जळगाव : मुक्ताईनगर तालुक्यातील राष्ट्रवादी पुरस्कृत ग्रामपंचायत उमेदवाराचा विजेच्या धक्क्याने मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. शेतात पाणी देण्यासाठी गेलं असताना विजेचा धक्का बसल्याने रमेश घाईट यांचे निधन झाले. घाईट यांच्या निधनाने त्यांच्या जागेसाठी मतदान होणार की नाही, असा प्रश्न उपस्थिच होत आहे. रमेश घाईट हे जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर तालुक्यातील वडोदा ग्रामपंचायत निवडणुकीच्या रिंगणात उतरले […]
लेखक: थोडक्यात घडामोडी टीम
महाराष्ट्रातल्या ‘या’ सहकारी बँकेचं लायसन्स रद्द, ग्राहकांच्या पैशावर संक्रांत?
पुणे : उस्मानाबादच्या वसंतदादा नागरी सहकारी बँकेचं लायसन्स रद्द करण्यात येत असल्याची घोषणा आरबीआयनं केलीय. बँकेची जी सध्याची स्थिती आहे, त्यात बँक ग्राहकांची देणी देण्यात किंवा व्यवहार करण्यास असमर्थ असल्याचंही आरबीआयनं म्हटलंय. विशेष म्हणजे बँकेचं लायसन्स रद्द झालं तर कोणत्याही ग्राहकाची 5 लाखापर्यंतची रक्कम सुरक्षित आहे. ती त्यांना परत मिळण्याची गॅरंटी आहे. त्यानुसार उस्मानाबादच्या वसंतदादा […]
राज्यात इलेक्ट्रिक वाहनांच्या वापरासोबतच हरित उर्जानिर्मितीस चालना देणार – पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे
मुंबई : पर्यावरण संवर्धनाच्या अनुषंगाने राज्यात इलेक्ट्रिक वाहनांच्या वापरासोबतच हरित उर्जेच्या निर्मितीला चालना देण्यात येईल. राज्यातील महामार्गावर सौरउर्जेचा वापर करणे, मुंबईतील बेस्टमध्ये पुढील पाच वर्षात साधारण ३० टक्के इलेक्ट्रिक बसेस आणणे यासह विविध उपाययोजना राबवून पर्यावरण संवर्धनास चालना देण्यात येईल. हवेचे प्रदूषण कमी करण्याच्या अनुषंगाने शासनामार्फत इलेक्ट्रिक वाहनांना येत्या काळात प्रोत्साहन दिले जाईल, असे पर्यावरण […]
विरुष्काच्या घरी नन्ही ‘परी’चे आगमन; बाळाला सोशल मीडियापासून दूर ठेवण्याचा निर्णय
मुंबई : भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा या दोघांच्या घरी कन्यारत्नाचा लाभ झाला आहे. विरुष्काच्या घरी नन्ही ‘परी’चे आगमन झाले आहे. विराट आणि अनुष्काचं हे पहिलं बाळ आहे. त्यामुळे त्यांचे चाहते फार आनंदात आहे. “आम्हाला आज दुपारी मुलगी झाल्याचं जाहीर करताना अतिशय आनंद होत आहे. तुमच्या प्रेम आणि शुभाशीर्वादांसाठी आम्ही […]
अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजा याच्या डाव्या हाताचा अंगठा निखळला; गरज पडल्यास इंजेक्शन घेऊन उतरणार मैदानात
सिडनी : भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यातील तिसरा कसोटी सामना रंगतदार अवस्थेत पोहचला आहे. ऋषभ पंत आणि पुजारा यांनी केलेल्या फलंदाजीमुळे सामना रंगतदार अवस्थेत पोहचला आहे. निर्णायक क्षणी पंत ९७ धावांवर झेलबाद झाला. मैदानावर तग धरुन असलेल्या पुजारानं एक बाजू लावून धरली आहे. दुसऱ्या बाजूला हनुमा विहारी आहे. मात्र आतापर्यंत हनुमा विहारीला या मालिकेत लौकिसास साजेशी कामगिरी करता […]
भारतीय बनावटीच्या कोरोना लसींना जगभरातून मागणी, ९ देशांनी मागितली मदत;
दिल्ली : जगातील अनेक देशांनी भारताकडे या संपूर्णपणे स्वदेशी बनावटीच्या लसीची मागणी केली आहे. ब्राझीलचे राष्ट्राध्यक्ष जैर बोलसोनारो यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहून भारताने ब्राझिलला अॅस्ट्रॉझेनेकाच्या लसीचा तात्काळ पुरवठा करावा अशी मागणी बोलसोनारो यांनी केली आहे. मात्र भारताने करोनासंदर्भातील जे धोरण तयार केलं आहे त्यानुसार सर्वात आधी भारत आपल्या शेजरच्या देशांना करोनाची लस देणार […]
महाराष्ट्रात ‘बर्ड फ्लू’चा धोका वाढला! ८०० कोंबड्यांचा बर्ड फ्लू’मुळे मृत्यू
परभणी : परभणी जिल्ह्यात ८०० कोंबड्यांचा मृत्यू झाला आहे. या कोंबड्यांचा मृत्यू ‘बर्ड फ्लू’मुळेच झाला असल्याचं प्रयोगशाळेनं दिलेल्या अहवालातून स्पष्ट झालं आहे. मुरूंबा येथे ही घटना घडली असून, परभणीचे जिल्हाधिकारी डी.एम. मुंगळीकर यांनी याविषयीची माहिती दिली आहे. देशातील सहा राज्यांमध्ये बर्ड फ्लूने थैमान घातलेलं असतानाच परभणी जिल्ह्यातील मुरूंबा गावात एकाच दिवशी ८०० कोंबड्या मरण पावल्याची […]
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून स्व. विलासकाका पाटील उंडाळकर यांच्या कुटुंबियांचे सांत्वन
सातारा : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्याचे ज्येष्ठ नेते व माजी सहकारमंत्री स्व. विलासकाका पाटील उंडाळकर यांच्या कुटुंबियांची भेट घेऊन त्यांच्या कुटुंबियांचे सांत्वन केले. यावेळी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात व आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनीही त्यांच्या कुटुंबियांचे सांत्वन केले. उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात व आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी स्व. विलासकाका पाटील उंडाळकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार […]
कोरोनाविरुद्धच्या लढाईत भारताचं मोठं पाऊल; ‘या’ तारखेपासून लसीकरणाला सुरवात..
दिल्ली : कोरोनाविरुद्धच्या लढाईतील एक महत्त्वाचा टप्पा 16 जानेवारीपासून सुरू होत आहे. कोरोना संकट आता थांबण्याच्या मार्गावर आहे. तशी माहितीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विटरवरून दिली आहे. तसेच कोरोनाविरुद्धच्या लढाईतील हा महत्त्वाचा टप्पा असल्याचंही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नमूद केलं आहे. या लसीकरण मोहीमेत डॉक्टर्स, आरोग्य कर्मचारी, फ्रंटलाईन वर्कर्स आणि सफाई कामगारांना पहिलं प्राधान्य दिलं […]
भंडारा आग प्रकरण अतिशय दुर्दैवी आणि मन सुन्न करणारी; रुग्णालयांच्या सुरक्षेशी अजिबात तडजोड चालणार नाही – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
मुंबई : भंडारा जिल्हा रुग्णालयातील आगीत निष्पाप 10 बालकांचा मृत्यू होणं ही अतिशय दुर्दैवी आणि मन सुन्न करणारी घटना आहे. यासंदर्भात सखोल चौकशी करून दोषींवर कठोरात कठोर कारवाई करण्याचे निर्देश मी दिले आहेत असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपली प्रतिक्रिया देतांना म्हटले आहे. सध्याच्या काळात राज्यभरातली आरोग्य यंत्रणा, सर्व रुग्णालये कोरोनाशी लढत आहेत मात्र रुग्णालयाच्या […]










