पुणे : भाजप आणि मनसेची युती होऊ शकते, या चर्चेला खुद्द महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पूर्णविराम दिला आहे. राज ठाकरे यांनी पुण्यातील बैठकीत पदाधिकाऱ्यांना एकला चलो रेचा नारा दिला आहे. भाजपसोबत जाण्याबाबत आता लगेच निर्णय नाही, अशी माहिती मनसे नेते बाबू वागस्कर यांनी दिली आहे. त्यामुळे आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजप आणि […]
लेखक: थोडक्यात घडामोडी टीम
Corona Update : राज्यात आज २६२८ कोरोना बाधीत रुग्णांची वाढ; बरे होण्याचे प्रमाण ९५.७६ %; ३३,९३६ ऍक्टिव्ह रुग्ण
मुंबई : राज्यात आज २,628 कोरोना बाधीत रुग्णांची वाढ झाली व आज नवीन ३,513 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. एकूण १९,५२,187 रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठविण्यात आले आहेत. राज्यात एकूण ३३,936 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता 95.76% झाले आहे. Today, newly 2628 patients have been tested as positive in […]
ब्रेकिंग : राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांना कोरोनाची लागण
मुंबई : राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांनी स्वतः ट्विट करून याबाबत माहिती दिली आहे. अनिल देशमुख गेल्या काही दिवसांपासून वेगवेगळ्या कार्यक्रमांसाठी राज्यातील विविध भागांच्या दौऱ्यावर होते. त्यांचा नुकताच आता विदर्भ दौरा झाला. या दौऱ्यादरम्यान त्यांना कोरोनाची लागण झाल्याची शक्यता आहे. संपर्कात आलेल्या सर्वांना कोरोना चाचणी करून घेण्याचे आवाहन देशमुख यांनी […]
महाराष्ट्राचे सुपुत्र राहुल पाटील सीमेवर शहीद; सकाळी आईशी बोलला होता…
जळगाव : जळगाव जिल्ह्यातील एरंडोल येथील आणखी एक सुपुत्र सीमेवर शहीद झाला आहे. ३० वर्षीय जवान राहुल लहू पाटील यांना पंजाबमध्ये भारत-पाकिस्तान सीमेवर कर्तव्य बजावत असताना आज दुपारी एक वाजता वीरमरण आले आहे. एरंडोल येथेच त्यांच्यावर शासकीय इतमामात अत्यंसस्कर होणार असून मागील दोन महिन्यात जळगाव जिल्ह्यातील चार जवान सीमेवर शहीद झाले आहेत. पंजाबमधील फजलखां तेथून […]
नाना पटोले यांची महाराष्ट्र काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती
मुंबई : नाना पटोले यांची महाराष्ट्र काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती झाली आहे. नाना पटोले यांनी कालच विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर आज काँग्रेसने पत्रक काढून नाना पटोले यांची महाराष्ट्र काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती झाल्याची माहिती दिली. प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यासह सहा कार्यकारी अध्यक्षांची नेमणूक करण्यात आली आहे. शिवाजीराव मोघे, बसवराज पाटील, मोहम्मद आरीफ नसीम खान, कुणाल […]
ब्रेकिंग : कोरोनामुळे UPSC परीक्षेपासून वंचित राहिलेल्या उमेदवारांना मिळणार अतिरिक्त संधी
कोरोनामुळे परीक्षेपासून वंचित राहिलेल्या उमेदवारांना अतिरिक्त संधी देण्यास यूपीएससी (UPSC) ने मान्यता दिली आहे. याप्रकरणी शुक्रवारी झालेल्या सुनावणीदरम्यान, आयोगाने सर्वोच्च न्यायालयात सांगितले की, सिव्हिल सर्व्हिसेस परीक्षेसाठी त्या उमेदवारांना CSE-2021 मध्ये आणखी एक संधी देण्यात येणार आहे, ज्यांच्याकडे २०२० च्या परीक्षेची शेवटची संधी होती.
ब्रेकिंग : मुंबईतील मानखुर्द येथे भीषण आग
मुंबई : मुंबईतील मानखुर्द येथे भीषण आग लागली आहे. ही आग इतकी भीषण आहे की, धुराचे लोट १० ते १५ फुट उंच जाताना दूरुन पहायला मिळत आहेत. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, मानखुर्द मंडाला येथे तेलाच्या गोदामाला ही आग लागली आहे. तेलाच्या गोदामाला आग लागल्याने झपाट्याने आग आजुबाजूला पसरली आणि आगीने रौद्र रूप धारण केलं. ज्या ठिकाणी […]
विधानसभाध्यक्षपदावर काँग्रेसचाच हक्क! महाविकास आघाडीत वादाची ठिणगी?
मुंबई : काँग्रसचे नेते नाना पटोले यांनी काल विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. त्यांनी विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांच्याकडे आपला राजीनामा सोपवला होता. दरम्यान, ऐन अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या तोंडावर नाना पटोले यांच्या विधानसभा अध्यक्षपदाच्या राजीनाम्यानंतर महाविकास आघाडीत नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राजीनाम्याबाबत नापसंती दर्शवली. महाविकास आघाडीचे सरकार स्थिर […]
संतापजनक : ८० वर्षांच्या वृद्धेवर सामूहिक बलात्कार
उत्तर प्रदेश : उत्तर प्रदेशातील महोबा जिल्ह्यातील खरेला गावातून एक अतिशय संतापजनक घटना समोर आली आहे. ८० वर्षांच्या एका वृद्धेवर घरात कुणीही नसताना सामूहिक बलात्कार करण्यात आला. या घटनेबाबत गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या प्रकरणातील आरोपी फरार असून पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, ८० वर्षांची ही वृद्ध महिला २ फेब्रुवारी रोजी आपल्या घरात […]
ब्रेकिंग : फायझरने भारतात कोरोना लसीच्या आपत्कालीन वापरासाठी केलेला अर्ज घेतला मागे
नवी दिल्ली : फाइझरने भारतातील आपल्या कोव्हीड -१9 लसीचा आपत्कालीन वापरासाठी केलेला अर्ज मागे घेतला आहे, जी लस जर्मनीतील बायोटेक (Germany’s BioNTech) कंपनीसह विकसित केलेली आहे. फायझरने (Pfizer Inc) अर्ज मागे घेतल्याचे कंपनीने शुक्रवारी स्पष्ट केले. अमेरिकेतील फार्मा कंपनी भारतात कोरोना लसीच्या आपत्कालीन वापरासाठी अर्ज करणारी पहिली औषध निर्माता कंपनी असून, बुधवारी (३ फेब्रुवारी) भारताच्या […]










