात किमान १३५ लोक ठार, तर चार हजाराहून अधिक लोक जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान, या स्फोटांनंतर सरकारनं दोन आठवड्यांच्या आणीबाणीची घोषणा केली आहे. तसंच यादरम्यान लष्करालाही अनेक अधिकार देण्यात आले आहे. तसंच या […]
अखेर सुशांत मृत्यू प्रकरणाची CBI चौकशी होणार…
बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपुतच्या मृत्यूला आता दिड महिन्यांपेक्षा अधिक वेळ होऊन गेला आहे. मुंबई व बिहार पोलीस या प्रकरणाची कसून चौकशी करत आहेत. मात्र सुशांतच्या मृत्यूचं नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही. त्यामुळे यासंदर्भात बिहार सरकारनं सीबीआय चौकशीची शिफारस केंद्राकडे केली होती. अखेर केंद्र सरकारने सुशांत प्रकरणाच्या CBI चौकशीस मान्यता दिली आहे. सुशांत मृत्यू […]
लता दीदींनी दिलं ‘या’ दोन नेत्यांना राममंदिर निर्माणाचं श्रेय
गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांनी ट्विट करत राम मंदिर निर्माणाचा आनंद व्यक्त केला. लतादीदींनी ट्विट करत म्हटलं, नमस्कार. अनेक राजांचं, अनेक पिढ्यांचं आणि संपूर्ण विश्वातील राम भक्तांचं अनेक शतकांपासून अपूर्ण राहिलेलं स्वप्न आज पूर्ण होताना दिसत आहे. अनेक वर्षांच्या वनवासानंतर आज अयोध्येत प्रभू श्रीराम मंदिराचं पुनर्निर्माण होत आहे, शीलान्यास होत आहे. मंदिर निर्माणाचं सर्वांत मोठं श्रेय […]
राम मंदिर भूमिपूजनानिमित्त बाळासाहेबांची आठवण, #DhanyawadBalasaheb हॅशटॅग होतोय ट्रेण्ड
अयोध्येतील राम मंदिर भूमिपूजनानिमित्त दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची आठवण काढली जात आहे. एकीकडे शिवसेना तसंच इतर नेते बाळासाहेबांच्या आठवणी शेअर करत असताना ट्विटरवर देखील बाळासाहेब ठाकरेंचं नाव चर्चेत आहे. ट्विटरला भूमिपूजनानिमित्त अनेक ट्रेंड होत असून यामध्ये #DhanyawadBalasaheb टॉप ट्रेंडमध्ये आहे. अयोध्येत राम मंदिर उभं राहत आहे त्यामध्ये बाळासाहेबांचीही मोलाची भूमिका असल्याचं सांगत नेटकरी त्यांचे […]
प्रभू रामललासाठी रत्नजडीत वस्त्र
आज अयोध्येत सगळीकडे उत्साहाचं वातावरण आहे. अयोध्येच्या चौकाचौकात पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. राममंदिराच्या सोहळ्यासाठी अनेक रामभक्त अयोध्यानगरीत दाखल झालेले आहेत. प्रभू श्रीराम यांच्या भक्तांसाठी आजचा दिवस अत्यंत आनंदाचा दिवस आहे. सर्वांच्या स्वप्नातलं राम मंदिर अखेर साकारण्यात येणार आहे. दुपारी 12 वाजून 44 मिनिटांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते राम मंदिराचं भूमीपूजन पार […]
राम मंदिर भूमिपूजनाच्या धर्तीवर ओवैसींच्या एका ओळीच्या ट्विटनं खळबळ
राम मंदिराच्या भूमिपूजनाचा ऐतिहासिक दिवस आज अखेर उजाडला आहे. अशातच एमआयएमचे नेते असदुद्दीन ओवैसींच्या एका ओळीच्या ट्विटनं खळबळ माजली आहे. राम मंदिर भूमिपूजनाच्या धर्तीवर बोलताना ओवैसी म्हणतात की, बाबरी मशीद तेव्हाही होती, आजही आहे आणि पुढेही राहिल. तसेच बाबरी मशीदचा जुना फोटो टाकताना त्यांनी ‘बाबरी जिंदा है’ (#BabariZindaHai) या हॅशटॅगचाही वापर केला आहे. धर्मनिरपेक्षता हाच […]










