नाशिक : आदिवासी विकास विभागाकडून आदिवासी विद्यार्थ्यांसाठी विविध योजना राबविल्या जातात. त्यापैकी आदिवासी विद्यार्थ्यांना परदेशात उच्च शिक्षणाची संधी मिळावी या उद्देशाने शिष्यवृत्ती दिली जाते. कोरोना प्रादुर्भावामुळे उद्भवलेल्या परिस्थितीचा विचार करता आदिवासी विकास विभागाकडून या शिष्यवृत्तीसाठी आवेदनपत्रे सादर करण्याची मुदत ६ सप्टेंबर २०२१ पर्यंत वाढविण्यात आलेली आहे. आदिवासी विकास विभागाचे आयुक्त हिरालाल सोनवणे यांनी याबाबत प्रसिद्धीपत्रकान्वये […]
लेखक: थोडक्यात घडामोडी टीम
MPSC ची संयुक्त पूर्वपरीक्षा आता 4 सप्टेंबर रोजी होणार
मुंबई : एमपीएससीची संयुक्त पूर्वपरीक्षा 4 सप्टेंबर रोजी होणार आहे. महाराष्ट्र दुय्यम सेवा ‘अराजपत्रित गट ब’साठी ही परीक्षा घेतली जाईल. महाराष्ट्र दुय्यम सेवा ‘अराजपत्रित गट ब’ संयुक्त पूर्वपरीक्षा 2020 ही परीक्षा आधी 11 एप्रिल रोजी आयोजित करण्यात आली होती. मात्र कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे 9 एप्रिल रोजी एमपीएससीकडून परिपत्रक काढून ही परीक्षा पुढे ढकलण्यात आली होती. आता […]
प्रवरा नदीवरील पुलाचे काम तातडीने सुरु करावे, ग्रामस्थांच्या शिष्टमंडळाचे मागणी निवेदन उपभियंत्याकडे सुपूर्द
संगमनेर : उंबरी-शेडगाव या गावांना जोडणाऱ्या प्रवरा नदीवरील पुलाचे काम तातडीने सुरु करावे अशी मागणी पंचायत समिती सदस्य निवृत्ती सांगळे यांच्यासह ग्रामस्थांनी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे केली आहे. यासंदर्भात बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता श्री.आर.आर.पाटील यांना संबंधित गावातील ग्रामस्थांच्या शिष्टमंडळाने आपल्या मागणीचे निवेदन दिले आहे. या कामाच्या निविदा निश्चित झाल्या असतानाही, अद्यापही कामाला सुरुवात झालेली नाही. ग्रामस्थांची […]
धक्कादायक! दिल्लीत ९ वर्षांच्या दलित मुलीवर बलात्कार करून हत्या, मृतदेह जाळण्याचाही प्रयत्न
नवी दिल्ली : दक्षिण-पश्चिम दिल्लीतील दिल्ली छावणीजवळ स्मशानभूमीच्या एका पुजारी आणि तीन कर्मचाऱ्यांनी एका नऊ वर्षांच्या मुलीवर बलात्कार करून तिची हत्या केली, ज्यांनी नंतर तिच्या आई-वडिलांच्या संमतीशिवाय किंवा पोलिसांना कळविल्याशिवाय तिच्या मृतदेहाचे अंत्यसंस्कार केले. मुलीच्या आईने आरोप केला कि, माझ्या मुलीचा मृत्यू विजेचा धक्का बसून झालेला नाही. तर पुजारीने तिच्यावर बलात्कार केला आहे, या आरोपानंतर […]
सर्व थरांतील पूरग्रस्तांना वाढीव दराने मदत, मुख्यमंत्र्यांनी मंत्रिमंडळ बैठकीत दिले ‘हे’ निर्देश
मुंबई : गेल्या दीड वर्षात महाराष्ट्रात वेगवेगळ्या नैसर्गिक आपत्ती आल्या असून कोविडचे संकट असतानादेखील आपदग्रस्तांना राज्य सरकारने वाऱ्यावर न सोडता मदत केली आहे. आजही ११ हजार ५०० कोटींच्या तरतुदीस मान्यता देऊन राज्य सरकार पूरग्रस्तांचे अश्रू पुसण्याचा प्रयत्न करीत आहे, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले. नुकसान मोठे आहे. शेतकरी, व्यापारी, व्यावसायिक, दुकानदार, सर्वसामान्य नागरिक, कारागीर […]
3 ऑगस्ट 2021 : आज मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आले ‘हे’ महत्वाचे निर्णय
मुंबई : जालना येथे 365 खाटांचे प्रादेशिक मनोरुग्णालय उभारण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते. यामुळे मराठवाडा व विदर्भातील रुग्णांसाठी उपचारांची सुविधा उपलब्ध होणार आहे. राज्यात पुणे, ठाणे, नागपूर व रत्नागिरी या चार ठिकाणी प्रादेशिक मनोरुग्णालये आहेत. जालना शहर मराठवाडा व विदर्भासाठी मध्यवर्ती असे आहे. या भागातील रुग्णांना उपचारांकरिता […]
गुलशन ग्रोव्हर यांची धोनीच्या लूकवर प्रतिक्रिया, धोनीला केले ‘हे’ आवाहन
बॉलिवूडचा बॅडमॅन उर्फ गुलशन ग्रोव्हर हे वास्तविक जीवनात अतिशय नम्र व्यक्ती आहेत. त्यांनी आपल्या संपूर्ण कारकिर्दीत नेहमीच वादांपासून दूर राहण्यात यश मिळवले आहे. पण आता कॅप्टन कूल एमएस धोनीमुळे त्यांना वेगळीच चिंता सतावत आहे. याला कारण आहे धोनीची फॉक्स हॉक हेअरस्टाईल. प्रत्येकजण धोनीच्या नवीन लूकचा आनंद घेत असताना, गुलशन ग्रोव्हर यांनी देखील धोनीच्या लूकवर मजेशीर […]
राज्यातील ११ जिल्ह्यांमध्ये तिसऱ्या पातळीचे निर्बंध, उर्वरित जिल्ह्यात ‘या’ निर्बंधांमध्ये सूट, जाणून घ्या..
मुंबई : राज्यातील कोरोना संसर्ग मोठ्या प्रमाणावर असलेल्या ११ जिल्ह्यांत ब्रेक दि चेन अंतर्गत तिसऱ्या पातळीचे निर्बंध कायम ठेवण्यात आले असून मुंबई, मुंबई उपनगर आणि ठाणे या ३ जिल्ह्यांत स्थानिक आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण निर्बंधांबाबत ठरविणार आहे. हे १४ जिल्हे सोडून राज्यातील उर्वरित जिल्ह्यांमध्ये निर्बंधांमध्ये काही प्रमाणात सूट देण्यात आली आहे. सार्वजनिक आरोग्य विभागाने यासंदर्भात साथरोग […]
पठाणकोटजवळील रणजीत सागर तलावात कोसळले लष्कराचे हेलिकॉप्टर
पठाणकोट : पठाणकोटजवळील रणजीत सागर तलावात लष्कराचे हेलिकॉप्टर कोसळले. सुदैवाने वैमानिक आणि सह-वैमानिक सुरक्षित आहेत. एनडीआरएफ आणि पोलिसांकडून शोध व बचावकार्य सुरू आहे. मिळालेल्या माहितीनुसार, 254 आर्मीच्या एव्हिएशन स्क्वाड्रनच्या हेलिकॉप्टरने सकाळी 10:20 वाजता मामून कॅंटमधून उड्डाण केले. हे हेलिकॉप्टर रणजीत सागर तलावावरून खूपच कमी उंचीवरून उडत होते आणि त्यानंतर ते कोसळले. पठाणकोटला लागून असलेल्या जम्मू […]
सीबीएसई बोर्डाचा बारावीचा निकाल जाहीर, असा पहा निकाल…
सीबीएसई बोर्डाचा बारावीचा निकाल जाहीर करण्यात आला. विद्यार्थ्यांना सीबीएसईच्या अधिकृत वेवसाईटवर म्हणजे cbseresults.nic.in वर हा निकाल पाहता येईल. सीबीएसई 12 वी बोर्ड परीक्षेचा निकाल 99.37 टक्के लागला आहे. मुलींचा निकाल 99.67 टक्के तर मुलांचा निकाल 99.13 टक्के लागला आहे. CBSE बोर्डाच्या अधिकृत वेबसाईट cbseresults.nic.in, cbse.gov.in वर विद्यार्थ्यांना निकाल पाहता येणार आहेत. विद्यार्थी अधिकृत वेबसाईटवर जाऊन […]










